पोस्ट्स

एप्रिल १९, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात पुण्यतिथी निमित्त स्व. गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन  परळी वैजनाथ दि.०३ (प्रतिनिधी)        लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात केंद्रीय ग्रामविकास मंत्री, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.              शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, संस्थेचे सचिव रवींद्र देशमुख, संचालिका छायाताई देशमुख, कार्यालयीन अधिक्षक अनिल पत्की उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना संजय देशमुख म्हणाले की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे कार्य आजही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यांचे मराठवाड्याच्या विकासात मोठे योगदान आहे. ते संघर्षनेते होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रविण फुटके य...

महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध....

इमेज
पारदर्शक कारभाराचे आणखी एक पाऊल: परळी नगर परिषदेचे ठराव आता  एका क्लिकवर सभेचा इतिवृतांत ऑनलाईन टाकणारी परळी वैजनाथ नगर परिषद ठरली पहिली महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी....    परळी वैजनाथ नगर परिषदेच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगर परिषदेच्या विविध सभांमध्ये मंजूर होणारे ठराव आता सर्व सन्माननीय नगरसेवक आणि नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महा यु एल बी ( MahaULB) या संकेत स्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहेत. यापूर्वी नगर परिषदेचे ठराव पाहण्यासाठी किंवा त्याची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत ही सर्व माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर इतिवृत्त प्रकाशित करणारी परळी वैजनाथ नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद ठरली आहे.         राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, ...

४ कोटी २४ लाख ७३ हजार रु. निधीचा झाला अपहार..

इमेज
घरकुल घोटाळा :तत्कालीन मुख्याधिकाऱ्या सह सहा जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा ४ कोटी २४ लाख ७३ हजार रु. निधीचा झाला अपहार केज:- केज नगर पंचायतीच्या तत्कालीन मुख्याधिकारी आणि अधिकारी यांनी संगनमत करून प्रधानमंत्री आवास योजनेच्या खात्यामध्ये राज्य शासन व केंद्र शासनाचा प्राप्त निधी हा पात्र घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग न करता नियमबाह्य पद्धतीने ४ कोटी २४ लाख ७३ हजार रु. इतर खात्यावर वर्ग करून शासकीय रक्कमेचा अपहार केला. त्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शासकीय दस्तऐवज गहाळ केल्या प्रकरणी मुख्याधिकारी यांच्या तक्रारी वरून तत्कालीन मुख्याधिकाऱ्यासह लेखापाल यांच्यासह सहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. केज नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या खात्यामध्ये राज्य शासन व केंद्र शासनाचा प्राप्त निधी हा फक्त पात्र घरकुल लाभार्थ्यांना देणे आवश्यक असताना, दि. २० मे ३०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधी मध्ये एकूण रक्कम ४ कोटी २४ लाख ७३ हजार २३ रुपये तत्कालीन मुख्याधिकारी मिलींद सावंत(से. नि.) यांनी लेखापाल आणि इतरांच्या स...

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

इमेज
  परळीत उद्या सामूहिक श्रीसूक्त हवन सोहळा .. परळी वैजनाथ (प्रतिनिधी): येथील अंबेवेस भागातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रविवार, दिनांक २६ एप्रिल रोजी सामूहिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य बहुसोमयाजी श्री यज्ञ मार्तंड सद्गुरु श्री यज्ञेश्वर सेलुकर महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली हा धार्मिक विधी संपन्न होणार आहे. श्री सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित या हवनासाठी लागणारे सर्व साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. या सामूहिक अनुष्ठानात सहभागी होऊन जास्तीत जास्त भाविक भक्तांनी दर्शनाचा व हवनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा हवन सोहळा सायंकाळी ठीक ५:३० वाजता सुरू होणार आहे. कार्यक्रमाची सांगता वेळेत व्हावी, या दृष्टीने भाविकांनी वेळेचे बंधन पाळावे, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच, सर्व यज्ञसेवकांनी पूर्वतयारी आणि सहकार्यासाठी सायंकाळी ५:०० वाजता उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कायम ग्लोबल विकास ट्रस्टच्या सोबत राहू - अंजली दमानिया

इमेज
ग्लोबल विकास ट्रस्टच्या कामामुळे बीडमध्ये सकारात्मक परिवर्तन! अंजली व अनिश दमानिया यांचा दोन दिवशीय कृषीकुल दौऱ्यात प्रभावी सुसंवाद माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचीही भेट; शेती - मातीच्या विषयावर सखोल चर्चा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कधीकाळी तीव्र दुष्काळ, शेतीचे अपयश आणि मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर यासाठी ओळखला जाणारा बीड जिल्हा आज हळूहळू सकारात्मक बदलाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे. या परिवर्तनामागे ग्लोबल विकास ट्रस्टच्या सातत्यपूर्ण आणि शाश्वत कामाची मोठी भूमिका असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. २०१२ साली बीड जिल्ह्यात प्रथम दौरा केल्याच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, “त्या वेळी अनेक गावांमध्ये अत्यंत विदारक परिस्थिती होती. पाण्याचा तीव्र दुष्काळ, शेती संकटात आणि गावात केवळ लहान मुले व वृद्धच दिसत असत. मात्र गेल्या काही वर्षांत झालेल्या कामांमुळे आज या परिस्थितीत लक्षणीय बदल झालेला दिसतो.” त्या पुढे म्हणाल्या की, २०१६ पासून माझे बंधू मयंक गांधी आणि संजय परमार यांनी ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यां...
इमेज
  परळीत  महिलांसाठी  आयोजित मोफत कर्करोग निदान शिबिराचे नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहून वेळोवेळी सर्व तपासण्या केल्या पाहिजे - नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ: प्रतिनिधी...     आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्यविषयक काळजी वाहणाऱ्या महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबतही जागरूक राहून वेळोवेळी सर्व तपासण्या केल्या पाहिजे असे आवाहन नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी केले. परळी वैजनाथ येथील अरिहंत जैन सेवाभावी संस्था आणि विवेकानंद कॅन्सर अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'मोफत कर्करोग निदान शिबिरा'चे उद्घाटन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.    परळी वैजनाथ येथे आयोजित मोफत शिबिराचा मोठ्या संख्येने महिला वर्गाने लाभ घेतला. या शिबिरात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि स्तनांचा कर्करोग निदानासाठी आधुनिक 'कोल्पोस्कोपी' व 'थर्मल ब्रेस्ट स्क्रीनिंग'द्...
इमेज
वादळी वाऱ्यात दुर्दैवी घटना; लिंबाचे झाड कोसळून महिलेचा मृत्यू  माजलगाव (प्रतिनिधी)तालुक्यातील मोगरा येथे शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतातील लिंबाचे झाड कोसळून सुमनबाई हरिभाऊ घनघाव या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मोगरा येथे शुक्रवारी जोरदार वादळी वाऱ्यामुळे एक दुर्दैवी अपघात घडला. शेतात असताना लिंबाचे झाड अचानक कोसळले आणि त्याचा फाटा सुमनबाई हरिभाऊ घनघाव यांच्या पोटात घुसला. या गंभीर जखमेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना माजलगाव व संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुमनबाई या शेळ्या राखण्याचे काम करत होत्या तसेच त्या घनघाव कुटुंबातील कुटुंबप्रमुख होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून मोगरा गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या अपघाती मृत्यूची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मागासवर्गीय समाजाच्या वतीने तसेच ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

पहिल्या बॅचच्या प्रशिक्षणाचा समारोप...

इमेज
  जनगणना-२०२७ : १ मे पासून सुरू होणाऱ्या जनगणनेत नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे - नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी परळी वैजनाथ: प्रतिनिधी     देशाच्या नियोजनाचा मुख्य आधार असलेली 'जनगणना-२०२७'  सुरू होत आहे.१ मे पासून सुरू होणाऱ्या जनगणनेत नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले.      जनगणना- २०२७ च्या अनुषंगाने परळी वैजनाथ येथे तीन दिवसाचे पहिल्या बॅचचे प्रशिक्षण डॉ. भालचंद्र वाचनालय या ठिकाणी घेण्यात आले. जनगणना प्रगणक, व पर्यवेक्षकांच्या या प्रशिक्षणाचा समारोप झाला. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रशिक्षणार्थी प्रगनक व पर्यवेक्षकांशी संवाद साधत त्यांनी जनगणना २०२७ मध्ये नागरिकांनी उस्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.यावेळी नगरपरिषदेचे उपमुख्य अधिकारी संतोष रोडे यांच्यासह या प्रशिक्षणाचे प्रशिक्षक व जनगणना प्रगनक, पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.    यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ.पद्मश...

संघटन वाढवण्यासाठी ताकदीने काम करण्याचा दिली विश्वास

इमेज
  प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक कार्यकर्त्यांसोबत ‘अल्पोपहार ते चाय पे चर्चा' प्रितमताईंच्या कार्यपद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संघटन वाढवण्यासाठी ताकदीने काम करण्याचा दिली विश्वास संभाजीनगर. ( दि. २५ )  संभाजीनगर पश्चिम जिल्ह्याच्या भाजपच्या प्रभारी माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांची प्रभारीपदी नियुक्ती होताच त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. पश्चिम जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची त्यांनी अनौपचारीक बैठक घेतली आणि सर्वांशी संवाद साधला. पक्षासाठी तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळवून देण्यासह संघटन बळकट करण्यासाठी आपण ताकदीने काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शहरातील जानकी हॉटेल येथे संभाजीनगर पश्चिम जिल्ह्यातील कन्नड विधानसभा, गंगापूर विधानसभा, वैजापूर विधानसभा आणि संभाजीनगर पश्चिमच्या ग्रामीण भागातील पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष यांची डॉ. प्रितमताई मुंडे यांनी अनौपचारीक बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्वांसोबत अल्पोपहार घेऊन चाय पे चर्चा केली. तसेच त्यांनी सर्वांचा परिचय करत संवाद साधला आणि आ...
इमेज
सुदृढ युवकच देश घडवतात, हनुमान व्यायाम शाळेच्या उन्हाळी संस्कार शिबीराच्या माध्यमातून सुदृढ युवक तयार होतात- प्रा.प्रदीप देशमुख  परळी वैजनाथ दि.२४ (प्रतिनिधी)     सद्ढ युवकच देश घडवतात, हनुमान व्यायाम शाळेच्या उन्हाळी संस्कार शिबीराच्या माध्यमातून सद्ढ युवक तयार होतात असे प्रतिपादन प्रा प्रदीप देशमुख यांनी केले. ते येथील हनुमान व्यायाम शाळेच्या उन्हाळी संस्कार शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.               शहरातील स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन करण्यात आलेल्या श्री हनुमान व्यायाम शाळेच्या माध्यमातून गेल्या ३६ वर्षांपासून उन्हाळी संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात येते. यंदा ३७ व्या शिबीराचे उद्घाटन श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त प्रा प्रदिप देशमुख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यनाथ बॅंकेचे संचालक विजय  वाकेकर, प्रमुख पाहुणे वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे जेष्ठ विश्वस्त नागनाथराव देशमुख, लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रवींद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यम...
इमेज
जनगणना-२०२७ ची तयारी सुरू; १ मे पासून नागरिकांना घरबसल्या 'स्व-गणना' करण्याची संधी परळी वैजनाथ: प्रतिनिधी  देशाच्या नियोजनाचा मुख्य आधार असलेली 'जनगणना-२०२७' आता पूर्णपणे डिजिटल स्वरूपात पार पडणार आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून नागरिकांना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठी 'स्व-गणना' (Self-Enumeration) हा विशेष पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. उपविभागीय जनगणना अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, परळी वै. यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, जनगणनेचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात 'मकान सूचीकरण आणि घरांची गणना' (House-Listing Operations) ही प्रक्रिया १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबवली जाणार आहे. कशी कराल स्व-गणना? नागरिकांनी पहिल्या टप्प्यात आपली नोंदणी करण्यासाठी se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे. तेथे मोबाईल नंबर आणि कुटुंबप्रमुखाचे नाव टाकून नोंदणी करावी. सोयीची भाषा निवडून ओटीपी (OTP) द्वारे पडताळणी केल्यानंतर नकाशावर घराचे अचूक ठिकाण निवडावे लागते. विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर ती पुन्...

लक्ष्मी मुक्ती योजना....

इमेज
  स्वतःच्या शेतजमिनीत पत्नीचे नाव 'सहहिस्सेदार' म्हणून लावण्याचे परळी उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन परळी वैजनाथ: प्रतिनिधी... महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अंतर्गत, परळी तालुक्यातील शेतकरी आता आपल्या मालकीच्या शेतजमिनीत पत्नीचे नाव 'सहहिस्सेदार' म्हणून नोंदवू शकणार आहेत. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन परळीचे उपविभागीय अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या १५ सप्टेंबर १९९२ च्या परिपत्रकानुसार, स्त्रियांचे हक्क सुरक्षित राहावेत यासाठी सामाजिक संघटनांनी केलेल्या सूचनांची दखल घेत हे आदेश देण्यात आले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वकष्टार्जित जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर स्वतःच्या नावासोबत पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून नोंदवण्याची इच्छा व्यक्त केली, तर महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधील कलमांच्या अधीन राहून ही प्रक्रिया पूर्ण करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अशी करा नोंदण...
इमेज
  भाजप प्रदेश  प्रवक्ते राम कुलकर्णी गोपीनाथ गडावर नतमस्तक; परळी भाजपाकडून पहिला सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी पुनर्नियुक्ती झाल्यानंतर राम कुलकर्णी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात गोपीनाथ गडावर नतमस्तक होत आशीर्वाद घेऊन केली. यानंतर परळी शहरात आगमन होताच भाजपाच्या वतीने त्यांचा उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला. प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कुलकर्णी हे इंदौर येथे पक्षाच्या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झाले होते. बीड जिल्ह्यात परतल्यानंतर त्यांनी सकाळी गोपीनाथ गडावर जाऊन स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “गोपीनाथराव मुंडे यांचे माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ३० वर्षे काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. गोपीनाथ गडावर आल्यानंतर सकारात्मक दृष्टिकोनाने काम करण्यासाठी नवे बळ मिळते.” दरम्यान, परळीत आगमन झाल्यानंतर तालुका अध्यक्ष राजेश गीते यांच्या जनसंपर्क कार्यालयात कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्य...

मी जनतेच्या व पक्ष नेतृत्वाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहणार : महादेव गंगणे

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या शहराध्यक्षपदी महादेव गंगणे पाटील यांची नियुक्ती नियुक्तीनंतर खा. बजरंग बप्पा सोनवणे यांनी सत्कार करत दिल्या शुभेच्छा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे व बीड जिल्ह्याचे लाडके खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या सूचनेनुसार महादेव सोपानराव गंगणे पाटील यांची परळी शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी नुकतीच ही घोषणा केली. प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड यांनी महादेव गंगणे यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. या निवडीनंतर बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. तसेच महादेव गंगणे हे यापुढे जनसेवा करत पक्षाच्या बळकटीकरणासाठी कार्यरत राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच महादेव गंगणे यांनीही खा. बजरंग सोनवणे यांचा सत्कार करत त्यांचे आभार मानले. *महादेव गंगणे यांचा राजकीय प्रवास* * दीर्घ अनुभव : महादेव गंगणे हे १९९९ पासून शरद पवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्यरत आहेत. * सक्रिय सहभाग :...

सर्व स्तरातून अभिनंदन...

इमेज
  प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय ‘एकता रंगकर्मी प्रबोधन रत्न पुरस्कार’ जाहीर छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:  शैक्षणिक, नाट्य, चित्रपट, साहित्य ,सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे, नाट्यशास्त्र विभाग, संत रामदास महाविद्यालय, घनसावंगी यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा ' एकता रंगकर्मी प्रबोधन रत्न पुरस्कार २०२६'जाहीर झाला आहे. 'जनहित मराठी वृत्तसमूह' आणि 'एकता फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य' यांच्या वतीने त्यांच्या अडीच दशकांच्या सेवाव्रताचा हा यथोचित गौरव करण्यात येत आहे. प्राध्यापक, अभिनेता, दिग्दर्शक, समीक्षक आणि लेखक अशा विविध भूमिकांतून कलेला प्रबोधनाचे अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या डॉ.सिद्धार्थ तायडे यांच्या निवडीची घोषणा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड,जनहित मराठीचे मुख्य संपादक के. बी. शेख, कार्यकारी संपादक प्रा. इम्रान शेख आणि एकता फाउंडेशनचे विभागीय अध्यक्ष प्रा. प्रकाश वाकळे,जिल्हाध्यक्ष पु. ना. बारडकर यांनी केली आहे. हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि.२६ एप्रिल २०२६ रोज...
इमेज
नागापूरची डॉ. आंबेडकर जयंती म्हणजे सम्यक समता - प्रा. डॉ. माधव रोडे परळी - वै : येथील नागापुर गावाचे समतेचे प्रतीक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अर्थात संविधान स्तंभ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण प्रमुख वक्ते प्रा. डॉ. माधव रोडे यांचा शुभ हस्ते सपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष : नागापुर गावच्या सरपंच सौ . मंगल रमेश तोंडारे , उपसरपंच  संतोष सोळंके होते. यावेळी प्रमुख उपस्थिति  वंचित बहुजन धाडीचे जिल्हा महासचिव  मिलिंद घाडगे , ॲड . सुरज घाडगे , शाम गंगाधरे , माजी सरपंच मोहनदादा सोळंके,  ॲड . अर्जन सोळंके ,शाम गंगाधरे , शिवाजी सोळंके , पशुवैद्यकीय अधिकारी श्री कृष्णा कोळी अदि होते.  यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. माधव रोडे म्हणाले नागापूर गावाची म्हणजे सम्यक स्वयंम्भू जयंती सोहळा आहे अस मला वाटते  कारण फक्त सामाज बांधवाच्या दानातून केला जाणार हा.जयंतीचा उपक्रम  स्वयंमभू आहे. हे पाहुन मला आनंद  झाला . नागापुर गावातील सर्व गावकऱ्यांचा तरुण युवा तसेच सम्यक मित्र मंडळ यांच्यातील...
इमेज
पं.यादवराज फड यांच्या  गायनात परंपरा आणि आधुनिकतेचा संगम           परळी - संत नारायणबाबांच्या 69 व्या पुण्यतिथीनिमित्त वांगी संस्थानने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात किराणा घराण्याचे प्रख्यात गायक आणि प्रतिभावंत संगीतकार पं.यादवराज फड यांचा " भक्ती - स्वरगंध " हा अभंगवाणीचा अत्यंत श्रवणीय असा अभूतपूर्व रंगलेला कार्यक्रम ऐकून वांगीकर जाणकार रसिकांना पर्वणीच मिळाली.  पं. यादवराज फड यांनी कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पंचपदीने केली. त्यात अलंकापूरी पुण्यभूमी पवित्र हे ईश स्तवन, जय रामकृष्ण हरी, रूप पहाता लोचनी , जय जय विठ्ठल रखुमाई या रचना त्यांनी अनुक्रमे  दुर्गा, नंद, हमीर या रागात सादर केल्या. त्यानंतर खमाज रागात झाली संध्या संदेह माझा गेला. तीलककामोद रागात ब्रह्मरस गोडी जयासी फावली, मध्यमग्राम भीमपलास हरी दासाचीये घरी या रचना गाऊन रंग भरला. भिन्न षड्ज रागात ज्ञानेश्वर माऊली हा गजर भावपूर्ण गायला. संत कबीरांची मन लागो मेरो यार फकीरी मे, ही रचना आणि कान्होबा तुझी घोंगडी चांगली  रे ही गौळण अतिशय रंगतदार, भावपूर्ण आणि तयारीने सादर कर...
इमेज
ग्लोबल विकास ट्रस्टच्या सहाय्यातून 30 गुंठ्यांत सव्वातीन लाखांचे उत्पन्न! लिंबू शेतीतून डिगंबर गडदे यांचा यशस्वी प्रयोग परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील वाघाळा येथील शेतकरी डिगंबर जिजाराम गडदे यांनी अल्पभूधारक असूनही आधुनिक पद्धतींचा अवलंब करत लिंबू शेतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केवळ 1 एकर शेती असलेल्या गडदे यांनी 2019 साली 30 गुंठे जमिनीत 100 लिंबूची रोपे लावून शेतीत नवा प्रयोग सुरू केला. या लिंबू बागेला लागवडीपासून अवघ्या 27 महिन्यांत फळधारणा सुरू झाली. ग्लोबल विकास ट्रस्टचे सुयोग्य मार्गदर्शन आणि गडदे यांनी केलेल्या नियोजनामुळे चालू वर्षात त्यांनी सुमारे 9 क्विंटल लिंबू उत्पादन घेतले आहे. सध्या बाजारात लिंबाला 125 रुपये प्रति किलोपर्यंत भाव मिळत असला तरी, कधी कधी हा दर 10 रुपयांपर्यंत घसरतो. अशा चढ-उतारांमध्येही गडदे यांना सरासरी 40 रुपये प्रति किलो दर मिळाला. लिंबू लागवडीतूनआतापर्यंत त्यांनी सुमारे 3.25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे, या शेतीसाठी त्यांचा एकूण खर्च केवळ 10 हजार रुपयांच्या आसपास राहिला आहे. ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना लिंब...

सर्व स्तरातून अभिनंदन....

