इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-जेष्ठ वृध्दांना आधार काठीचे मोफत वाटप

 नंदनज गावात रा . से . यो. वैद्यनाथ कॉलेज व बापु फाऊंडेशन संयुक्त उपक्रम



जेष्ठ नागरिकांशी निर्पेक्ष संवाद हाच मानसिक स्वथ्यचा आधार

जेष्ठ वृध्दांना आधार काठीचे मोफत वाटप 

 

परळी वै: - तालूक्यातील नंदनज गावात राष्ट्रीय सेवा योजना विभाग वैद्यनाथ कॉलेज व बापु फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यामाने  राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींस अभिवांदन करून  चला जपुया  माणुसकीची नाते आधार माणुसकीला- संवाद माणुसकीचा या संकल्पनेवर उपक्रम राबविण्यात आला . यावेळी  प्राचार्य डॉ . डी . व्ही . मेश्राम यांच्या मार्गदर्शन खाली विविध कार्यक्रम संपन्न झाले, तर प्रमुख उपस्थिती  बापु फांऊडेशनच्या  इंदूबाई नामदेव रोडे, प्रा.  माधव रोडे, ग्रांमपंचायत उपसंरपच हनुमंत गुट्टे, प्रा . डॉ . बी . व्ही केंद्रे, प्रा . डॉ . बी . जे . गजभारे , प्रा . व्ही . एल . फड, प्रा . व्ही . व्ही . मुंडे , प्रा .  दिलीप गायकवाड अदि उपस्थित होते . 

Click:🛑 *या वर्षीपासुन दारात येणाऱ्या पालखीच्या दर्शनाला भाविक मुकणार....* 🔸 *संत गजानन महाराज पालखीचा परळीतील नगर प्रदक्षिणा मार्ग बदलण्याचा घाट!* • _हा तर श्रद्धेचे दमन व भक्तीभेदाचा डाव - भाविकांत नाराजीचा सूर_



        यावेळी प्राचार्य प्रा . डॉ . डी . व्ही . मेश्राम यांनी आधार माणुसकीला संवाद माणुसकीचा या उपक्रमाचे मार्गदर्शन करतांना म्हणाले, माणुसकी जपण्यासाठी नाते त्यातील संवाद महत्वाचा असतो, या पिढीचा त्या पिढीला , या देशाला समतेची शिकवण, प्रत्येक घटकातील माणुस शिक्षण घेऊन ज्ञानावंत व्हावा, मानसाला  पाणी, आहार,  शिक्षण  प्रत्येकास मानवास मिळावे  त्यांची प्रगती व्हावी याचे कृती कार्यक्रम राबविणारे राजर्षी शाहु महाराज सर्वश्रेष्ठ मानवी मुल्य जपणारे राजे होते अशा भावना त्यांनी व्यक्त  केल्या . यावेळी महाविद्यालयाच्या वतीने रा . से . यो. बीड समन्वयक प्रा . डॉ . माधव रोडे संकल्पीत आधार माणुसकीला- संवाद माणुसकीचा हा प्रकल्प राबविण्यात आला . यावेळी बापु फाऊंडेशन यांच्या वतीने १००  जेष्ठ वृध्दांना आधार काठीचे मोफत वाटप मातोश्री इंदुबाई रोडे याच्या हस्ते करण्यात आले . 

Click:*संत गजानन महाराज पालखीचा परळीतील नगर प्रदक्षिणा मार्ग पुर्ववत राहण्यासाठी ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून प्रयत्न - बाजीराव भैय्या धर्माधिकारी*



         यावेळी प्रकल्पा अंतर्गत  संवाद ही मानवी मनाची मुलभूत गरज , जेष्ठ नागरिकांशी निर्पेक्ष संवाद हाच मानसिक स्वथ्यचा आधार, वृद्ध संवादाच्या खिडक्या बंद करून माणसं सहजीवन जगत असतात त्यांना बोलत करून विचारांची देवाण घेवाण  हे माणुसकीच लक्षण, ज्येष्ठांशी बोलूया, ऐकूया, समजू घेऊया, संवाद साधूया या उपक्रमातून महाविद्यायला युवक - युवतीनी नंदनज गावीतील थोर ज्येष्ठ महिला, पुरूषांशी संवाद साधला त्यांच्या अनुभवातून सहन करणे, धीर धरणे, थोडी वाट पाहणे समजुतदारपणाचे असंख्या गोष्टी मुलांना त्यांनी ऐकविल्या . गावातील जेष्ठ बाबुराव गायकवाड म्हणाले संवाद म्हणजे नुसते बोलणं नव्हे सर, राग, रूसवे, भांडणं, अबोला, आईच्या जवळ बसणे, आजी - आजोबांला हक्काने जवळ जाऊन पाय चेपुन देणं, त्यांच्या विचाराची भावनेच ऐकुन घेण याला मला वात नाती फुलवणे अस म्हणाले, तर  दगडूबाई गुट्टे , लक्ष्मीबाई गुट्टे म्हणाले, गवऱ्या पुढे गेल्यावर आता कसल्या अपेक्षा कोणा कडूनकरणे अनुभवाने कमी होते, या वयात आपण स्वःत आपले असतोत ही खतं व्यक्त केली . 

Click:*संत गजानन महाराज पालखी सोहळा परळीतील नगरप्रदक्षिणा मार्ग पुर्ववत ठेवा - चंदुलाल बियाणी*



        या उपक्रमात २० वृद्ध महिला व ३५ वृध्द पुरुषांनी सहभाग घेतला  तर १०५ महाविद्यालयन युवक - युवतीनी सहभाग घेतला . याकार्यक्रमाचे आयोजन  एन . एस . एस विभाताचे समन्वयक प्रा . माधव रोडे, तर सुत्रसंचलन कार्यक्रमधिकारी प्रा . डॉ .  भिमानंद गजभारे, आभार प्रा . दिलीप गायकवाड  यांनी  मांडले . कार्यक्रमात विशेष सहभाग स्नेहल आंधळे, ऋकेश कुरेवाड , यशश्री गीत्ते,  वैष्णवी स्वामी , सुर्वेश सपाटे, गोपाळ काळे , ज्योति चव्हाण विद्यार्थांनी घेतला .

-----------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

🌑 *शेळीनं खाल्ला दारात लावलेल्या झाडाचा शेंडा...वाद पोहचला हाणामारी पर्यंत...झाली डोके फोडाफोडी !*

Click:🛑 *श्री.परशुराम जन्मोत्सव:परळीत ब्रह्मवृंदांची 'एकजुट डिप्लोमसी'; अबालवृद्ध,महिलांचा मोठा सहभाग.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


🌑 *खळबळजनक*🌑 _परळीत धारदार शस्त्राने वार करून *युवकाची हत्या*;एकास पोलीसांनी घेतलं ताब्यात_

क्लिक करा व वाचा: ⭕ _*"मागे-पुढे उभा,राही सांभाळीत" !!!!*_ 🔸 *धनंजय मुंडेंची तत्परतेने अपघातग्रस्तास मदत*

क्लिक करा व वाचा: *ही तर ओबीसींची फसवणूक ; आरक्षणाला धोका देण्याचाही प्रयत्न - पंकजा मुंडे*

Click & watch: *बीड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी, त्याला सगळं वेळेवर मिळाले तर सोने पिकवील- धनंजय मुंडे*

क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*


-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis


🔸 MB NEWS/माझी बातमी🔸




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!