भेल संस्कार केंद्रात 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा

 भेल संस्कार केंद्रात 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा




 परळी वै:प्रतिनिधी

                      येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित, भेल संस्कार केंद्रात *वाचन प्रेरणा दिन* विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादामध्ये व  हर्षोल्लसात साजरा करण्यात आला. आपल्या देशाचे *माजी राष्ट्रपती, मिसाइल मॅन,  थोर शास्त्रज्ञ कै. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम* यांच्या जन्मदिवसानिमित्त वाचन प्रेरणा दिन सर्वत्र साजरा केला जातो. डॉक्टर कलाम यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन या दिवशी शाळा महाविद्यालय मध्ये केले जाते.

         सर्वप्रथम भेल संस्कार केंद्राचे प्रिन्सिपल श्री. गिरीशजी ठाकूर सर व सर्व विभाग प्रमुख व शिक्षक वृंद यांच्या समवेत डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून प्रिन्सिपल सरांनी डॉ. कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

              याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणतात की "डॉ. कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दृष्टी, शक्तिशाली कृती करण्याची वृत्ती आणि चेतना देण्याचे काम करते." वाचन केल्यामुळे मुलांना वाचन, वाचनाची गती, वाचनाची सवय लागते. आज शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी यापासून प्रेरणा घेऊन एका पुस्तकाचे वाचन केले पाहिजे, तसेच त्यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने शाळेत डॉ. ए पी जे अब्दुल कलाम *वाचन कट्टा* निर्माण करण्याचा मानस सुद्धा सरांनी बोलून दाखवला. आजच्या दिनी खऱ्याखुऱ्या अर्थाने डॉ. कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एका पुस्तकाच्या वाचन करण्याचा संकल्प करावा,तसेच प्रत्येक शिक्षकाने ऑक्टोबर अखेर डॉ. कलाम यांनी लिहिलेले किमान एका पुस्तकाचे वाचन करावे तर अशा या महान व्यक्तीच्या आयुष्यात वाचनामुळे घडलेले संस्कार याविषयी आपले मत व्यक्त केले तर शहरातील शाळांनी पुढाकार घेऊन *पुस्तके तुमच्या भेटीला* अशा कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करणे इ. असे विविध उपक्रम शाळा स्तरावर आयोजित केले जावेत, तरच एक संस्कारक्षम, जबाबदार भारतीय नागरिक तयार होतील असे मत व्यक्त केले शेवटी सर्वांना *वाचन प्रेरणा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व *वाचाल तर वाचाल* अशी साद घालत आपल्या भाषणाचा समारोप केला .

                 याप्रसंगी केंद्रातील सहशिक्षक श्री अमोल कुलकर्णी सर यांनीही आपले मत व्यक्त केले व एक सुसूत्रबद्धपणे एक प्रकारे संचालन करून केंद्रातील अनेक विद्यार्थ्यांना ही आपापले मनोगते व्यक्त करण्यासाठी प्रेरित केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. नामदेव मुंडे सर श्री. स्वप्निल कौसाले सर, श्री. शुभम पायघन सर व केंद्रातील इतर शिक्षक वृंदांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी केला, 

-----------------------------------------------------

■ video News 








■ Flash Back NEWS 

Click-*श्री. पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा*

Click-■ मराठी वाङ्मयमंडळ भाषा समृद्ध करते- प्रो.डॉ.एम. बी. धोंडगे

Click- ■ आशा व गटप्रर्वतकांचा १८ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा

Click-■ Pankaja Munde:मी येत आहे, आपल्या दसऱ्यासाठी..२४ ऑक्टोबरला भेटूया.. आपल्या भगवान भक्तीगडावर सिमोल्लंघनाला!

Click-■ न्यू हायस्कूल ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांने पटकावले सुवर्णपदक

Click-■ शिक्षण व रोजगार खाजगीकरण विरोधात विद्यार्थी युवक रस्त्यावर

Click-आंतरवाली येथील सभे दरम्यान गेवराईच्या तरुणाचा उष्मघाताने मृत्यू ; अंत्यविधीला उपस्थित राहून जरांगे पाटीलांची श्रद्धांजली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार