BIRTHDAY WISHES:अभिष्टचिंतन लेख>>>अनंत कुलकर्णी

 प्रेरणादायी व्यक्तिमत्व : अशोक जैन





“कुछ लोग शोहरत के लिये जीते हैं,

कुछ लोग दौलत के लिये जीते हैं,

और कुछ लोग होते हैं ऐसे,

जो औरों के लिये जीते हैं…!”


रळी शहराची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक ओळख निर्माण करताना अनेक मान्यवर व्यक्तींचे योगदान आहे. याच परळी नगरीतून उदयाला आलेले, प्रसिद्धीपासून दूर राहूनही समाजाच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवणारे व्यक्तिमत्व म्हणजे वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेचे माजी चेअरमन अशोक जैन.

“मेहनत का फल तो हर किसी को मिलता है,

मगर सच्चाई का साथ देने वाले को

इज्ज़त का भी फल मिलता है।”

समाजकार्याची ओळख

अशोक जैन अनेकांना मानसिक आणि आर्थिक आधार दिला. जीवनातील संकटात अडकलेल्या अनेकांना त्यांनी हात दिला, उभे केले. समाजसेवेचा वारसा जपत ते नेहमीच कार्यरत राहिले.

त्यांचा एक ठाम विश्वास आहे – “कामातून माणसाला ओळख झाली पाहिजे, प्रसिद्धीमुळे नाही.” म्हणूनच ते प्रत्येक सामाजिक कार्यात सहभागी होतात पण नेहमी सवंग प्रसिद्धीपासून दूर राहतात.

सामाजिक भान आणि दृष्टी

     अशोक जैन यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. प्रत्येक माणसात काही ना काही क्षमता असते, ती योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास उभी राहते – हा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे तरुणाईला उद्योजकतेकडे वळवणे, स्वावलंबनाची प्रेरणा देणे, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे या गोष्टींमध्ये ते नेहमी पुढाकार घेतात. परळीतील अनेक तरुणांनी त्यांच्या सल्ल्यामुळे व्यवसायात पहिले पाऊल टाकले आहे.

नातेसंबंधांची श्रीमंती

    अशोक जैन यांच्या जीवनातील खरी संपत्ती म्हणजे त्यांचे जपलेले मानवी नातेसंबंध. मिञ परीवार असोत, शेतकरी सभासद असोत वा व्यापारी वर्ग – सर्वांशी ते एकसमान जिव्हाळ्याने वागतात. त्यांच्या मते, "नातेसंबंधांची गुंतवणूक हीच खरी गुंतवणूक आहे," आणि हीच विचारसरणी त्यांच्या प्रत्येक वागण्यातून दिसून येते.

कार्यतत्परतेचे धडे

 समाजकार्याचा व्याप कितीही मोठा असला तरी ते नेहमी स्वतःला व्यस्त ठेवतात. प्रत्येक कामात ते स्वतः सहभागी होऊन कार्यतत्परतेचा आदर्श ठेवतात. "काम मोठं असो वा छोटं, मनापासून केलं तर त्याची किंमत वाढते," हे त्यांच्या आचरणातून शिकायला मिळते. ही कार्यतत्परता पाहून तरुणाईला जबाबदारीची जाणीव होते.

भविष्याकडे पाहण्याची दृष्टि

अशोक जैन हे फक्त वर्तमानात रमणारे व्यक्तिमत्व नाहीत, तर भविष्याकडे पाहणारे दूरदृष्टीचे नेते आहेत. परळी शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, हे त्यांचे स्वप्न आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रांत समाजाने एकत्र येऊन काम करावे, अशी त्यांची धारणा आहे. त्यांच्या मते, सामूहिक प्रयत्नांतूनच खऱ्या अर्थाने प्रगती शक्य आहे.

विनम्रता आणि लोकसंग्रह

पत, पद, धन, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी असूनही त्यांची विनम्रता, गोडवाणी आणि सुस्वभावी वर्तन यामुळे त्यांचे मोठेपण अधिकच खुलते. वयस्क नागरिक असोत वा तरुणाई, सर्वांमध्ये ते लोकप्रिय आहेत.

“अदा से बात करना और दिल से निभाना,

यही तो असली अमीरी की पहचान है।”

त्यांच्या गोडवाणीमुळे कोणीही भारावून जाते. जैन यांना भेटणारा कोणताही ग्राहक त्यांना भेटल्याशिवाय परत जात नाही. अडचणी, , व्यवहारातील गुंतागुंत – यावर तात्काळ उपाय शोधण्याची त्यांची तयारी असते.

नेतृत्वाची शैली

अभ्यासू वृत्ती, आर्थिक बाबींचे बारकावे, कडक प्रशासकाची शिस्त, आणि कार्यातूनच यश मिळवण्याचे कौशल्य – ही त्यांची खास ओळख आहे. त्यामुळेच ते सगळ्यांना आपलेसे वाटतात.

त्यांचा मित्रपरिवार प्रचंड मोठा आहे. लहान-मोठा भेद न करता ते सर्वांशी एकसमान प्रेमाने वागतात. त्यांच्या वागण्यात कृत्रिमता नाही, स्पष्टपणा आहे, हित जपण्याची वृत्ती आहे.

“दोस्ती में रंग नहीं देखा जाता,

दिल का संग देखा जाता है।”

प्रेरणादायी नेतृत्व

अशोक जैन यांचे व्यक्तिमत्व म्हणजे साधेपणातून उभा राहिलेला एक प्रेरणादायी दीपस्तंभ. त्यांचे संघटनकौशल्य, लोकसंग्रह व नेतृत्व इतरांनाही आपलेसे वाटते. त्यांच्याकडे पाहूनच अनेकांना समाजकार्यासाठी प्रेरणा मिळते.

मोठेपण असूनही मनाचे मोठेपण जपणे ही दुर्मिळ बाब आहे. पण अशोक जैन यांच्याकडे हे गुण सहजपणे दिसतात. अशा नेतृत्वामुळेच समाजातील बांधणी व प्रगती शक्य होते.

“नेतृत्व वो नहीं जो मंच से चमके,

नेतृत्व वो है जो दिलों में धडकें।”

आज परळी शहर अशा प्रेरणादायी नेतृत्वाचा साक्षीदार आहे. त्यांच्या उत्तरोत्तर प्रगतीतूनच समाजाची शक्ती व एकता दृढ होईल.

परळी शहराच्या वतीने या आदरणीय व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

“आपकी मेहनत, आपका साथ,

समाज का है सबसे बड़ा सौगात।

ईश्वर से बस यही दुआ है,

आपका सफर सदा हो कामयाब।

                - ✍️ अनंत कुलकर्णी

                संपादक – परळी संचार

                     परळी वैजनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !