इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-वक्फ जमीन प्रकरणात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी अटकेत

  वक्फ जमीन प्रकरणात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी अटकेत







⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

बीड......

एसआयटीकडून मंडळ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. प्रदीप पांडुळे, नायब तहसील भूम व शिवशंकर गंगाधर सिंघनवाड मंडळाधिकारी आष्टी, असे अटक  करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. प्रदीप पांडुळे हे अगोदर आष्टी येथे होते तर आता बदली होऊन ते भूम येथे कार्यरत आहेत. 

हे देखील पहा-⭕ *एक लाख तेहतीस हजार रोख रक्कम असलेली बॅग पळवली*

वक्फ बोर्डाची जमिन मदतमाश जाहिर करुन, भलत्यांच्याच नावे केल्याचा गुन्हा आष्टी पोलीसात  दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये या दोघांनाही मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. 

हे देखील पहा- 🌑 *परळीत अरुणोदय मार्केट मध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या*

मराठवाड्यातील वक्फ बोर्डाच्या जवळपास ३५ हजार एकर जमिनीवर भूमाफियांनी कब्जा केल्याचा आरोप करण्यात आला होता.  आतापर्यंत या प्रकरणामध्ये मराठवाड्यात ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बीडच्या  आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील दर्गा गैबीपीर साहेब यांच्या ७१ एक्कर ८९ गुंठे जमीन घोटाळ्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी एन.आर. शेळकेला अटक केल्यावर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती.

--------------------------------------------------------------------
MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
--------------------------------------------------------------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!