इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

वडगाववसाहत जवळ आपघात: नागरिकांच्या सतर्कतेने वाचले दोन जीव

 थरारक आपघात : परळी-गंगाखेड रस्त्यावर खोदकाम;  चालता ट्रक कोसळला खड्ड्यात : चालक व सहाय्यक जखमी


वडगाववसाहत जवळ आपघात: नागरिकांच्या सतर्कतेने वाचले दोन जीव

परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा.....
       राष्ट्रीय महामार्ग क्र.361 फ वर सध्या गंगाखेड-परळी दरम्यान रस्त्याचे काम सुरु आहे.परळीपासुन जवळच असलेल्या वडगाव वसाहत जवळ आज सायंकाळी 5 वा. सुमारास थरारक आपघात घडला. रस्त्यावर दोन्ही बाजुंनी खोदकाम करण्यात आलेले आहे. गंगाखेडकडून येणारा एक ट्रक रस्त्याच्या बाजुने असलेल्या खड्ड्यात जाउन कोसळला.चालता ट्रक कोसळला खड्ड्यात कोसळत असतांनाचा थरार बघायला मिळाला. या आपघातात चालक व सहाय्यक असे दोन जण जखमी झाले. सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेनमुळे  दोन जीव वाचले आहेत.



         परळी - गंगाखेड रस्त्यावरील दगडवाडी ते वडगाववसाहत यादरम्यान पुलाचे व रस्त्याचे काम करण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. याठिकाणी आज दि.9 रोजी सायं.5 वा.सुमारास गंगाखेडकडून येणारा ट्रक क्रमांक  एम एच 12 एन एक्स 8367 वेगाने येत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटला.चालता ट्रक रस्त्याच्या कडेला जात खड्ड्यात जावून कोसळला. या आपघातात चालक व अन्य एकजण ट्रकच्या कॅबिनमध्येच आडकून पडले होते. मात्र हा थरारक आपघात घडत असतांना रस्त्यावरील जाणारी वाहने व रस्त्याच्या कामावरील लोकांनी बघितलेले होते.तातडीने या नागरिकांनी मदतकार्य करुन अडकलेल्या दोघांना बाहेर काढले.या आपघातात ट्रक चालक दयानंद आत्माराम पुयनर  वय 34 रा.पांगरी ता.गंगाखेड व सहाय्यक महादेव गंगाधर कोटंबे वय 29 रा.राणीसावरगाव ता.गंगाखेड  हे जखमी झाले असुन त्यांच्यावर परळी वैजनाथ उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या