युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:काकाणी हॉस्पीटल सोमवार पासून रूग्णांच्या सेवेत* *अस्थिरोग तज्ञ डॉ.रोहित कोकाणींचा रूग्णांना लाभ*

 *काकाणी हॉस्पीटल सोमवार पासून रूग्णांच्या सेवेत*

*अस्थिरोग तज्ञ डॉ.रोहित काकाणींचा रूग्णांना लाभ*


परळी (प्रतिनिधी)*

सर्वपरिचित अस्थिरोग तज्ञ डॉ.रोहित काकाणी यांचा परळी व परिसरातील रूग्णांना लाभ मिळणार असून जुने ढाकणे हॉस्पीटल, गणेशपार रोड, परळी वैजनाथ येथे आता काकाणी हॉस्पीटल रूग्णांच्या सेवेत आज दि.30 नोव्हेंबर पासून रूग्णांच्या सेवेत सुरू होत आहे.

गणेशपार रोडवरील जुन्या ढाकणे हॉस्पीटलच्या जागेत स्वतंत्रपणे काकाणी हॉस्पीटल सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी होमिओपॅथी व जनरल प्रॅक्टीशियन डॉ.प्रिया आर.काकाणी या सकाळी 10 ते दुपारी 1 तर अस्थीरोग तज्ञ डॉ.रोहित काकाणी हे दुपारी 4 ते 8 या वेळेत रूग्णांना सेवा बजावणार आहेत. काकाणी हॉस्पीटलचा आजपासून रूग्णांच्या सेवेत शुभारंभ होणार आहे. या हॉस्पीटलचा परळी व परिसरातील रूग्णांना वैद्यकिय सेवेचा लाभ होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हॉस्पीटलचा शुभारंभ अत्यंत साधेपणाने करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या