जळगाव जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यासाठी पीक परिस्थितीची पुन्हा पडताळणी करावी- धनंजय मुंडे




पावसाने खंड दिल्यामुळे पीक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी


*कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश*


मुंबई दि. 21 सप्टेंबर 2023- 


जळगाव जिल्ह्यातील सन 2022-23 या वर्षातील केळी व इतर खरीप पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. तसेच जळगाव जिल्ह्यात ज्या मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे अशा मंडलांमध्ये अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश सुद्धा यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.


पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत जळगाव जिल्ह्यात सन 2022 23 या वर्षातील केळी व इतर खरीप पिकांच्या पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. त्याबाबत मंत्रालयातील दालनात 

मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या मागणीनंतर

आयोजित बैठकीत मंत्री मुंडे बोलत होते.  या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील कृषी आयुक्त सुनील चव्हाण उपस्थित होते.


पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 2022-23 या वर्षांमध्ये 77,860 शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज दाखल केले होते त्यामधून 81,510 हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले. त्यापैकी केवळ 46 हजार 949 अर्जांची तपासणी करण्यात आली त्यामुळे पिक विमा पासून हजारो शेतकरी वंचित राहिले होते.


बैठकीच्या दरम्यान कृषी मंत्री धनंजय मुंडे , यांनी इतक्या मोठ्या क्षेत्राला पिक विमा पासून वंचित ठेवल्याबद्दल तसेच ज्या शेतकऱ्यांचा विमा नाकारलेला आहे त्यांना विमा नाकारण्याची कारणे लेखी कळविली नसल्याने विमाकंपन्यांच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले. तसेच या कालावधीतील पीक परिस्थितीचा अहवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मागवून घेऊन फेर पडताळणी करून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा देण्याचे निर्देश दिले.


यावेळी मंत्री गुलाबराव पाटील व अनिल पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात पावसाने 21 दिवसांपेक्षा अधिक खंड दिला असल्याने पिक विम्याची 25% रक्कम अग्रीम देण्याची मागणी केली. यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असून दसरा ते दीपावली दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम रक्कम जमा होईल अशी ग्वाही दिली.

-----------------------------------------------------

Click:■ *दक्षिण मध्य रेल्वेकडून काही रेल्वे तात्पुरत्या रद्द*

Click:*गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत करावा - सौ. अनिता संजय कुकडे*

Click:■ *राज्यातील सर्व वीज ग्राहकांचे मीटर बदलणार*

Click:■ *आईचा हात पाठीवर पडला की सर्व सुख मिळते - रामायणाचार्य ह.भ.प.समाधान महाराज शर्मा*

Click:■ *यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम*

Click: ■ *भिवा बिडगर यांच्याकडून शिवम फड यांचा सत्कार*

Click: ■ *हिंदी भाषा घरोघरी पोहचवण्याचे काम मिडिया व सिनेमाने केले- प्रा. डॉ पांडुरंग चिलगर*





Click:■ *भेल संकुलात गणेशाची उत्साहात स्थापना: "चांद्रयान" सुंदर देखावा*

Click:■ *बी. एस्सी नर्सिंग चौथ्या वर्षाच्या परिक्षेत कु.सपना गुट्टे महाविद्यालयात प्रथम*

Click:■ दुसऱ्याची जमीन हडपण्याचा खटाटोप; अटकपूर्व जामीन फेटाळला !

Click: ■ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री सरस्वती विद्यालयाची नेत्रदिपक कामगिरी

Click: ■ डोळ्यांच्या आजाराने त्रस्त लवूळ येथे वयोवृध्दाची आत्महत्या

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*

Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...

----------------------------------------------------










----------------------------------------------------

Click:■ *ॲड. माधव जाधव मित्र मंडळाकडून गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन*

Click:■ *गाड्या रद्दचा निर्णय मागे: रद्द करण्यात आलेल्या नांदेड-पुणे- नांदेड एक्स्प्रेस च्या दोन फेऱ्या पूर्ववत धावणार*

Click:■ *आता परळीत होणार चार दिवसआड पाणीपुरवठा*

Click:■ *परळीचे अनिरुद्ध चव्हाण यांना मराठवाडा भूषण उद्योजक पुरस्कार पुण्यात प्रदान*




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !