MB NEWS:पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळा

 स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देऊ : सहकार मंत्री अतुल सावे 

 पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळा 


छत्रपती संभाजीनगर : पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी यांचे जीवन व पत्रकारिता आदर्श असुन मराठवाड्याच्या विकासात त्यांचे योगदान अनमोल आहे.त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार  अतिशय अभिमानाची बाब आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने पत्रकार प्रबोधिनी सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ, यासाठी बीड  जिल्हाधिकाऱ्यांना सुचना देऊ,असे आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी  दिले.तर पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कडे बैठक लावुन पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली.


Click:■ *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_*



छत्रपती संभाजी नगर येथे, शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लेखणीद्वारे सर्वसामान्यांच्या व्यथा मांडत, त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारांना  पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले. दैनिक मराठवाडा साथी व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, ( मुंबई ) यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील हॉटेल वर्षा इन येथे हा सोहळा पार पडला.

यावेळी  दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदूलाल बियाणी, दैनिक मराठवाडा साथीचे संपादक जगदिश बियाणी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, मुुंबईतील दैनिक पुढारीचे विशेष प्रतिनिधी चंदन शिरवाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.यात यंदा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांसोबतच ‘पत्रकारिता जीवन गौरव’ पुरस्कार व जनसंपर्कात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनाही ‘कार्यगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विभाग निहाय या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रभू गोरे यांनी केले. यात त्यांनी पुरस्काराचे स्वरूप  स्पष्ट केले. 

पुढे बोलतांना ना.अतुल सावे म्हणाले की, पत्रकारांचे महत्त्व राजकीय व्यक्ती शिवाय दुसऱ्या कुणाला एवढे माहीत नसते. सकाळी  वर्तमानपत्र आले नाही तर दिवसाची सुरुवात व्यवस्थित होत नाही. अशा या पत्रकारांच्या काही समस्या मान्यवरांनी येथे मांडल्या. त्यासंबंधी लेखी निवेदन दिल्यास मुंबईला बैठक घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमार्फत हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच वृत्तपत्र व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटवल्याबद्दल मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी तथा संपादक जगदीश बियाणी यांचे कौतुकही केले.


पत्रकारांचे अधिवेशन व्हावे - चंदुलाल बियाणी


दुसऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारांच्या स्वतःच्या देखील अनेक समस्या आहेत. या समस्या बाजूला ठेवून ते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असतात. परंतु त्यांच्या समस्यांकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागेल. त्यातील काही समस्या माझ्या सहकाऱ्यांनी येथे मांडल्या आहेत. असे सांगत दैनिक मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदूलाल बियाणी यांनी परळी वैजनाथ येथे पत्रकारांचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचा मनोदय अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.


मराठवाडा साथीत काम केल्याचा अभिमान -  मुंडे


परळी  शहरात चार दशकांपूर्वी स्वर्गीय मोहनलालजी यांनी दैनिक मराठवाडा साथीची मुहूर्तमेढ रोवली.  मोहनलालजी नेहमीच विकासाच्या कामात पुढे असायचे, मी देखील अंबाजोगाईतून दैनिक मराठवाडा साथीत काम केले आहे. याचा मला अभिमान आहे. असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले.  

पुढे बोलताना ते म्हणाले की सत्ता आल्यानंतर माणूस कळतो. पत्रकारांच्या पेन्शन साठी अटी शर्ती अधिक लावण्यात आल्या आहेत. दुसरीकडे अधिस्वीकृती मिळण्यासाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. गृहनिर्माण संस्थेचा प्रश्न असेल किंवा चक्रवाढ पद्धतीने जाहिराती देण्याचा विषय असेल, आदी अनेक विषय आहेत. ते सोडवण्याकरिता आपण सहकार्य करावे अशी विनंती ही त्यांनी मंत्री सावे यांच्याकडे केली.


पत्रकारांसाठी एखादे महामंडळ असावे - डोईफोडे


 विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी देखील, बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी लावण्यात आलेले क्लिष्ट नियम शिथिल करण्याबाबत मंत्री सावे यांच्याकडे मागणी केली. यासह आता विविध महामंडळ स्थापन झाली आहे. यामुळे पत्रकारांसाठीही एखादे महामंडळ असावे असे देखील डोईफोडे म्हणाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक मराठवाडा साथी कार्यकारी संपादक प्रशांत जोशी यांनी केले.

यांचा करण्यात आला सन्मान

या पुरस्कार सोहळ्यात  पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने दैनिक सकाळ मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक दयानंद माने, मुुंबईतील दैनिक पुढारीचे विशेष प्रतिनिधी चंदन शिरवाळे, दैनिक लोकमतचे सहायक संपादक पवन देशपांडे, युनिसेफ महाराष्ट्रचे राज्य सल्लागार तानाजी  पाटील तर ‘पत्रकारिता जीवन गौरव’ पुरस्काराने दैनिक आनंद नगरीचे संस्थापक संपादक शिवरतन मुंदडा व ‘कार्यगौरव’ पुरस्काने छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी संजय पाटील,महावितरणचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड आदींना सन्मानित करण्यात आले.


Click:● *जुगार क्लबवर धाड :पाच लाख तेरा हजार रुपये व ११ जण ताब्यात*

विभागीय पुरस्कार प्राप्त  पत्रकार

मराठवाडा विभाग : बाबा देशमाने (दै. रिपाेर्ताज, संपादक, बीड),चंद्रकांत तारू (दै. सकाळ, पैठण तालुका प्रतिनिधी), सचिन बडे (लोकशाही न्यूज चॅनल, छत्रपती संभाजीनगर ), प्रा.डॉ. विठ्‌ठल जायभाये (मुक्त पत्रकार, परभणी), आनंद इंदानी (दै. सकाळ, बदनापूर तालुका प्रतिनिधी), सचिन कोरडे (दै. आधुनिक केसरी, धाराशिव जिल्हा प्रतिनिधी), संग्राम वाघमारे (दै. पुढारी, चालकूर तालुका प्रतिनिधी), गोकुळसिंग राजपूत (दै. आनंद नगरी, सोयगाव तालुका प्रतिनिधी), शकील खलिफा (दै. देशोन्नती, पैठण तालुका प्रतिनिधी), गोकुळ लांडे (दै. मराठवाडा साथी, गंगापूर प्रतिनिधी), संदीप मानकर (दै. आधुनिक केसरी, सिल्लोड तालुका प्रतिनिधी), सुरेश वायभट (पैठण तालुका प्रतिनिधी), प्रा. बिभीषण चाटे, (दै. संकेत, बीड), प्रा. बाळासाहेब बोराडे (दै. आधुनिक केसरी, जालना जिल्हा प्रतिनिधी)

विदर्भ विभाग : प्रमोद पाणबुडे (दै. साहसिक, वर्धा), एकनाथ चौधरी (दै. महाराष्ट्र टाईम्स, वर्धा प्रतिनिधी),

नाशिक विभाग : किरणकुमार आवारे (दै. लोकनामा, निफाड तालुका प्रतिनिधी), बंडू खडांगळे (दै. आधुनिक केसरी, दिंडोरी तालुका प्रतिनिधी), मनोहर बोचरे (दै. सकाळ, देवगाव प्रतिनिधी)

पश्चिम महाराष्ट्र विभाग : श्रीकांत चौरे (दै. मराठवाडा साथी, पारनेर तालुका प्रतिनिधी), नवनाथ खिल्लारे (दै. नवराष्ट्र, पंढरपूर प्रतिनिधी), अशोक सूर्यवंशी (दै. मराठवाडा साथी, मिरजगाव प्रतिनिधी), नरहरी शहाणे (दै. मराठवाडा साथी, पाथ्रडी तालुका प्रतिनिधी), अजय नजन (दै. मराठवाडा साथी, शेवगाव तालुका प्रतिनिधी), किसन पवार (दै. मराठवाडा साथी, कोपरगाव तालुका प्रतिनिधी)

कोकण विभाग : सचिन दामोदर कांबळे (टाईम्स् नाऊ न्यूज चॅनल, रत्नागिरी), विनोद पवार (दै. पुढारी, मंडणगड प्रतिनिधी),  

अमरावती विभाग :  गुलाबराव इंगळे (दै. सकाळ, जळगाव जामोद, तालुका प्रतिनिधी), सागर झनके (दै. आधुनिक केसरी, जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी), अमोल गावंडे (दै. निर्भीड स्वराज संपादक, खामगाव), किरण डोंगरदिवे (मुक्त पत्रकार) आदींना सन्मानित करण्यात आले.


---------------------------------------------------












Click: *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू


Click:● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण






Video news 

Advertise 


Video news 



हे देखील वाचा:-

Click:● *आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप*


Click:● *कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल*


Click:● *परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*


Click:● *दीनदयाळ बँकेला 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा नफा* _दीनदयाळ बँकेचे मकरंद अध्यक्ष ॲड. पत्की व उपाध्यक्ष ॲड. राजेश्वर देशमुख यांची माहिती



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !