MB NEWS:गेवराई येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

 गेवराई येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन 




अभ्यासपूर्ण न्यायालयीन कामकाज आणि वेळेत न्यायदान प्रक्रिया यासाठी काही चुकीचा जुन्या प्रथा सोडून द्याव्या लागतील--उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र जोशी


बीड, दि.7::--जिल्ह्यातील गेवराई येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेंद्र अवचट यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र जोशी उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना न्यायमूर्ती रवींद्र जोशी म्हणाले, न्यायालयाच्या नवीन सुंदर न्याय मंदिरातून अभ्यासपूर्ण न्यायालयीन कामकाज आणि वेळेत न्यायदान प्रक्रिया केली जावी, यासाठी काही चुकीचा जुन्या प्रथा देखील सोडून द्याव्या लागतील. या नवीन इमारती कुशोभित करू नये यासाठी प्रयत्न केले जावेत असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.


Click:■ *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_*


गेवराई येथील मध्यवर्ती ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या न्यायालयाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत महाजन होते. या समारंभास जिल्हाधिकाऱी दीपा मुधोळ-मुंडे, महाराष्ट्र- गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड मिलिंद पाटील, सदस्य ॲड वसंतराव सोळंके, गेवराई न्यायालयाचे न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग तथा दिवाणी न्यायाधीश संजय घुगे आणि गेवराई वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अमित मुळे व्यासपीठावर उपस्थित होते.

 उच्च न्यायालय मुंबई येथील न्यायमूर्ती राजेंद्र अवचट आणि न्यायमूर्ती रवींद्र जोशी हे बीड जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाल्यानंतर न्यायमूर्ती व मान्यवरांनी फित कापून नूतन इमारतीचे उद्घाटन केले त्यानंतर नूतन इमारतीमध्ये न्यायदान कक्ष , महिला व पुरुष वकील कक्ष यासह संपूर्ण इमारतीचे पाहणी केली. त्यांचे हस्ते नूतन इमारतीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 

समारंभाच्या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.  


या प्रसंगी समारंभ स्थळी आमदार लक्ष्मण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सुरेश साबळे, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, तहसीलदार सचिन खाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री तोंडे , जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील विविध तालुका न्यायालयातील न्यायाधीश , न्यायालयीन अधिकारी- कर्मचारी , विविध तालुका संघाचे पदाधिकारी, वकील, पक्षकार , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वागत गीताद्वारे समारंभास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचा स्वागत पार पडले. विविध वकील संघ आणि न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या वतीने मान्यवरांना शाल, स्मृतीचिन्ह , पुष्पगुच्छ तसेच पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.


स्वागतानंतर व्यासपीठावरून विविध मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री जोशी म्हणाले येथील वकील संघाची सदस्य संख्या 200 असून ती मोठी आहे तसेच या न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांचे प्रमाणही मोठे आहे या दृष्टीने सदर न्यायालय कनिष्ठ स्तर मधून वरिष्ठ स्तर न्यायालयामध्ये रूपांतरीत होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घेतला जाईल. हे भव्य सुंदर न्यायालय होण्यासाठी सहकार्य लाभलेल्या सर्व लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे धन्यवाद देणे महत्त्वाचे आहे .या सुस न्याय ज्ज इमारतींचे सुंदरता अबाधित राखण्यासाठी येथे येणाऱ्या प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. पिचकारी मारून येथील भिंती खराब होणार नाही याकडे लक्ष द्यावे. बार कौन्सिल साठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी देखील आपण लक्ष देऊ असे न्यायमूर्ती श्री जोशी यावेळी म्हणाले.


प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री महाजन म्हणाले, उभारण्यात आलेली नवीन इमारत चांगली आहे. त्याची खरी गरज 30- 40 किलोमीटर लांब अंतरावरून येणाऱ्या पक्षकारांसाठी आहे .येथून दाखल प्रकरणांचा निपटारा गतीने केला जावा. या न्यायातूनच हे न्याय मंदिर म्हणून ओळखले जाईल असे ते म्हणाले.


पाच न्यायदान कक्ष आणि 38 विविध प्रकारचे कक्ष असलेल्या या भव्य इमारतीमध्ये विज पुरवठ्यासाठी सौर पॅनल चा देखील उपयोग केला गेला आहे. तसेच सीसीटीव्ही, लायब्ररी, ई कोर्ट आदी कक्षांनी हि इमारत सुसज्ज करण्यात आली आहे.


 यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड अमित मुळे यांनी प्रास्ताविक केले .महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड मिलिंद पाटील व सदस्य ॲड वसंतराव सोळंके यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन न्यायाधीश संजय घुगे यांनी मानले.

---------------------------------------------------










Click: *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू


Click:● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण






Video news 

Advertise 


Video news 



हे देखील वाचा:-

Click:● *आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप*


Click:● *कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल*


Click:● *परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*


Click:● *दीनदयाळ बँकेला 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा नफा* _दीनदयाळ बँकेचे मकरंद अध्यक्ष ॲड. पत्की व उपाध्यक्ष ॲड. राजेश्वर देशमुख यांची माहिती




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !