अभिष्टचिंतन विशेष लेख......

शैक्षणिक,सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे प्रदीप खाडे बीड जिल्ह्यातील ज्या काही युवकांनी आपला अल्पावधीतच त्यांच्या कार्यामुळे जनमाणसात ठसा उमटविला आहे.अशा युवकांपैकी एक नाव म्हणजे प्रदीप खाडे.प्रदीप खाडे हे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव आहेत तर कै.रामभाऊ अण्णा खाडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत.यासह विविध सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविण्याचे महान कार्य करणारे राष्ट्रपिता महात्मा फुले म्हणतात 'शिक्षण हे सर्वांगिण विकासाचे प्रवेशद्वार आहे ' तर महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,' शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.' म्हणजे शिक्षणात किती ताकद आहे हे या महानवांनी बहुजन समाजाला सांगितले आहे.शिक्षणाचे हे क्रांतिकारी शस्त्र लक्षात घेऊन राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी सुध्दा समाजसुधारणे करिता शिक्षण संस्था सुरू केल्या. आणि रानावनात भटकणारा, डोंगर द- यात शेती कर...