प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS:जुगारावर कारवाईस गेलेल्या पोलीसावर हल्ला

 जुगारावर कारवाईस गेलेल्या पोलीसावर हल्ला



माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथील यात्रेतील प्रकार सहाय्यक पोलिस निरीक्षक जखमी


माजलगाव 


तालुक्यातील छत्रबोरगाव येथे चैत्र महिना निमित्त देवीची यात्रा भरली होती. या यात्रेत चालू असलेला जुगार अड्डा पोलीस बंद करत असताना त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दगडफेक केली. यामध्ये ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ हे जखमी झाले आहेत.दगडफेक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Click:  *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_*


चैत्र महिना असल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी यात्रा भरत असतात त्याचप्रमाणे छत्र बोरगाव येथे देखील देवीची यात्रा भरली होती. यात्रा असलेली या ठिकाणी विविध वस्तूंच्या दुकानात , कपड्यासह खेळाचे साहित्य , जुगार ,तमाशा आदि चालतात. या यात्रेत एका ठिकाणी सोरट नावाचा जुगार चालू असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांना मिळाली. त्यानंतर येथील पोलीस या यात्रेत पोहोचले.

पोलिसांनी हा जुगार बंद करण्यासाठी सांगितले असता पोलीस व जुगार चालक यांच्यात वाद झाला यावेळी कोणीतरी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ यांना २-३ ठिकाणी गंभीर दुखापत झाली. 

       सपोनि योगेश खटकळ यांच्या फिर्यादीवरून परमेश्वर रावसाहेब जाधव ,परमेश्वर विठ्ठल जाधव , अक्षय परमेश्वर जाधव यांच्यासह इतर अज्ञात १५ ते २० लोकांवर ग्रामीण पोलीसात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवल हे करत आहेत.


--------------------------------------------------








Click: *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू


Click:● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण






Video news 

Advertise 


Video news 



हे देखील वाचा:-

Click:● *आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप*


Click:● *कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल*


Click:● *परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*


Click:● *दीनदयाळ बँकेला 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा नफा* _दीनदयाळ बँकेचे मकरंद अध्यक्ष ॲड. पत्की व उपाध्यक्ष ॲड. राजेश्वर देशमुख यांची माहिती




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या