इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोहीम:दोन तलवारी जप्त 




परळी (प्रतिनिधी) – आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, तसेच सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

गोपनीय बातमीदाराच्या मदतीने पोलीसांनी दोन इसमांचा शोध घेतला. त्यांच्याकडून २ घातक शस्त्रे (तलवारी) जप्त करण्यात आल्या असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा क्र. 211/25 व 213/25, भादंवि कलम 4/25 आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, जर कोणाकडे घातक शस्त्रे, तलवारी अथवा अशा प्रकारचे अवैध साहित्य असल्याची माहिती असेल, तर कृपया परळी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. नागरिक मोबाईल क्रमांक 9225092825 वर माहिती देऊ शकतात. माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट