MB NEWS:...नाहीतर आणखीनच बिकट परिस्थिती निर्माण होईल - मुंडेंनी व्यक्त केली चिंता

 कांदा अनुदान पात्रतेसाठी ई-पीक पेरा  नोंदीची अट शिथिल करा - धनंजय मुंडेंची मागणी


...नाहीतर आणखीनच बिकट परिस्थिती निर्माण होईल - मुंडेंनी व्यक्त केली चिंता


परळी वैद्यनाथ (दि. 07) : - राज्य शासनाने 1 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान विक्री केलेल्या कांद्यास प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान द्यायचे घोषित केले मात्र यासाठी शेतकऱ्यांना 7/12, कांदा विक्रीची पावती आणि ई-पीक पेरा नोंद असणे अनिवार्य केले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ई-पीक पेरा नोंद केलेली नाही, त्यामुळे अनेक पात्र शेतकरी अनुदान लाभापासून वंचित राहू शकतात, म्हणूनच ई-पीक पेरा नोंदीची अट शिथिल करण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार कडे केली आहे. 



Click:■ *९०टक्के शेतकरी कांद्याच्या अनुदानाला मुकणार; पावत्या असल्यावर नोंदीची गरज काय?* ● *_परळी तालुक्यातील शेतकरीही अडचणीत; सात-बारावर कांदा पिकांची नोंदच नाही_*


धनंजय मुंडे यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. दुर्गम ग्रामीण भागात आजही वीज आणि इंटरनेटच्या समस्या आहेत, अशा भागातील शेतकऱ्यांना पिकांची ऑनलाइन नोंदणी दुरापास्त आहे. त्यांना केवळ पिकाची ई-पेरा नोंद नाही म्हणून अनुदान नाकारणे अन्यायकारक होईल. याबाबत आपल्या मतदारसंघातल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडे निवेदने दिली असल्याचेही मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.


त्यामुळे राज्य शासनाने कांदा विक्रीसोबत ई-पीक पेरा नोंदणी आवश्यक असण्याची घातलेली अट शिथिल करून लेट खरीप व रब्बी हंगामातील सरसकट कांदा उत्पादकास अनुदान द्यावे, अन्यथा शेतकऱ्यांची परिस्थिती आणखीनच बिकट होईल, अशी भीतीही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.


राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या नावाखाली जाहीर केलेल्या अनुदानात अनेक जाचक अटी घातल्या आहेत. त्यातच ज्या शेतकऱ्यांनी कांदा 31 मार्चच्या आत विकला त्यांनाच अनुदान मिळेल, महाराष्ट्राच्या बाहेर कांदा विकला असेल तर त्याला अनुदान मिळणार नाही, अशा अटींनी शेतकऱ्यांना हैराण केले आहे. याही बाबत धनंजय मुंडे यांनी याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. कांदा विक्रीस 15 दिवस मुदतवाढ देण्यात यावी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबविण्यात यावी, तसेच राज्याबाहेर विक्री केलेल्या कांद्यास देखील अनुदान देण्यात यावे, अशा स्वरूपाच्या मागण्या याआधीही धनंजय मुंडे यांनी शासनाकडे केल्या आहेत. दरम्यान ई-पेरा नोंदणीची समस्या सरकार दूर करणार का याकडे आता लक्ष लागले आहे.

---------------------------------------------------










Click: *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू


Click:● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण






Video news 

Advertise 


Video news 



हे देखील वाचा:-

Click:● *आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप*


Click:● *कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल*


Click:● *परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*


Click:● *दीनदयाळ बँकेला 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा नफा* _दीनदयाळ बँकेचे मकरंद अध्यक्ष ॲड. पत्की व उपाध्यक्ष ॲड. राजेश्वर देशमुख यांची माहिती



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !