पनवेल-नांदेड शिवाजीनगरलाच तीन तासांपासून अडकली :
मंगळावर पेठेतील पाच दुकाने जळून खाक
खत आणि मोटार रिवांडिंगच्या दुकानाचे मोठे नुकसान
केज :- केज शहरातील मंगळवार पेठेतील पाच दुकानांना आग लागून खत आणि बी बियाण्यांच्या दुकानासह मोटार रिवाइंडिंग, पशु खाद्य आणि हॉटेलसह इतर तीन दुकाने जळून नुकसान झाले आहे.
दि ११:३० वाजता मंगळवार पेठ केज येथील अनिल अशोक सूर्यवंशी यांचे गजानन अग्रो एजन्सी कषी सेवा केंद्राला अचानक आग लागून दुकानातील कीटक नाशक, तन नाशक, विद्राव्य खते, लिंबोळी पेंड आणि दुकानातील फर्निचर असे मिळून १२ लाख रु. चे नुकसान झाले आहे. तसेच या आगीमुळे त्यांच्या शेजारी असलेले खंडेश्वर पशु खाद्य ट्रेडर्स,
प्रकाश मुंडे यांचे मोटार व इलेक्ट्रिक साहित्य दुरुस्तीचे दुकान आणि नारायण नेहरकर यांचे चहाच्या दुकानासह दत्ता देशमुख यांचे दत्तात्रय फोटो स्टुडिओला सुद्धा या आगीमुळे नुकसान पोहोचले आहे. मोटार दुरुस्ती, चहाचे हॉटेल आणि पशु खाद्याचे मोठे नुकसान झाले आहे..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा