परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-_भाविकांच्या भावना संस्थानला निवेदन देऊन अंतिम निर्णयापर्यंत पाठपुरावा करणार_

 संत गजानन महाराज पालखी सोहळा परळीतील नगरप्रदक्षिणा मार्ग पुर्ववत ठेवा - चंदुलाल बियाणी



 भाविकांच्या भावना संस्थानला निवेदन देऊन अंतिम निर्णयापर्यंत पाठपुरावा करणार


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       वैद्यनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ येथे आषाढी वारी निमित्त येणारा संत गजानन महाराज पालखी सोहळा परळीत वर्षानुवर्षे चालत आलेल्या नगरप्रदक्षिणा मार्गावर पुर्ववत ठेवा  अशी मागणी श्री.वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकास समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.याबाबतपरळीकर भाविकांच्या भावना संस्थानला निवेदन देऊन कळवणार असुन नगरप्रदक्षिणा मार्ग पुर्ववत होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल असे चंदुलाल बियाणी यांनी सांगितले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा:🛑 *यावर्षीपासुन दारात येणाऱ्या पालखीला भाविक मुकणार; संत गजानन महाराज पालखीचा परळीतील नगर प्रदक्षिणा मार्ग बदलण्याचा घाट!* _हा तर श्रद्धेचे दमन व भक्तीभेदाचा डाव - भाविकांत नाराजीचा सूर_

           याबाबत काढण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  पंढरपूर आषाढी वारी निमित्त निघणारा श्रींचा पालखी सोहळा मार्गक्रमण करीत परळी वैजनाथ येथे दोन दिवस मुक्कामी असतो ही परळीकरांसाठी भाग्याची बाब आहे.यावर्षीही हा पालखी सोहळा परळीत येणार आहे मात्र पुर्वापार चालत आलेल्या पालखी मार्गावरून हा सोहळा न जाता त्यात बदल करत असल्याची माहिती समोर आली आहे.हे पुर्णतः चुकीचे होणार असुन भाविकांच्या श्रद्धेचे एकप्रकारे दमन होणार आहे. पालखी सोहळा परळीत आल्यानंतर वर्षानुवर्षे भाविक भक्तांकडून मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने स्वागत केले जाते. राणी लक्ष्मीबाई टॉवर- गणेश पार रोड -गणेशपार- नांदूरवेस- मार्गे नेहरू चौक- संत जगमित्र नागा मंदिर अशा प्रकारची नगरप्रदक्षिणा करून हा पालखी सोहळा मार्गक्रमण करतो. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही धार्मिक परंपरा बनलेली आहे. दरवर्षी संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे परळी शहरात जोरदार स्वागत होते.जुन्या गाव भागात या पालखी सोहळ्याचा एक वेगळाच धार्मिक महोत्सव साजरा केला जातो. ठिक ठिकाणी भाविक सडा- रांगोळ्या, ओवाळणी अशा मंगलमय वातावरणामध्ये भक्तिरसात रममाण होतात. संत गजानन महाराज पालखी सह अन्य पालख्या व दिंड्याही याच मार्गावरून नगर प्रदक्षिणा करतात. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा खंडित करण्याचा हा चुकीचा निर्णय घेतला जात आहे.याविषयी तमाम परळीकर भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून संस्थांनने याबाबत   भाविकांच्या भावना समजून घ्याव्यात व  पूर्वापार चालत आलेला पालखी मार्ग कायम ठेवण्याबाबत अश्वस्त करावे असे म्हटले आहे.

     दरम्यान याबाबत संस्थांनकडे पाठपुरावा करण्यात येणार असुन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून प्रयत्न करुन हा चुकीचा निर्णय रद्द करुन पूर्वापार चालत आलेला पालखी मार्ग कायम ठेवण्याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल असे चंदुलाल बियाणी यांनी सांगितले आहे.

-----------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

🌑 *शेळीनं खाल्ला दारात लावलेल्या झाडाचा शेंडा...वाद पोहचला हाणामारी पर्यंत...झाली डोके फोडाफोडी !*

Click:🛑 *श्री.परशुराम जन्मोत्सव:परळीत ब्रह्मवृंदांची 'एकजुट डिप्लोमसी'; अबालवृद्ध,महिलांचा मोठा सहभाग.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


🌑 *खळबळजनक*🌑 _परळीत धारदार शस्त्राने वार करून *युवकाची हत्या*;एकास पोलीसांनी घेतलं ताब्यात_

क्लिक करा व वाचा: ⭕ _*"मागे-पुढे उभा,राही सांभाळीत" !!!!*_ 🔸 *धनंजय मुंडेंची तत्परतेने अपघातग्रस्तास मदत*

क्लिक करा व वाचा: *ही तर ओबीसींची फसवणूक ; आरक्षणाला धोका देण्याचाही प्रयत्न - पंकजा मुंडे*

Click & watch: *बीड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी, त्याला सगळं वेळेवर मिळाले तर सोने पिकवील- धनंजय मुंडे*

क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*


-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis


🔸 MB NEWS/माझी बातमी🔸



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!