इमेज
'मृद विज्ञान' आणि 'मशिन लर्निंग'चा संगम; परळी तालुक्यातील मांडव्याच्या सुपुत्राला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान परळी वैजनाथ, प्रतिनिधी:       आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधणे काळाची गरज बनली आहे. याच विचारातून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने गिरीश दशरथ चाटे यांना त्यांनी सादर केलेल्या संशोधन प्रबंधाबद्दल 'डॉक्टरेट' (पीएचडी) पदवी प्रदान केली आहे.        गिरीश चाटे यांनी "A Novel Framework for Soil image Classification Using Machine Learning" या विषयावर आपले संशोधन पूर्ण केले. त्यांनी त्यांच्या संशोधनात मृद विज्ञान (Soil Science) आणि मशिन लर्निंग (Machine Learning) या दोन भिन्न क्षेत्रांची सांगड घालत मातीच्या वर्गीकरणासाठी एक नवीन 'फ्रेमवर्क' विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे मातीचे अचूक आणि जलद वर्गीकरण करणे शक्य होणार असून, याचा मोठा फायदा कृषी क्षेत्राला होऊ शकतो. विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स विभागाचे  डॉ. संदीप एस. भामरे यांचे त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मो...

परळी येथे सत्कार.....

इमेज
  मनातली इच्छा जिद्द आणि चिकाटीने मिळवता येते -उपशिक्षणाधिकारी सुशील फुलारी परली वैजनाथ - मनातली इच्छा जिद्द आणि चिकाटीने मिळवता येते असे प्रतिपादन नुकतेच लातुर येथे नवनियुक्त उपशिक्षणाधिकारी सुशील फुलारी यांनी परळी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात केले.  सतत प्रयत्न जिद्द चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर हे यश साध्य केले आहे. या कार्यक्रमासाठी परळी फुलारी मित्र मंडळाच्या वतीने नियोजन माधवबाग येथे करण्यात आले होते कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक माजी सैनिक अरविंद गणपतराव फुलारी, प्रमुख  पाहुणे परळी तालुका ओबीसीचे अध्यक्ष विलासजी ताटे, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. यल्लावाड, अखिल भारतीय फुलारी समाज चे अध्यक्ष सुधीर फुलारी व सत्कारमूत उपशिक्षणाधिकारी सुशील फुलारी यांचे उपस्थिती होती. कार्यक्रमात परळीतील फुलारी परिवारातील सर्वांनी उपस्थिती लावली तसेच परिवाराचे स्नेही मित्र मंडळातील मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभासदांची व इतर शिक्षक मित्रमंडळींनी या सत्कारासाठी आवर्जून उपस्थिती लावली होती. मनोगतामध्ये अनंत मुंडे सर प्...

सर्व स्तरातून अभिनंदन...

इमेज
  शेख मुदस्सीर यांची 'सकल मुस्लिम युवक संघाच्या' प्रदेश संघटक पदी निवड परळी /प्रतिनिधी :-           परळी येथील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असलेले शेख मुदस्सीर नसीर यांची सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेच्या प्रदेश संघटक पदी निवड करण्यात आली आहे. ही निवड दिनांक २३ एप्रिल रोजी करण्यात  आहे. शेख मुदस्सीर हे मागील अनेक वर्षांपासून समाजकारण आणि पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. सामाजिक प्रश्नांची चांगली जाण, लोकांशी संवाद साधण्याची क्षमता आणि युवकांना एकत्र  कौशल्य यामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध सामाजिक मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून, गरजूंना मदत करणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि समाजात जागरूकता निर्माण करणे यामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामाची तसेच सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेसोबत सुरुवातीपासून असलेल्या सहभागाची दखल घेत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी त्यांची प्रदेश संघटक म्हणून निवड केली आहे.  " ही जबाबदारी माझ्यास...

घवघवीत यश .....सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन

इमेज
  वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग व फिजिओथेरपी कॉलेजचा विद्यापीठ परीक्षेत दैदिप्यमान निकाल परळी वैजनाथ (प्रतिनिधी):         येथील वैद्यनाथ सर्वांगीण विकास प्रतिष्ठान संचलित 'वैद्यनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग व फिजिओथेरपी कॉलेज'ने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक द्वारे घेण्यात आलेल्या हिवाळी २०२५ च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. कॉलेजचा निकाल अत्यंत उत्कृष्ट लागला असून विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे.     विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालानुसार, कॉलेजमधील विविध सत्रांचा निकाल देदीप्यमान लागला आहे. बीएससी नर्सिंग  ३ रे सेमिस्टर: ८०%,  बीएससी नर्सिंग४ थे सेमिस्टर: ९२.४५%, बीएससी नर्सिंग ५ वे सेमिस्टर: १००% (पूर्ण निकाल),बीएससी नर्सिंग ६ वे सेमिस्टर: ९७.०५%,  बीएससी नर्सिंग ७ वे सेमिस्टर: १००% (पूर्ण निकाल) विशेष म्हणजे ५ व्या आणि ७ व्या सेमिस्टरचा निकाल १०० टक्के लागला असून, विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.        या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक  डॉ. सूर्यकांत मुंडे...

न.प. ची अतिक्रमण हटाव मोहिम : कायमस्वरूपी पथकाची स्थापना

इमेज
न.प. ची अतिक्रमण हटाव मोहिम : कायमस्वरूपी पथकाची स्थापना अतिक्रमणे काढण्यात कोणताही भेदभाव होणार नाही ; सर्व नागरिकांना सारखाच न्याय - मुख्याधिकारी परळी वैजनाथ (प्रतिनिधी):        परळी वैजनाथ शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि नागरी सुविधांमधील अडथळे दूर करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ राबवण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे.,अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी कायमस्वरूपी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. अतिक्रमणे काढण्यात भेदभाव होणार नाही. सर्व नागरिकांना सारखाच न्याय  दिला जाणार आहे. ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर व पारदर्शक पद्धतीने केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी पी. एन. निगळ यांनी अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.         शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक जागा आणि प्रामुख्याने नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी व स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, नगर परिषदेने भेदभाव न करता सरसकट कारवाईचे धोरण स्वीकारले आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत सातत्य राखण्यासाठी प्रशासनाने एक ‘क...

घाटनांदूर रेल्वेथांब्यासाठी प्रस्ताव द्या..

इमेज
  १५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा रेल्वे व महामार्ग आढावा बैठकीत खा.बजरंग सोनवणे यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश बीड: मागील दोन वर्षात रेल्वे कामाला गती दिलेली आहे. आता रेल्वेचे काम युध्द पातळीवर करून १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुणे ते परळी रेल्वे धावलीच पाहिजे, शिवाय बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासहित ग्रामीण मार्गावरील ब्लॅकस्पॉट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश खा.बजरंग सोनवणे यांनी रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या हॉलमध्ये रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत विविध प्रलंबित कामे, भूसंपादन, निकृष्ट दर्जा, अपघातप्रवण ठिकाणे व नागरिकांच्या अडचणी यांसह सर्वच मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खा.बजरंग सोनवणे यांनी बैठकीत अंबाजोगाई, केज, नेकनूर, मांजरसुंबा, पाटोदा व माजलगाव शहरांभोवती बायपास व उड्डाणपूल उभारण्याचा मुद्दा उपस्...
इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले - प्रा. डॉ. माधव रोडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आत्माराम कराड यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न! परळी - वै : प्रतिनिधी... माळहिवरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला . जयंती निमित्ताने  निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन सरपंच आत्मरामजी कराड, प्रा. डॉ. माधव रोडे  प्रा. विजयजी  मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ॲड . सुनिल सोनपीर , उपसरपंच, जयंती समिती अध्यक्ष , पोलीस पाटील कृष्णा धनघाव आदि होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. माधव रोडे म्हणाले , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. शिक्षण हेच प्रगतीचे मुख्य साधन आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःचा सन्मान कायम ठेवा, व्यसनांपासून  दुर रहा. सहकार्याची भावना ठेवा, संयमी व्हा , हार मानू नका , आयुष्यात परिस्थिती कितीही कठीण असली तरी इच्छा शक्ती व मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते. आपली जगण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत मग शिका ! जिद्दी ठेवा ! संघर्षांची तयारी सह...

पालघर येथील 48 शेतकऱ्यांचे यशस्वी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण

इमेज
“कृषीकुल” आधुनिक शेतीचे विद्यापीठ; देशभरातील शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाचे केंद्र पालघर येथील 48 शेतकऱ्यांचे यशस्वी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ग्लोबल विकास ट्रस्टच्या सिरसाळा येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या “कृषीकुल” शेतकरी प्रशिक्षण केंद्राने आधुनिक व शाश्वत शेतीचे एक प्रभावी आणि आदर्श मॉडेल उभे केले आहे. बीड जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता हे केंद्र आता संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. परिणामी, येथे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पारंपरिक शेतीतून मिळणारे मर्यादित उत्पन्न लक्षात घेता, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, पिक पद्धतीतील बदल आणि नव्या संधींचा शोध अत्यावश्यक ठरतो. याच दृष्टीने “कृषीकुल” शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध, सखोल आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन देत त्यांना सक्षम बनविण्याचे काम करत आहे. नुकतेच पालघर जिल्ह्यातील 48 शेतकरी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी कृषीकुल येथे दाखल झाले. या प्रशिक्षणात रेशीम शेतीचे सर्वांगीण मार्गदर्शन देण्यात आले...

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकांने ‘वसुंधरा रक्षका’ची भूमिका बजावावी- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

इमेज
वसुंधरा दिनानिमित्त ‘वसुंधरा रक्षक अभियान’, महा आरपीईटी अभियानाचा शुभारंभ पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकांने ‘वसुंधरा रक्षका’ची भूमिका बजावावी- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे मुंबई, दि. २२ : वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि वेगाने होणारे शहरीकरण याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने ‘वसुंधरा रक्षक’ म्हणून पुढे यावे, असे आवाहन राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ‘वसुंधरा रक्षक’ ही संकल्पना केवळ उपक्रम नसून एक जनआंदोलन बनवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित समारंभात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘वसुंधरा रक्षक अभियान २०२६’, ‘महा-आरपीईटी अभियान, राज्य वातावरणीय कृती कक्षाच्या संकेतस्थळाचे अनावरण तसेच ‘इमिशन ट्रेडिंग स्कीम प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. वसुंधरा रक्षक अभियानाच्या लोगोचेही यावेळी अनावरण करण्यात आले. या लोगोची निर्मिती स्वतः मंत्री पंकजा मुंडे यांनी तयार केली आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आ...

लाभार्थ्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी एकाच छताखाली सर्व सेवा

इमेज
स्व.अजितदादा पवार यांच्या नावाने वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापनेचा निर्णय घेणारी परळी वैजनाथ नगर परिषद महाराष्ट्रात ठरणार पहिली! अभिनव सेवाउपक्रम: परळी नगर परिषदेच्या वतीने ‘स्व. अजितदादा पवार वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ होणार स्थापन लाभार्थ्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी एकाच छताखाली सर्व सेवा परळी वैजनाथ (प्रतिनिधी)       परळीत नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना शासकीय वैद्यकीय योजनांचा लाभ सुलभ, वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा या उद्देशाने नगर परिषद कार्यालयात “स्व. अजितदादा पवार वैद्यकीय सहाय्यता कक्ष” स्थापन करण्यास न.प.च्या स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली आहे.नगर परिषद स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे.दरम्यान, अशा प्रकारचा स्व. अजितदादा पवार वैद्यकीय सहाय्यता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेणारी परळी नगर परिषद महाराष्ट्रात पहिली नगर परिषद ठरणार आहे.       नागरिकांना विविध आरोग्य योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि पाठपुरावा यासाठी एकाच ठिकाण...

सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने विशेष गौरव सोहळा...

इमेज
  परळीत शानदार सोहळ्यात १९ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार ; संत -महंत, मान्यवर व समाजबांधवांची प्रचंड उपस्थिती सकल ब्राह्मण समाजाने केलेला माझा सन्मान हा तमाम परळीकरांचा सन्मान- नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी धर्म परायण व्यक्तिमत्व हे उपनयनासारख्या संस्कारांनीच रुजवले जाते - ह.भ.प. बाळू महाराज उखळीकर परळी वै.(प्रतिनिधी)-       ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने आयोजित ४६ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज २२ एप्रिल रोजी शानदार व वैभवी स्वरूपात संपन्न झाला.शानदार सोहळ्यात मराठवाड्यातील विविध ठिकाणच्या १९ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. या मंगलमय व पवित्र सोहळ्यासाठी संत -महंत, मान्यवर व समाज बांधवांची मोठी उपस्थिती लाभली. धर्मपरायण व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आपले सोळा संस्कार असल्याचे प्रतिपादन भागवतमर्मज्ञ ह भ प बाळू महाराज उखळीकर यांनी केले. तर सकल ब्राह्मण समाजाने केलेला माझा सन्मान हा तमाम परळीकरांचा सन्मान असल्याची कृतज्ञ भावना परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी याप्रसंगी व्...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट