पोस्ट्स

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

नगर परिषद निवडणुक....

इमेज
  नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी ऑफलाईनसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत मुंबई, दि. १४ (रानिआ): नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी शनिवारी (ता. १५) आणि रविवारी (ता. १६) देखौल नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे; परंतु विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्याबाबत क्षेत्रीय स्तरावर आढावा घेऊन ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. नामनिर्देशनपत्रे शनिवारी (ता. १५) आणि रविवारी (ता. १६) या दोन्ही सुट्टीच्या दिवशीसही सकाळी ११ ते दुप...

नगर परिषद निवडणुक

इमेज
वार्ड क्र. 11 मधून यशपाल वाघमारे यांच्या नावाची जोरदार चर्चा परळी / प्रतिनिधी : परळी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची तयारी आता जोर धरू लागली असून विविध प्रभागांत इच्छुकांच्या नावांवर चर्चा रंगत आहे. वार्ड क्र. 11 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते यशपाल वाघमारे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे. यशपाल वाघमारे हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा संघटनेत सक्रिय असून सामाजिक, शैक्षणिक व जनसंपर्क क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. स्थानिक पातळीवर युवकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आणि जनआधार असल्याने त्यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी वार्डातील नागरिक व कार्यकर्त्यांकडून होत आहे. वार्डातील स्थानिक समस्यांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून नागरिकांशी सलोख्याचे संबंध टिकवले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत वार्ड क्र. 11 मधून यशपाल वाघमारे हे एक बलाढ्य दावेदार ठरतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

निवडणूक आयुक्तांनी काढले पत्र...

इमेज
  नगर परिषद निवडणुक : सुट्टी नाही; रविवारीही स्वीकारणार उमेदवारी अर्ज  राज्यातील नगर परिषद  निवडणूक कार्यक्रम सुरु झाला आहे. या निवडणुकांमध्ये कमी कालावधीअभावी उमेदवारांची गैरसोय होऊ नये, म्हणून सुटीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची सोय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.      राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम दि.४/११/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला होता. या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पन्ने संगणकप्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येत आहेत. परंतु या संगणक प्रणालीद्वारे स्विकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशन पत्रामध्ये अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहीले आहेत. अशा परिस्थितीत संगणकप्रणालीवर भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण  निर्देश देत आहेत         दि.१५/११/२०२५ ते दि. १७/११/२०२५ या कालावधीमध्ये (तीनही दिवस), (रविवार द...

आजपर्यंत एकूण दाखल अर्जांची संख्या : एकूण 38 नामनिर्देशन पत्रे दाखल

इमेज
परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक : आज एकूण 27 नामनिर्देशनपत्र आले- नगराध्यक्ष पदाकरिता 3 तर  सदस्य पदाकरिता 24 अर्ज दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज एकूण 27 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदाकरिता 3 तर सदस्य पदाकरिता 24 अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदाकरिता 3 अर्ज दाखल झाले असुन यामध्ये शेख कौसरबेगम अश्फाक, महंमद फरजाना सुलेमान, शेख  नूरजहाँ बेगम मैनोद्दीन यांचा समावेश आहे. नगरपरिषद  सदस्य पदाकरिता 24 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.प्रभाग क्रमांक 2-  तीन नामनिर्देशनपत्र  दाखल सर्वसाधारण  प्रवर्गातून कुरेशी वहाब हमीद , शेख जुबेर लालामिया (यांचे कडून 2 नामनिर्देशनपत्र) , प्रभाग क्रमांक 3-  पाच नामनिर्देशनपत्र दाखल शेख  खैरुनिसा बेगम युसूफ, तांबोळी अजीम इसाक ,शेख सोहेल मुख्तार,शेख हुसेनाबी अमीन,शेख आयेशा मोसीन प्रभाग क्रमांक 6- दोन नामनिर्देशनपत्र दाखल. सर्वसाधारण प्रवर्गातून आंधळे गोपाळकृष्ण रावसाहेब आणि पद्मराज बलभीम गुट्टे  प्रभाग क्रमांक 7-सर्वसाधारण प्...
इमेज
  राष्ट्रवादीच्या संध्याताई दिपक देशमुख यांचा परळी नगर परिषदेच्या प्रचाराचा धुमधडाका  शहरातील मतदारांच्या गाठीभेटीची पहिली फेरी पूर्ण  परळी वैजनाथ, प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवार सौ.संध्याताई दिपक नाना देशमुख यांनी परळी नगर परिषदेच्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणूक प्रचाराचा धुमधडाका सुरू असून सौ.संध्याताई देशमुख यांनी परळी शहरातील सर्व प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटीची पहिली फेरी पूर्ण केली आहे.      परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पक्षप्रवेश केला होता. पक्षाच्या वतीने सौ.संध्याताई देशमुख यांनाच उमेदवारी देण्यात येणार आहे.त्यापूर्वीच दिपक देशमुख यांनी परळी शहरात आपला प्रचार सुरू केला होता.पक्ष प्रवेशा नंतर सौ.संध्याताई देशमुख यांनी परळी शहरातील सर्व प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी वर भर दिला.त्यांच्या सोबत कैसर शेख, फरजाना शेख,रोजाना शेख, उमा गर्जे,शिवकन्या भोसले,सीता ताई हिंगणे,सावित्री क...
इमेज
  माकप तालुक्यातील जिप चे तीन गट व त्याअंतर्गतच्या सहा गणात उमेदवार देणार-  कॉ गंगाधर पोटभरे  परळी वैजनाथ ता 12 प्रतिनिधी        परळी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गट व त्याअंतर्गत येणारे पंचायत समितीच्या सहा गणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष उमेदवार उभा करणार असल्याची माहिती पक्षाचे तालुका सचिव कॉ गंगाधर पोटभरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.        मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची बुधवारी दि 12 रोजी सिरसाळा येथे तालुका कमीटीची बैठक झाली. त्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या संभाव्य निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. माकप कायम भाजप व त्यांच्या युतीच्या विरोधातील पुरोगामी विचाराच्या पक्षां सोबत निवडणुक आघाडी करीत आला आहे. या निवडणुकीत माकप ची तसीच भुमिका राहणार आहे. मागील काही वर्षात तालुक्यात माकप च्या वतीने शेतकऱ्यांरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर लढे आंदोलने केलेले आहेत. 2018 साली पिक विम्याच्या प्रश्नावर केलेल्या आंदोलनामुळे हजारों शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपये मिळाले. तसेच तालुक्यातील विज, घरकुल, गायरान, रेशन यासह विविध प...
इमेज
  बस स्थानकावर गर्दीचा गैरफायदा घेऊन दागीने चोरी करणाऱ्या आरोपींचा संभाजीनगर, परळी पोलीसांकडून पर्दाफाश, मु‌द्देमालासह आरोपी ताब्यात।.. फिर्यादी नामे प्रतिक विलास वाघमारे रा. अंकुश नगर तालुका जिल्हा बीड यांनी पोलीस स्टेशन संभाजीनगर येथे फिर्याद दिली की, त्याची आई सुनिता विलास वाघमारे दिनांक-04/11/2025 रोजी नांदेडहून बीड येथे जात असताना परळी बस स्टॅन्ड येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अनोळखी आरोपीने तिचे गळ्यातील 13 ग्रॅम वजनाचे 1,45,000/ रुपयाचे मिनी गंठण चोरून नेले आहे, वगैरे फिर्यादीवरून पो.स्टे. संभाजीनगर गुरनं 230/2025 कलम 303 (2) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरीष्ठांनी तपास अधिकारी यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या. त्यावरून तपासीक अंमलदार पोह/416 साजीद पठाण यांनी गुन्हयाचे तपासात बस स्थानक परळी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहून आरोपी निष्पन्न केले. आरोपी ऑटो मधून गेल्याचे दिसून आले. सदर मार्गावरील परळी शहरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्यांचा मार्ग शोधला असता शहराच्या बाहेर दोन किलोमीटर गेले व ते...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!