MB NEWS-शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे.... गुरू-शिष्य स्मरण यात्रेने परळी तालुक्यात शिवविचारांचा जागर

  शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे.... 



गुरू-शिष्य स्मरण यात्रेने परळी तालुक्यात शिवविचारांचा जागर 

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

-----------------------------

लेखन - ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे

मराठवाडा अध्यक्ष - अखिल भारतीय वारकरी मंडळ

----------------------------- 

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विश्व वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी 2022 रोजी उत्साहात जगभरात साजरी होणार आहे. यानिमित्ताने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सर्वत्र घेतले जातील. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यात एक विशेष उपक्रम मागील अनेक दिवसांपासून राबवला जात आहे. राज्याचे समाजीज न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे आणि जिल्हा नियोजन व विकास समितीचे सदस्य तथा परळी नगर पालिकेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली "गुरू-शिष्य स्मरण यात्रा" काढण्यात आली आहे. 



यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वैजनाथ सोळंके, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी, ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, जालिंदर नाईकवाडे, नाथ प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शंकर कापसे, भरत शिंदे यांच्यासह संयोजन समितीसह अनेकांनी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रमाता जिजाऊ बहुद्देशीय प्रतिष्ठानकडून याचे आयोजन केले आहे. परळी तालुक्यातील गावागावात ही यात्रा जात असून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील गुरू-शिष्याच्या नात्याबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. दि.02 फेब्रुवारी रोजी संत तुकाराम महाराजांच्या जन्मदिनाच्या औचित्यावर शहरात मिरवणूक काढून यात्रेला सुरुवात झाली, तर शिवजयंतीनिमित्त सामूहिक विवाह सोहळ्याने समारोप होत आहे.

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराज आणि जिजाऊ यांना गुरुस्थानी मानत असत. शिवरायांच्या संघर्षाच्या काळात संत तुकाराम महाराजांनी त्यांना गुरुमार्ग तर दाखवलाच परंतु प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपाची खूप मोठी मदत केली. स्वराज्याच्या उभारणीमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले त्यात मावळ्यांना एकत्र करण्याचे अत्यंत कौशल्याचे आणि जिकिरीचे काम होते. आपल्या कीर्तनातून संत तुकोबारायांनी समाजाचे प्रबोधन केले. ते आपल्या अभंगात म्हणतात...

🏵️हे देखील वाचा-🏵️ *वक्फ जमीन प्रकरणात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी अटकेत*

🌑 *परळीत अरुणोदय मार्केट मध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या*

शिव तुझे नाव ठेविले पवित्र

छत्रपती सूत्र विश्वाचे....

राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतः तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला उपस्थित असत. तुकाराम महाराजांचे वारकरी आणि छत्रपतींचे "वार"करी असे त्यावेळीचे सूत्र होते. अनिष्ठ रूढी, परंपरा आणि बिघडलेल्या व्यवस्थेला योग्य दिशेने नेण्यासाठी आपल्या विचारांचा प्रहार कीर्तनाच्या माध्यमातून तुकोबाराय करायचे. त्यांनी पेरलेले विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे स्वराज्यासाठी लढायचे. गुरू-शिष्यांचे हे नाते, त्यांचे ते कार्य आजच्या समाजापर्यंत पोचले पाहिजे यासाठी ही "गुरू-शिष्य स्मरण यात्रा" काढण्यात आली. संत तुकाराम महाराजांच्या जन्म तारखेला या यात्रेचा प्रारंभ करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी या यात्रेचा समारोप होत आहे. 

🏵️हे देखील वाचा-⭕ *एक लाख तेहतीस हजार रोख रक्कम असलेली बॅग पळवली*

महाराष्ट्रतच नव्हे तर संपूर्ण देशभरात या अभिनव संकल्पनेचा बोलबाला झाला यापेक्षा जो विचार या माध्यमातून पोचवायचा होता, जो इतिहास समाजासमोर मांडायचा होता तो प्रभावीपणे पोचला हे या यात्रेचे यश आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वैजनाथ सोळंके, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र परदेशी, ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, जालिंदर नाईकवाडे, नाथ प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शंकर कापसे, भरत शिंदे यांनी पुढाकार घेऊन परिश्रम घेतले. 

🏵️हे देखील वाचा-🟥 *नौकरी:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ९५० पदांसाठी भरती*

शिवविचारांची पेरणी

जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यात "गुरू-शिष्य स्मरण यात्रा" हा उपक्रम घेण्यात आला. गावोगावी पोचत तिथे कार्यक्रम घेत शिवविचारांचा जागर घालण्यात आला. गाव तिथे ग्रामस्थांनी अतिशय उत्साहात स्वागत केले. प्रत्येक गावात यात्रा पोचल्यानंतर तिथे इतिहासाची उजळणी करणाऱ्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यात उद्योजक शिवाजी महाराज, शिवाजी - द मॅनेजमेंट गुरू, शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र, जिजाऊ - मदर ऑफ ऑल गुरुज, शिवाजी महाराज अँड एमबीए, शिवाजी महाराजांची डायरी, अभंग शतक आणि अभंग गाथा आदी ग्रंथांचा समावेश होता. 

🏵️हे देखील वाचा-🔸 *दुर्गम भागातील ऊसतोडणी कामगारांच्या नोंदणीची व्यवस्था करा* 🔸 *पुण्यातील शिवाजीनगर भागात होणार महामंडळाचे कार्यालय तर परळीत होणार उपकार्यालय*

जयंतीनिमित्त विशेष उपक्रम

दि.19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ज्यामध्ये शहरातून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार असून, सामुदायिक विवाह सोहळ्यातील नावरदेवांना घोड्यावर बसून मिरवण्यात येणार आहे. दुपारच्या सुमारास छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात येणार आहे. विविध समाजातील मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

🏵️हे देखील वाचा-🔷 *राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्चला अधिवेशन ३ मार्चपासून*

-----------------------------------------
MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
-----------------------------------------



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !