MB NEWS-परळीत साकारणार 'सेवागड़':सोमवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन

 *बोले तैसा चाले... ना.धनंजय मुंडेंनी केली बंजारा समाज बांधवांना दिलेल्या शब्दाची पूर्ती*



परळीत साकारणार 'सेवागड़':सोमवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

परळी (दि. 19) - : बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, या उक्तीप्रमाणे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाला दिलेल्या शब्दाची पूर्तता केली आहे. परळी शहरातील बसवेश्वर कॉलनी परिसरात बंजारा समाजासाठी स्वतंत्र व सुसज्ज अशा सभागृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. 


'सेवागड़' या नावाने उभारण्यात येणाऱ्या या सभागृहाच्या निर्माणसाठी ना. धनंजय मुंडे यांनी ग्रामविकास विभागा कडून २५१५ या हेड मधून 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. या सभागृहाच्या बांधकामाचे सोमवार दि. 21 फेब्रुवारी रोजी ना. मुंडे यांच्या हस्ते व पोहरादेवी गड महंत जितेंद्र महाराज व मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात येणार आहे. 

🏵️ *शिवरायांना कलात्मक वंदन:युवा चित्रकाराचे सर्व स्तरातून कौतुक.*

परळी मतदारसंघातील बंजारा समाज बांधवांना विविध धार्मिक कार्ये, सार्वजनिक कार्यक्रम आदी करता यावेत यासाठी स्वतंत्र सभागृह बांधून देण्याचा शब्द धनंजय मुंडे यांनी दिला होता, या शब्दाची पूर्तता केल्याबद्दल बंजारा समाजातील दत्ता सखाराम राठोड सरपंच वसंतनगर, वसंत राठोड, साहेबराव पुराजी चव्हाण, प्रभाकर हिराजी राठोड, रावसाहेब धुराजी राठोड, भगवान चव्हाण, रमेश चव्हाण, सुनील पवार, सुग्रीव पवार, रमेश पवार, कुंडलिक जाधव, पंडित जाधव, सुभाष राठोड, भीमराव राठोड, हारलाल जाधव, लक्ष्मण पवार, विजय पवार, लक्ष्मण चव्हाण, भगवान जाधव, राजकुमार राठोड, किशन चव्हाण, विनायक राठोड, शरद राठोड, रामजी जाधव, लिंबाजी जाधव, पंडित जाधव, लक्ष्मण दगडू राठोड, बाबासाहेब चव्हाण, प्राचार्य अरुण पवार, प्राचार्य सुरेश पवार, मधुकर चव्हाण, शाम राठोड, अजित राठोड, रमेश पवार, दीपक राठोड,आदींनी ना. धनंजय मुंडे तसेच नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांचे आभार मानले आहेत.

-----------------------------------------------------------------

आवर्जून बघा:🏵️ *शिवजयंतीला ना.धनंजय मुंडे यांनी केली परळीत महत्त्वपूर्ण घोषणा.*

🏵️ *आवश्य बघा: परळीत शिवजयंतीचा उत्साह,रोशनाई आणि दैदिप्यमान सजावट.*

⭕ *शिवजयंती निमित्त सामाजिक उपक्रम: ना. धनंजय मुंडेच्या उपस्थितीत झाला सामुदायिक मंगल परिणय सोहळा*

🟥 *अध्यात्मिक गौरव: शंकराचार्य पिठाकडून बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर सेलूकर महाराजांना "यज्ञ मार्तंड" उपाधी*

🏵️ दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

🏵️हे देखील वाचा-🏵️ *वक्फ जमीन प्रकरणात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी अटकेत*

🌑 *परळीत अरुणोदय मार्केट मध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या*

🏵️हे देखील वाचा-⭕ *एक लाख तेहतीस हजार रोख रक्कम असलेली बॅग पळवली*

-----------------------------------------
MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
-----------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार