प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

शरद पवार म्हणाले, कोण आहेत हे नरेश अरोरा ?

अजितदादांच्या निधनानंतर  महाराष्ट्राच्या राजकारणात अचानकपणे चर्चेत आलेले कोण आहेत नरेश अरोरा?

जित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरू होती. यावेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं घेतली जात असतानाच शुक्रवारी (30 जानेवारी) दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव समोर आलं.30 जानेवारीला दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक घडामोडी घडल्या. पक्षातील नेत्यांच्या बैठका झाल्या. उपमुख्यमंत्रिपदी कोणाची नेमणूक करायची याबाबत चर्चा झाली. त्यानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होतील, असं सांगण्यात येऊ लागलं.याच दरम्यान निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा हेही बारामती येथे पोहोचले. त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याचे काही माध्यमांनी सांगितलं. या भेटीनंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होतील अशा बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या. हा निर्णय घेण्यात अरोरा यांची भूमिका काय होती हे कालांतराने स्पष्ट होईल. परंतु, महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय घडामोडीत ते चर्चेचा विषय ठरले आहेत.

कोण आहेत हे नरेश अरोरा ?

नरेश अरोरा हे डिझाइनबॉक्स्ड या कंपनीचे सहसंस्थापक आणि संचालक आहेत. ही कंपनी राजकीय प्रचार मोहीम-व्यवस्थापन, डिजिटल मीडिया स्ट्रेटॅजिस्ट, सोशल मीडिया कॅम्पेन आणि ब्रँडिंग यावर काम करते.अरोरा यांनी 2011 मध्ये आपल्या एका भागीदारासोबत डिझाइनबॉक्स्ड डिजिटल मीडिया मार्केटिंग कंपनी सुरू केली. नंतर ही कंपनी निवडणूक सल्लागार म्हणून झपाट्याने पुढे आली.अरोरा आणि त्यांच्या टीमने 2016 मध्ये निवडणूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी 4 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघांची डिजिटल आणि प्रचार मोहीम सांभाळली.या कंपनीने पंजाब, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक यांसारख्या अनेक महत्त्वाच्या डिजिटल प्रचार मोहिमा हाताळल्या आहेत.त्याचबरोबर छत्तीसगड, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांतील राजकीय प्रचार मोहिमांचे नेतृत्व केले आहे. अरोरा यांनी काँग्रेसबरोबर मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे.नरेश अरोरा हे मुळचे अमृतसरचे आहेत. त्यांच्या कुटुंबाचा कापड व्यवसाय होता. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं. नरेश अरोरा यांनी आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेलं आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय पातळीवर क्रिकेटही खेळलं आहे.

          लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली कामगिरी नोंदवता आली नव्हती. त्यांचा एकच खासदार निवडून आला होता. एकंदर महायुतीची कामगिरीच निराशाजनक ठरली होती.हे अपयश पुसून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली होती. त्याचाच भाग म्हणून विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार मोहिमेचं काम नरेश अरोरा यांच्या डिझाइन बॉक्स्डकडे देण्यात आलं.या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने साधारण 50 जागा लढवल्या आणि त्यांनी 41 जागांवर विजय मिळवला. या यशाचं श्रेय महायुतीच्या कामगिरीबरोबरच नरेश अरोरा यांच्या राजकीय मोहिमेलाही दिलं गेलं.त्यांनी राबवलेल्या प्रचार मोहिमांमुळे पक्षाला चांगलं यश मिळाल्याचं बोललं जाऊ लागलं. नरेश अरोरा यांच्या कंपनीने निवडणूक रणनीती, डिजिटल कॅम्पेन राबवलं होतं.दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाच्या नावाबाबत चर्चा सुरू असताना नरेश अरोरा यांच्या भूमिकेविषयीही माध्यमांमधून बोललं जाऊ लागलं,नरेश अरोरा यांनी शुक्रवारी (30 जानेवारी) बारामतीला दिलेल्या भेटीचा उद्देश हा पवार कुटुंबीयांचं सांत्वन करणे हा होता, असं स्पष्ट केलं. पक्षांतर्गत विषय असल्याचं सांगून त्यांनी राजकीय विषयावर भाष्य करणं टाळलं होतं.

पक्षाची संपूर्ण डिजिटल आणि प्रचार रणनीती हाताळली

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून नरेश अरोरा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जोडले गेले. विधानसभेपासून अजित पवार यांच्यासोबत असल्याचे ते सांगतात. त्यांनी पक्षाची संपूर्ण डिजिटल आणि प्रचार रणनीती हाताळली. त्यांच्या सल्ल्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व प्रचार साहित्यात, होर्डिंग्ज, पोस्टर्स, स्टेज सजावट आणि सोशल मीडिया जाहिरातींमध्ये गुलाबी रंग प्रमुखपणे वापरायला सुरुवात केली. हा रंग स्त्री-ऊर्जा, सौम्यता आणि महिलांच्या भावनांशी जोडलेला आहे.

पक्षाची ब्रँडिंग बदलण्यासाठी गुलाबी रंग

अजित पवार स्वतः अनेकदा गुलाबी जॅकेट घालून दिसले. हा बदल ग्रामीण भागातील पारंपरिक प्रतिमेच्या विरोधात पवारांना शहरी, आधुनिक आणि लाडक्या बहिणींचा जवळचा नेता म्हणून सादर करण्यासाठी करण्यात आला. विशेषतः महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पक्षाची ब्रँडिंग बदलण्यासाठी हा रंग निवडला गेला.अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. अरोरा यांनी जनसन्मान यात्रा, घटक-विशिष्ट घोषणापत्रे, कॅम्पेन आणि पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यावर भर दिला. त्यांनी अजित पवारांना अधिव हसतमुख, सौम्य आणि लोकाभिमुख दाखवण्यासाठी बदल सुचवले.अरोरा यांनी सांगितले होती की, अजित पवार गेल्या ३० वर्षांपासून लपवलेली हसण्याची सवय आता दिसू लागली आहे. त्यांच्या रणनीतींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत मजबूत स्थान मिळाले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या