MB NEWS:संघाचे अध्यक्ष डॉ जावेद शेख यांनी वाढदिवस साजरा न करता जपली सामाजिक बांधिलकी

 सह्याद्री मराठी पत्रकार संघ केजच्या वतीने पैठणच्या चौधरी कुटुंबियांना आर्थिक मदत


संघाचे अध्यक्ष डॉ जावेद शेख यांनी वाढदिवस साजरा न करता जपली सामाजिक बांधिलकी


केज/ प्रतिनिधी

केज तालुक्यातील पैठण (सा)  येथील चौधरी कुटुंबीयांवर काळाचा घाला पडला  आणि चौधरी कुटुंबीयावर अनोखी संकट ओढावले. या संकटातून सावरण्यासाठी गावातील व परिसरातील नागरिकांनी काही ना काही या कुटुंबियांना आधार म्हणून सांत्वन तर  केलेच परंतु काहींनी यांना  मदत म्हणून आर्थिक आधार दिला.


Click:■ *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_*



अशाच प्रकारे  पत्रकारांच्या व भुमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी हे ब्रिद हाती घेऊन व सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात कायम कटिबध्द राहण्याचा संकल्प करुन केज  तालुक्यातील पत्रकारांनी स्थापन केलेल्या  सह्याद्री मराठी पत्रकार संघ केज संघाचे अध्यक्ष डॉ जावेद शेख हे कायम  सामाजिक बांधिलकीसाठी सदैव तत्पर असतात नुकताच  यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले. अध्यक्ष यांनी आपल्या संघातील प्रत्येक सदस्यांचा वाढदिवस हा समाजसेवा म्हणून एखाद्या कुटुंबाला आधार म्हणून काही रक्कम देऊन व अनाथ आश्रमातील व्यक्तींना फळे वाटप करून आणखीन काही समाजसेवा म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अध्यक्षांचा वाढदिवस हा नुकतीच जी  पैठण येथील दुर्दैवी घटना घडली होती, त्यांच्या कुटुंबांना फक्त सांत्वन करून चालणार नाही तर आपण आपल्या संघातर्फे काही ना काही आर्थिक मदत करू म्हणून चौधरी कुटुंबीयांना कुटुंबाची भेट घेऊन प्रत्यक्ष  संघातील सर्व सहकारी पत्रकार बांधवांनी मदतीचा वाटा उचलत  रोख  स्वरुपात  आधार म्हणून मदतीचे आर्थिक  पॉकेट देण्यात आले . 

खरोखरच ही रक्कम त्यांची गरज भागवेल का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही परंतु फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जर अशा प्रकारची मदत आपण करत राहिलो तर या कुटुंबांना आधार मिळेल कारण मुलांचे वडील शेतात  पडल्यामुळे कमरेपासून अधू झालेले असल्याने त्यांना कुठलाही कामधंदा करता येत नाही त्यामुळे या कुटुंबाला आर्थिक आधाराची गरज आहे. ही गरज लक्षात घेता सह्याद्री मराठी पत्रकार संघ केज च्या अध्यक्षांचा वाढदिवस साजरा  न करता चौधरी कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली. व यापुढेही संघाची वाटचाल समाजहितासाठी कायम कटिबध्द असेल असे मत उपस्थिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी संघाचे अध्यक्ष डॉ जावेद शेख , कार्याध्यक्ष मनोराम पवार , उपाध्यक्ष अनिल ठोंबरे ,  संघाचे प्रसिद्धी प्रमुख शहाजी भोसले ,  सचिव शिवाजी औसेकर ,  संघटक गोविंद शिनगारे , कोषाध्यक्ष महादेव दौंड   , सहसचिव डॉ लतीफ शेख , संघाचे  सदस्य दत्तात्रय भाकरे   ,  गोविंद लांडगे , काशीनाथ कातमांडे , बळीराम लोकरे , बाळासाहेब घोगरे या सर्व संघातील पदाधिकारी  यांच्या हास्ते आर्थिक पॉकेट देण्यात आले.


---------------------------------------------------










Click: *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू


Click:● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण






Video news 

Advertise 


Video news 



हे देखील वाचा:-

Click:● *आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप*


Click:● *कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल*


Click:● *परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*


Click:● *दीनदयाळ बँकेला 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा नफा* _दीनदयाळ बँकेचे मकरंद अध्यक्ष ॲड. पत्की व उपाध्यक्ष ॲड. राजेश्वर देशमुख यांची माहिती



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !