MB NEWS:परळीच्या रेल्वे स्थानकावर सापडलेल्या 'तिला' अडीच वर्षानंतर भेटली माय!

 परळीच्या रेल्वे स्थानकावर सापडलेल्या 'तिला' अडीच वर्षानंतर भेटली माय!



बीड : परळी रेल्वे स्थानकावर सापडलेल्या एक वर्षाच्या छोट्या बाळाची आणि त्याच्या आईची अडीच वर्षानंतर भेट झाली. आर्वी येथील शांतिवन आणि ठाण्याचे श्रद्धा फाउंडेशन या संस्थांच्या पुढाकारामुळे हा भावनिक योग जुळून आला. जेव्हा तेलंगणातील मुळ रहिवाशी असलेल्या या माय-लेकीची भेट झाली, तेव्हाचे चित्र पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. बीड बालकल्याण समितीत हा सोहळा संपन्न झाला.



अडीच वर्षांपूर्वी परळी रेल्वे स्थानावर एक वर्षाचे बाळ काही सामाजिक कार्यकर्त्यांना सापडले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर डॉ. शालिनी कराड यांनी या बाळाची तपासणी करून बाळाच्या आईचा शोध घेण्यास पोलिसांना मदत केली. तेव्हा रेल्वे स्थानकावर फिरणारी एक मनोरुग्ण महिला या बाळाची आई असल्याचे निष्पन्न झाले. तेंव्हा डॉ. कराड यांनी शांतीवनचे संस्थापक दीपक नागरगोजे यांना ही माहिती दिली. पोलिस आणि नागरगोजे यांनी या माय लेकरांना बीड बाल कल्याण समिती समोर हजर केले असता समितीने या बाळाचा ताबा संगोपनासाठी शांतिवनकडे दिला आणि आईला येरवडा येथील मनोरुग्ण रुग्णालयात न्यायालयाच्या आदेशाने पाठवले.




या ठिकाणी दोन वर्ष उपचार केल्यानंतर या महीलेत सुधारणा झाली. तेंव्हा ही महिला तेलंगणा राज्यातील परघी येथील असल्याचे समजले. येरवडा प्रशासनाने या महिलेला पुढील तपास आणि पुनर्वसनासाठी ठाणे येथील डॉ भरत वाटवानी यांच्या श्रद्धा फाउंडेशन या मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थेकडे सोपवले. या संस्थेने या महिलेच्या गावाचा शोध घेऊन तिला तिचे नातेवाईक सापडून दिले. या महिलेची पूर्ण ओळख पटल्यानंतर शनिवारी शांतिवनकडे असणारे तिचे बाळ बालकल्याण समितीच्या आदेशाने तिच्याकडे सोपविण्यात आले. याप्रसंगी शांतिवनचे दीपक नागरगोजे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, सुरेश राजहंस, संतोष वारे, छाया गडदे, बालस्नेही समीर पठाण, तत्वशिल कांबळे आदींची उपस्थिती होती.

---------------------------------------------












Click: *सिमेंट फॅक्ट्रीत कामगाराचा मृत्यू


Click:● सभासद,ग्राहक,ठेवीदारांचा खंबीर विश्वासावर स्वा. वि.दा.सावरकर पतसंस्थेची १०८ कोटींची उलाढाल व ४० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्ठ पूर्ण






Video news 

Advertise 


Video news 



हे देखील वाचा:-

Click:● *आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी शाळेच्या वतीने निरोप*


Click:● *कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ जागेसाठी १२६ अर्ज दाखल*


Click:● *परळीत सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम: मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*


Click:● *दीनदयाळ बँकेला 4 कोटी 6 लाख रूपयांहून अधिकचा नफा* _दीनदयाळ बँकेचे मकरंद अध्यक्ष ॲड. पत्की व उपाध्यक्ष ॲड. राजेश्वर देशमुख यांची माहिती



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !