नुकतेच प्रदान झाले प्रमाणपत्र ;सर्व स्तरातून अभिनंदन

सौ.अर्चना मधुकर गित्ते यांचे संशोधन क्षेत्रात घवघवीत यश; आंतरराष्ट्रीय पातळीवर डिझाइन नोंदणी यशस्वी

परळी वैजनाथ | प्रतिनिधी
     परळी वैजनाथ येथील संशोधक सौ. अर्चना मधुकर गित्ते यांच्या  संकल्पनेच्या डिझाइनला युनायटेड किंगडम इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफिस (UK IPO) कडून अधिकृत डिझाइन नोंदणी (Registered Design) प्राप्त झाली आहे.

  याबाबतचे डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले आहे. हे डिझाइन आंतरराष्ट्रीय डिझाइन वर्गीकरणांतर्गत नोंदणीकृत झाले आहे. सखोल अभ्यास, प्रयोग आणि तांत्रिक विश्लेषणातून विकसित झालेल्या या संकल्पनेमुळे मत्स्यपालन क्षेत्रातील स्वयंचलित खाद्य व्यवस्थापनास चालना मिळणार आहे. शैक्षणिक संशोधन केवळ प्रबंधापुरते मर्यादित न राहता त्याचे बौद्धिक संपदा हक्कांमध्ये (Intellectual Property Rights) रूपांतर होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.या यशामुळे विद्यापीठीय संशोधन, नवोन्मेष आणि उद्योगाभिमुख अभ्यास यांतील दुवा अधिक मजबूत होत असून, पीएचडी विद्यार्थ्यांसाठी संशोधनाचे व्यावहारिक व जागतिक मूल्य अधोरेखित झाले आहे. शिक्षण क्षेत्रातून संशोधन व नवकल्पनांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होऊ शकते, याची ही प्रेरणादायी बाब मानली जात आहे. या यशस्वी वाटचालीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!