MB NEWS:आष्टीत पुन्हा एका महिलेवर बिबट्याचा हल्ला; नरडीला घेतला चावा*

 *आष्टीत पुन्हा एका महिलेवर बिबट्याचा हल्ला; नरडीला घेतला चावा*



 आष्टी : प्रतिनिधी

तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने रविवारी (दि. 29) सकाळी देखील एका महिलेवर हल्ला केला. यात महिलेच्या गळ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. 

आष्टी तालुक्यातील पारगाव बोराडे येथील वयोवृद्ध महिला शालनबाई शहाजी भोसले भाजी आणण्यासाठी रविवारी सकाळी शेतात गेली होती. या वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने शालनबाई यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांच्या नरडीलाच बिबट्याने पकडले. मात्र महिलेने आरडा- ओरडा केल्यानंतर बिबट्याने तिथून धूम ठोकली. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून गळ्यावर मोठी जखम झाली आहे. तिला उपचारासाठी आष्टी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !