पोस्ट्स

Congratulations!!!!!

इमेज
  प्रा. मंजुश्री राऊत-सिनगारे यांना 'कै. शांताबाई बोराळकर स्मृती पारितोषिक' प्रदान ----------------------------------- अंबाजोगाई:  येथील श्री. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक विद्यालयातील प्रा. मंजुश्री राऊत-सिनगारे यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना गृह विज्ञान विषयात सर्वप्रथम आल्याबद्दल 'कै. शांताबाई बोराळकर स्मृती पारितोषिक' देऊन सन्मानित करण्यात आले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा. डॉ. विजय फुलारी, कुलसचिव प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर, ज्येष्ठ कृषीतज्ञ विजयअण्णा बोराडे, तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप, डॉ. भारत खंदारे आणि विद्यार्थी विकास संचालक डॉ. कैलास अंभुरे यांचीही उपस्थिती होती. अंबाजोगाई येथील श्री. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव मा. राजकिशोर (पापा...

वाका येथे सकाळी ९ वाजता अत्यंविधी

इमेज
अनंत मुंडे यांना मातृशोक; किसाबाई मुंडे यांचे निधन  परळी / प्रतिनिधी.... मराठवाडा साहित्य परिषद परळीचे कार्याध्यक्ष तथा मराठवाडा शिक्षक संघाचे शहर प्रसिध्दी प्रमुख अनंत मुंडे सर यांच्या मातोश्री किसाबाई आप्पाराव मुंडे यांचे दिर्घ आजाराने आज शनिवार दि.२३ रोजी रात्री ९ वाजता दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ९५ होते.        किसाबाई या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू स्वभावाच्या होत्या.त्यांच्या मुखात सतत हरिनामाचे नाव असे. त्यांच्या पश्चात अनंत मुंडे सर यांच्या सह आठ पुत्र आहेत. त्यांचा पार्थिवावर आज रविवार दि.२४ रोजी सकाळी त्यांच्या गावी वाका ता.परळी येथे सकाळी ठीक ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 67 वा वर्धापन दिन

इमेज
मराठवाडा विकासात विद्यापीठीय शिक्षणाचा सिंहाचा वाटा - डॉ. प्रा. माधव रोडे         परळी, प्रतिनिधी.....  जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचा 67 वा वर्धापन दिन 23 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी,डॉ माधव रोडे यांनी मराठवाड्याच्या विकासात विद्यापीठीय शिक्षणाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन याप्रसंगी केले. विद्यापीठ वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे व्ही जगतकर,  प्रमुख पाहुणे व व्याख्याते डॉ.माधव रोडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्या परिषद सदस्य व प्राध्यापक प्रतिनिधी, डॉ  पी एल कराड, समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य प्रोफेसर डॉ.रमेश राठोड, मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ रामेश्वर चाटे, इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.बाबासाहेब शेप यांची उपस्थिती होती. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भारतरत्न,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अभिवादन करून कार...

प्रथम स्मृतीदिन : विनम्र अभिवादन: विशेष प्रासंगिक लेख.....

इमेज
  कै.गंगाधर रामभाऊ मुंडीक (धारासुरकर) : एक कष्टमय प्रवासाचा तेजस्वी प्रकाश             "जगण्यासाठी फक्त जन्म घेणे पुरेसे नसते, आयुष्याला अर्थ द्यायला लागतो त्याग, कष्ट आणि जबाबदारीचा आधार."             कै. गंगाधर रामभाऊ मुंडीक (धारासुरकर) यांचा जन्म १ ऑगस्ट १९३० रोजी धारासुर, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी येथे झाला. त्यांचे वडील रामभाऊ व्यंकोबा मुंडीक आणि आई मधुराबाई रामभाऊ मुंडीक हे कुटुंब सन्मानाने जीवन जगणारे होते. मामाकडे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपल्या कष्टमय जीवनाची सुरुवात तेलंगणामधील कोल्हारी, ता.बोच जि. आदिलाबाद येथे केली.फक्त १३ वर्षांचे असतानाच त्यांनी निजामाबाद येथे सुवर्णकार कारागीरीचे काम शिकले व  सुरू केले. वयाच्या कोवळ्या वळणावर जेव्हा इतर मुले खेळण्यात रमलेली असतात, तेव्हा गंगाधररावांनी कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव ठेवून कामात स्वतःला झोकून दिले.              सिंगापूर ता. बोच, जिल्हा आदिलाबाद येथे वडिल रामभाऊ मुंडीक यांनी  १६ एकर शेती घेतलेली होती. ...

प्रसिद्ध कीर्तनकार भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर यांचे कीर्तन

इमेज
कै. गंगाधर रामभाऊ मुंडीक (धारासुरकर) यांच्या प्रथम वर्षश्राध्दानिमित्त कीर्तनाचे आयोजन प्रसिद्ध कीर्तनकार भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर यांचे कीर्तन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       कै. गंगाधर रामभाऊ मुंडीक (धारासुरकर) यांच्या प्रथम वर्षश्राध्दानिमित्त रविवारी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर यांची कीर्तनसेवा होणार आहे.     परळी वैजनाथ येथील सराफा मार्केट मधील सर्व परिचित सुवर्णकार व्यावसायिक रमेश मुंडीक धारासुरकर यांचे वडील कै. गंगाधर रामभाऊ मुंडीक यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला असुन प्रेमभक्ती साधना केंद्राच्या माध्यमातून सातत्याने विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या रमेश मुंडीक धारासुरकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर, परळी वैजनाथ येथे रविवार, दि.२४/०८/२०२५ रोजी प्रसिद्ध कीर्तनकार भागवतमर्मज्ञ श्री.ह.भ.प. बाळु महाराज जोशी उखळीकर यांचे किर्तन दु. ११ ते १ होईल.या किर्तनास व भोजना...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !

इमेज
  खळबळजनक घटना: बीड जिल्ह्यात पुन्हा एका आश्रमशाळा कर्मचाऱ्याची आत्महत्या ! दोन संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून परळी तालुक्यात एका कर्मचाऱ्याने लावून घेतला गळफास परळी वैजनाथ, प्रतिनिधी...             बीड जिल्ह्यातील केजच्या आश्रम शाळेवरील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी काही महिन्यांपुर्वी आत्महत्या केल्यानंतर हे प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेत आले होते .याबाबत आश्रम शाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐरणीवर आल्या होत्या.त्यानंतर आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी घटना घडली असुन परळी तालुक्यात एका युवक कर्मचाऱ्याने स्वतःला गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. नोकरीमध्ये संस्थाचालकांकडून गेले अनेक वर्षापासून सातत्याने होणारा मानसिक छळ, अगोदर केज आणि त्यानंतर परळी तालुक्यातील संस्थाचालकांनी  पैसे न भरता अनुकंपावर नोकरी करतो म्हणून सातत्याने मानसिक त्रास दिला. यातूनच या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे.             परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवाशी वसंत नगर...

BIRTHDAY WISHES:अभिष्टचिंतन लेख>>>अनंत कुलकर्णी

इमेज
  प्रेरणादायी व्यक्तिमत्व : अशोक जैन “कुछ लोग शोहरत के लिये जीते हैं, कुछ लोग दौलत के लिये जीते हैं, और कुछ लोग होते हैं ऐसे, जो औरों के लिये जीते हैं…!” प रळी शहराची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक ओळख निर्माण करताना अनेक मान्यवर व्यक्तींचे योगदान आहे. याच परळी नगरीतून उदयाला आलेले, प्रसिद्धीपासून दूर राहूनही समाजाच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवणारे व्यक्तिमत्व म्हणजे वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेचे माजी चेअरमन अशोक जैन. “मेहनत का फल तो हर किसी को मिलता है, मगर सच्चाई का साथ देने वाले को इज्ज़त का भी फल मिलता है।” समाजकार्याची ओळख अशोक जैन अनेकांना मानसिक आणि आर्थिक आधार दिला. जीवनातील संकटात अडकलेल्या अनेकांना त्यांनी हात दिला, उभे केले. समाजसेवेचा वारसा जपत ते नेहमीच कार्यरत राहिले. त्यांचा एक ठाम विश्वास आहे – “कामातून माणसाला ओळख झाली पाहिजे, प्रसिद्धीमुळे नाही.” म्हणूनच ते प्रत्येक सामाजिक कार्यात सहभागी होतात पण नेहमी सवंग प्रसिद्धीपासून दूर राहतात. सामाजिक भान आणि दृष्टी       अशोक जैन यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. प्रत्येक माणसात काही ना काही क्ष...