परळीकरांच्या वतीने शोभायात्रा काढत मंगलमय स्वागत...

इमेज
  म्हैसूर मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांनी घेतलं ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन मंगल वाद्यासह जयघोषात महास्वामीजींचे परळीकर भाविकांनी केलं आत्मीय स्वागत वैद्यनाथ मंदिराचा अनादी काळापासूनचा वारसा अतिशय चांगला जतन केल्याचे व्यक्त केले समाधान परळी वैजनाथ, प्रतिनिधी...            म्हैसूर येथील येडतोर श्री योगानंदेश्वर सरस्वती मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांनी आज (दि.२३) बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. परळीकर भाविक भक्तांच्या वतीने महास्वामीजींचे जोरदार मंगलमय स्वागत करण्यात आले. मंगल वाद्यांसह जयघोषात संत जगमित्रनागा मंदिर ते वैद्यनाथ मंदिर अशी स्वागत शोभायात्रा काढण्यात आली.            आद्य शंकराचार्यांच्या शृंगेरी शारदा पिठाच्या अद्वैत परंपरेतील महान विभूती आणि अद्वैत वेदांताच्या प्रचार- प्रसारासाठी कार्यरत असणारे, संपूर्ण देशभर प्रवास करून धर्मजागृती संस्कार आणि अध्यात्मिक मार्ग...

२ फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर तर ३ तारखेला लातूर ,सोलापूर जिल्ह्यात जाहीर सभा

स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा उद्यापासून जि. प. निवडणूक प्रचारार्थ झंझावाती दौरा




२ फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर तर ३ तारखेला लातूर ,सोलापूर जिल्ह्यात जाहीर सभा

मुंबई, दि. ०१---

राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी  स्टार प्रचारक तथा राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचा उद्यापासून झंझावाती प्रचार दौरा सुरू होत आहे.  उद्या २ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच  तर 3 फेब्रुवारीला रोजी लातूर जिल्ह्य़ात तीन व सोलापूर जिल्ह्यात दोन जाहीर सभा त्या घेणार आहेत.

      जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये अधिकाधिक भाजपाचे उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने ना. पंकजाताई मुंडे यांच्या जाहीर सभांना ठिकठिकाणी प्रचंड मागणी आहे. त्या अनुषंगाने पक्षाच्या वतीने ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचार दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.  02 फेब्रुवारी रोजी सकाळी विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे जाणार असून तिथून दुपारी हेलिकॉप्टरने जिल्ह्यातील विविध जि.प. गटांमध्ये पंकजाताई मुंडे यांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 12. वा पिशोर ता. कन्नड, दुपारी 01.30 वा घाटनांद्रा ता. सिल्लोड, दुपारी  03 वा. चौका, दुपारी 05 वा आडगाव बु. ता. फुलंब्री रात्रौ 07 वा बजाज नगर वाळुज ता. छत्रपती संभाजीनगर तर 03 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा किनगाव ता. अहमदपूर जि.लातूर, दुपारी 12.30 वा कोळनूर ता.जळकोट, दुपारी 01.30 वा जानवळ ता. चाकूर तर  सायं. 4.30 वा मंद्रुप ता.जि. सोलापूर, संध्या 06 वा कुंभारी ता.जि. सोलापूर याठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत  अशी माहिती ना पंकजाताई मुंडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!