पोस्ट्स

मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

२ फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर तर ३ तारखेला लातूर ,सोलापूर जिल्ह्यात जाहीर सभा

इमेज
स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा उद्यापासून जि. प. निवडणूक प्रचारार्थ झंझावाती दौरा २ फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर तर ३ तारखेला लातूर ,सोलापूर जिल्ह्यात जाहीर सभा मुंबई, दि. ०१--- राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी  स्टार प्रचारक तथा राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचा उद्यापासून झंझावाती प्रचार दौरा सुरू होत आहे.  उद्या २ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच  तर 3 फेब्रुवारीला रोजी लातूर जिल्ह्य़ात तीन व सोलापूर जिल्ह्यात दोन जाहीर सभा त्या घेणार आहेत.       जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये अधिकाधिक भाजपाचे उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने ना. पंकजाताई मुंडे यांच्या जाहीर सभांना ठिकठिकाणी प्रचंड मागणी आहे. त्या अनुषंगाने पक्षाच्या वतीने ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचार दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.  02 फेब्रुवारी रोजी सकाळी विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे जाणार असून तिथून दुपारी हेलिकॉप्टरने जिल्ह्यातील विविध जि....

विकसित भारताच्या दिशेने महत्वाचे पाऊल

इमेज
  पशुसंवर्धन क्षेत्रात रोजगार व उद्योजकतेला चालना देणारा  अर्थसंकल्प ना. पंकजा मुंडे यांनी केले केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत मुंबई, दि. १ -  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात कृषि व पशुसंवर्धन क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी अत्यंत स्वागतार्ह असून या माध्यमातून ग्रामीण व निमशहरी भागात दर्जेदार रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे मंत्री पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, पशुसंवर्धन क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या सवलती, नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय, प्रयोगशाळा यामुळे देशातील पशुपालकांना मोठा लाभ होणार आहे. याबद्दल मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी आभार मानते. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अग्...

सर्व स्तरातून अभिनंदन...

इमेज
  इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी समीक्षा यल्लावाड हिची निवड परळी , दि. ०१ / ०२ / २०२६ (प्रतिनिधी ) परळी तालुक्यातील वसंतनगरच्या उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी समीक्षा राजकुमार यल्लावाड हिची महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निवड परीक्षेत यश संपादन केल्यामुळे तिची इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी संपूर्ण राज्यातून केवळ १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये परळीतील समीक्षा राजकुमार यल्लावाड हिचा समावेश झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. समीक्षा यल्लावाड ही  उच्च माध्यमिक आश्रम शाळा, वसंतनगर येथे शिक्षण घेत आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजयजी राठोड, सचिव रामेश्वर राठोड,महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण पवार, माजी सरपंच डी एस राठोड, सरपंच विजय राठोड  याबरोबरच  प्रा.नागरगोजे सर, प्रा.देशमुख सर, प्रा.सुरनर सर, प्रा.परळीकर, प्रा.आगरे, प्रा.जाधव,सर प्रा.मोरे सर, स्वामी सर, गीते सर,राम राठोड सर ( प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक)  कै.लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण...

पत्रकार संतोष जुजगर यांना पितृशोक

इमेज
  विष्णुअप्पा वामनअप्पा जुजगर यांचे अल्पशा आजाराने निधन  पत्रकार संतोष जुजगर यांना पितृशोक परळी वैजनाथ/ प्रतिनिधी .....परळी वैजनाथ येथील रहिवासी, सामाजिक धार्मिक कार्यात सक्रिय कार्यकरत होते विष्णुअप्पा वामनअप्पा जुजगर (वय ७८) यांचे अंबाजोगाई येथे अल्पशा आजाराने आज रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज रविवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी दुपारी ठीक २.०० वाजता अंबाजोगाई येथे करण्यात आला. तसेच राख साठवण्याचा विधी मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी 7.00 वाजता बोरुळ तलाव अंबाजोगाई येथे होणार आहे. स्व. विष्णुअप्पा जुजगर हे समाजहिताची जाण ठेवणारे, धार्मिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेणारे व सर्वसामान्यांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले — वामन (दादा) जुजगर व पत्रकार संतोष जुजगर, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते पत्रकार संतोष जुजगर यांचे वडील होत.

