MB NEWS -संत गजानन महाराज पालखीचा परळीतील नगर प्रदक्षिणा मार्ग पुर्ववत राहण्यासाठी ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून प्रयत्न - बाजीराव भैय्या धर्माधिकारी

 संत गजानन महाराज पालखीचा परळीतील नगर प्रदक्षिणा मार्ग पुर्ववत राहण्यासाठी ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून प्रयत्न - बाजीराव भैय्या धर्माधिकारी



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा पंढरपूर आषाढी वारी निमित्त निघणारा पालखी सोहळा दरवर्षी परळीत येतो. या दोन दिवसात परळीचे वातावरण अतिशय भक्तीमय असते.परंतु या भक्तीत भेद निर्माण होण्याची चिन्हे यावर्षी दिसून येत आहेत.यावर्षीपासुन दारात येणाऱ्या पालखीला भाविक मुकणार असे चित्र दिसत आहे.संत गजानन महाराज पालखीचा परळीतील नगर प्रदक्षिणा मार्ग बदलण्याचा घाट रचला जात असुन याबाबत परळीकर भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.याबाबत पालखी मार्ग पुर्ववत राहण्यासाठी ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे  माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा:🛑 *यावर्षीपासुन दारात येणाऱ्या पालखीला भाविक मुकणार; संत गजानन महाराज पालखीचा परळीतील नगर प्रदक्षिणा मार्ग बदलण्याचा घाट!* _हा तर श्रद्धेचे दमन व भक्तीभेदाचा डाव - भाविकांत नाराजीचा सूर_

        परळीत येणाऱ्या सर्वच दिंड्या नगरप्रदक्षिणा करूनच मार्गस्थ होतात. अन्यत्र वारीमार्गावर कोणत्याच ठिकाणी नगरप्रदक्षिणा केली जात नाही.परळी व त्यानंतर पंढरपूर याठिकाणी दिंड्या नगरप्रदक्षिणा करतात. एवढी धार्मिक व जाज्वल्य परंपरा मोडीत निघण्याची शक्यता आहे.त्यामुळे आपलं शहर -आपली परंपरा जपण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे बनले आहे. याबाबत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून संत गजानन महाराज पालखीचा परळीतील नगर प्रदक्षिणा मार्ग पुर्ववत राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.संत गजानन महाराज संस्थानला याविषयी सविस्तर भुमिका व आग्रही मागणी करण्यात येणार आहे.राणी लक्ष्मीबाई टॉवर- गणेश पार रोड -गणेशपार- नांदूरवेस- मार्गे नेहरू चौक- संत जगमित्र नागा मंदिर अशा प्रकारची नगरप्रदक्षिणा करून हा पालखी सोहळा मार्गक्रमण करतो. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही धार्मिक परंपरा बनलेली आहे. दरवर्षी संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे परळी शहरात जोरदार स्वागत होते.  हीच परंपरा पुर्ववत कायम राहण्यासाठी भाविक भक्तांसह प्रयत्न करणार असल्याचे बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले आहे.

-----------------------------------------------------------------

हे देखील वाचा/पहा🔸

🌑 *शेळीनं खाल्ला दारात लावलेल्या झाडाचा शेंडा...वाद पोहचला हाणामारी पर्यंत...झाली डोके फोडाफोडी !*

Click:🛑 *श्री.परशुराम जन्मोत्सव:परळीत ब्रह्मवृंदांची 'एकजुट डिप्लोमसी'; अबालवृद्ध,महिलांचा मोठा सहभाग.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._


🌑 *खळबळजनक*🌑 _परळीत धारदार शस्त्राने वार करून *युवकाची हत्या*;एकास पोलीसांनी घेतलं ताब्यात_

क्लिक करा व वाचा: ⭕ _*"मागे-पुढे उभा,राही सांभाळीत" !!!!*_ 🔸 *धनंजय मुंडेंची तत्परतेने अपघातग्रस्तास मदत*

क्लिक करा व वाचा: *ही तर ओबीसींची फसवणूक ; आरक्षणाला धोका देण्याचाही प्रयत्न - पंकजा मुंडे*

Click & watch: *बीड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी, त्याला सगळं वेळेवर मिळाले तर सोने पिकवील- धनंजय मुंडे*

क्लिक करा व वाचा:⭕ *परळीत तलवारी तयार करणारा पोलिसांच्या जाळ्यात*

Click:*लाचखोर सहायक उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात*

क्लिक करा व वाचा:🛑 *दिल्लीत पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण भेट*


-----------------------------------------------------

जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis


🔸 MB NEWS/माझी बातमी🔸



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !