इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

 प्रतिक्स मेकअपच्या "श्रीं"ची मान्यवर महिलांच्या हस्ते आरती




सौ. माधुरी मेनककुदळे, सौ. सीमाताई कांदे, सौ. अश्विनी कुकर, सौ. आचार्य यांची उपस्थिती

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील नामांकित "प्रतिक्स मेकअप" स्टुडिओमध्ये स्थापन करण्यात आलेल्या "श्रीं"ची आज विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली. . माधुरी मेनककुदळे, सौ. सीमाताई कांदे, सौ. अश्विनी कुकर, सौ. आचार्य यांची उपस्थिती होती. 

         प्रेमपन्ना नगरमधील प्रतिक्स मेकअप स्टुडिओमध्ये "श्रीं"ची स्थापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांना  "श्रीं"च्या आरतीचा मान दिला जातो. आज गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी वैद्यनाथ बॅंकेच्या नवनिर्वाचित संचालिका सौ. माधुरी योगेश मेनककुदळे, विद्यावर्धिनी विद्यालयाच्या शिक्षिका सौ. सीमाताई सौदागर कांदे (सिरसाट), वडगाव दादाहरीच्या सरपंच सौ. अश्विनीताई शिवाजी कुकर, सौ. प्रियाताई आचार्य आदींच्या हस्ते आज आरती करण्यात आली. यावेळी "ब्युटी पार्लर हे केवळ महिलांचे क्षेत्र आहे ही संकल्पना प्रतिक सुरवसे याने मोडीत काढली असुन त्याने वेगळ्या क्षेत्रात संधी शोधुन आपली ओळख निर्माण केली हे कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढून त्याला मोठे यश मिळो अशी सदिच्छा.आदर्श शिक्षक सौदागर कांदे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

       यावेळी शिवाजीराव कुकर, ज्ञानोबा सुरवसे यांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रतिक्स मेकअपचे संचालक, प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रतिक सुरवसे, श्रीमती कमलबाई पतंगे, ऐश्वर्या ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ. प्रतिभा सुरवसे यांनी स्वागत केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या