नुकतेच प्रदान झाले प्रमाणपत्र ;सर्व स्तरातून अभिनंदन

इमेज
सौ.अर्चना मधुकर गित्ते यांचे संशोधन क्षेत्रात घवघवीत यश; आंतरराष्ट्रीय पातळीवर डिझाइन नोंदणी यशस्वी परळी वैजनाथ | प्रतिनिधी      परळी वैजनाथ येथील संशोधक सौ. अर्चना मधुकर गित्ते यांच्या  संकल्पनेच्या डिझाइनला युनायटेड किंगडम इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफिस (UK IPO) कडून अधिकृत डिझाइन नोंदणी (Registered Design) प्राप्त झाली आहे.   याबाबतचे डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले आहे. हे डिझाइन आंतरराष्ट्रीय डिझाइन वर्गीकरणांतर्गत नोंदणीकृत झाले आहे. सखोल अभ्यास, प्रयोग आणि तांत्रिक विश्लेषणातून विकसित झालेल्या या संकल्पनेमुळे मत्स्यपालन क्षेत्रातील स्वयंचलित खाद्य व्यवस्थापनास चालना मिळणार आहे. शैक्षणिक संशोधन केवळ प्रबंधापुरते मर्यादित न राहता त्याचे बौद्धिक संपदा हक्कांमध्ये (Intellectual Property Rights) रूपांतर होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.या यशामुळे विद्यापीठीय संशोधन, नवोन्मेष आणि उद्योगाभिमुख अभ्यास यांतील दुवा अधिक मजबूत होत असून, पीएचडी विद्यार्थ्यांसाठी संशोधनाचे व्यावहारिक व जागतिक मूल्य अधोरेखित झाले आहे. शिक्षण क्षेत्रात...

शरद पवार म्हणाले, कोण आहेत हे नरेश अरोरा ?

इमेज
अजितदादांच्या निधनानंतर  महाराष्ट्राच्या राजकारणात अचानकपणे चर्चेत आलेले कोण आहेत नरेश अरोरा? अ जित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरू होती. यावेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं घेतली जात असतानाच शुक्रवारी (30 जानेवारी) दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव समोर आलं.30 जानेवारीला दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक घडामोडी घडल्या. पक्षातील नेत्यांच्या बैठका झाल्या. उपमुख्यमंत्रिपदी कोणाची नेमणूक करायची याबाबत चर्चा झाली. त्यानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होतील, असं सांगण्यात येऊ लागलं.याच दरम्यान निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा हेही बारामती येथे पोहोचले. त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याचे काही माध्यमांनी सांगितलं. या भेटीनंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होतील अशा बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या. हा निर्णय घेण्यात अरोरा यांची भूमिका काय होती हे कालांतराने स्पष्ट होईल. परंतु, महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय घडामोडीत ते चर्चेचा विषय ठरले आहेत. कोण आहेत हे नरेश अरोरा ? नरेश अरोरा हे डिझ...

विशेष लेख: अजितदादांच्या आठवणी......

इमेज
परळीवर बारामती प्रमाणे प्रेम करणारे एक शिस्तबद्ध,  कर्मनिष्ठ नेतृत्व : स्व. अजितदादा पवार परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या शब्दबद्ध उत्कट भावना   आ मच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या श्रद्धांजलीपर सर्वपक्षीय शोकसभा परळी वैजनाथ नगरीमध्ये आज आयोजित करण्यात आली. यावेळी सभेसमोर अत्यंत वेदनादायी मनाने शोकप्रस्ताव सादर केला. निष्काम कर्मयोगी, कर्तव्यपरायण व निःस्वार्थ लोकसेवक राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कर्मनिष्ठ नेतृत्व गमावले आहे. परळी वैद्यनाथ नगरीचे आणि दादांचे नाते तसे जुनेच; मात्र आ. धनंजयजी मुंडे साहेबांमुळे अधिक दृढ झाले. सन २००९ मध्ये विधान परिषद निवडणुकीत विधानसभेतील आमदार सदस्यांचे कमी पडणारे मतदान स्व. दादांनी मिळवून दिले आणि धनुभाऊंचा आणि दादांचा ऋणानुबंध सुरू झाला. तद्नंतर नगर परिषद निवडणूक २०११ मध्ये आम्ही १२ सदस्यांनी अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी परिवारात आमचा प्र...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....