पोस्ट्स

फेब्रुवारी ८, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण.

इमेज
धर्मापुरीत ‘अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा’ ज्ञानयज्ञास उद्यापासून प्रारंभ १०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण. परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : तालुक्यातील धर्मापुरी येथील जागृत देवस्थान श्री रोकडेश्वर मंदिरात श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त भव्य ‘अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व हनुमान चालीसा पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २६ मार्च रोजी दुपारी २ वाजता या भक्तिमय सोहळ्याचा शुभारंभ होणार असून परिसरात आधीच धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ख्यातनाम ह.भ.प. भागवताचार्य कांतादेव महाराज (दादाहरी वडगावकर) यांच्या रसाळ वाणीतून सादर होणारी ‘श्रीमद् भागवत कथा’ होय. दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत कथा होणार असून अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत भाविकांना सखोल कथाश्रवणाचचा मिळणार आहे. सप्ताहानिमित्त कीर्तन महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे. दररोज रात्री ८ ते १० या वेळेत ह.भ.प. लिंबाजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. श्रीकांतजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. सुशांत मह...
इमेज
महापशुधन एक्स्पो2026: आज  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहा -राजेश गित्ते  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  लोकनेत्या  ना पंकजाताई गोपीनाथराव मुंडे (पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र ) यांच्या संकल्पनेतून परळी वैजनाथ येथे  महा पशुधन एक्सपो -2026(13-15फेब्रुवारी)आज दिनांक 14/02/2026रोजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्र फडणवीस भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, सरपंच, चेअरमन, नागरिक, युवक, युवती यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळीभाजपा तालुका अध्यक्ष राजेश गित्ते यांनी केले आहे.              महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन दिवसीय ऐतिहासिक ‘महापशुधन एक्सपो’चे उद्घाटन ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज वैद्यनाथ महाविद्यालया समोरील ओपळे मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात पशुपालकांना गायी, म्हशी, घोडे, शेळ्या-मेंढ्या आणि विविध पक्ष्यांच्या दर्जे...
इमेज
  परळीतील कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालयास स्व.अजित पवार यांचे नाव द्या– दीपक देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी वैजनाथ येथे सुरू होऊ घातलेल्या कृषी महाविद्यालय व पशुवैद्यकीय महाविद्यालयास स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) चे नेते माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी  मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सादर निवेदनात देशमुख यांनी नमूद केले आहे की, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्य करताना त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती दिली. शेती, सिंचन, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात त्यांनी दूरदृष्टी ठेवून घेतलेल्या निर्णयांमुळे जिल्ह्यात विकासाची नवी दिशा निर्माण झाली. परळी वैजनाथ येथे उभारण्यात येणारी कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालये ही शेतकरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. या शैक्षणिक संस्थांमुळे परिसरातील विद्यार्थ...
इमेज
  चार श्रमसंहिता रद्द करा, मागणीसाठी परळीत सिटू कामगारांचा धडकला  तहसीलवर भव्य मोर्चा  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       चार श्रमसंहिता रद्द करा यासह अन्य कामगार क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी आज परळी तहसील कार्यालयावर सिटू कामगारांचा भव्य दिव्य मोर्चा धडकला. कामगार विरोधी धोरण रद्द करा, खाजगीकरण रद्द करा, चार श्रम संहिता रद्द करा अशा प्रकारची मागणी सिटू कामगार मोर्चेकर्‍यांनी शासनाकडे केली.   केंद्र सरकारने कामगार विरोधी भांडवलदार धार्जिन्या चार श्रमसंहिता लागू केलेल्या आहेत. कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द करा या प्रमुख मागणीसाठी परळी सिटू कामगार संघटनेने परळी तहसीलवर मोर्चा काढला होता. परळीतील सिटू कार्यालयापासून हा मोर्चा टावर- मोंढा- बस स्टॅन्ड मार्गे तहसीलवर पोहोचला. चार श्रमसंहिता रद्द करा, आशा वर्कर्सना कायम करा, शालेय पोषण आहार कामगारांना कायम करा, आजी- आजोबांना दहा हजार रुपये पेन्शन द्या, कंत्राटीकरण थांबवा,  खाजगी धंद्यात आरक्षण लागू करा, घर कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती द्या, घर कामगारांना दहा हजार रुपये पेन्शन द्या, शालेय पोषण आहा...

बीड जिल्ह्यात सर्वाधिक तब्बल 25 कोटींच्या भांड्यांचे होणार वितरण

इमेज
आता राज्यातील ४ लाख  ऊसतोड कामगारांना होणार गृहोपयोगी वस्तू संचांचे वाटप ;शासन निर्णय निर्गमित बीड जिल्ह्यात सर्वाधिक तब्बल 25 कोटींच्या भांड्यांचे होणार वितरण परळीवैजनाथ, प्रतिनिधी.....       राज्यातील ऊसतोड कामगार व त्यांचे कुटूंबियांना गळीत हंगामाच्या कालावधीमध्ये अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ऊसतोड कामगारांना "गृहोपयोगी वस्तू संच" वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.  गृहोपयोगी वस्तू संच वाटप करण्याबाबत गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ४ लाख लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस्तु संच वाटप करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी निर्गमित करण्यात आला आहे या मध्ये सर्वाधिक लाभार्थी संख्या बीड जिल्ह्यात 25 हजार इतकी असून तब्बल 25 कोटी रुपयांच्या भांड्यांचे बीड जिल्ह्यात वितरण होणार आहे.        महाराष्ट्र राज्यामध्ये साखर उद्योग हा एक प्रमुख उद्योग असून सद्यः स्थितीमध्ये राज्यात कार्यरत सहकार व खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये उसतो...

स्व. अजितदादांनी बीड येथील ऊसतोड कामगार मेळाव्यात धनंजय मुंडेना दिला होता शब्द!

इमेज
  धनंजय मुंडेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास मोठे यश; ऊसतोड कामगारांच्या मुला - मुलींना दर्जेदार शिक्षणाची वाट मोकळी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून बीड जिल्ह्यात आणखी ११ वसतिगृहे उभारणीस शासनाकडून १५९.३६ कोटी रुपये निधी उपलब्ध!   मुंबई (प्रतिनिधी) - लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सुरू केलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेला व्यापक स्वरूप प्राप्त होत असून धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.      धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री असताना २५ जून, २०२१ रोजी या योजनेची घोषणा करून प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू केली होती. त्यामुळे मुंडे जनक असलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतीगृह योजनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये शंभर क्षमतेचे मुलींसाठी एक व मुलांसाठी एक असे एकूण 22 वसतीगृह मंजूर करून भाड्याच्या जागेत सुरू करण्यात आलेले आहेत. दरम्यान त्यापैकी आतापर्यंत तीन वसतीगृहांना स्वतःची जागा व निधी मिळालेला असून त्याचे बांध...
इमेज
  ना.पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतील महापशुधन एक्स्पोत शेतकरी व पशुपालकांनी सहभाग नोंदवावा-उमाताई समशेट्टे   परळी (प्रतिनिधी)            परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात येत असलेल्या 'महापशुधन एक्स्पो-२०२६' या अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ना.पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या देशपातळीवरील महापशुधन एक्स्पो-2026 या भव्य या प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील आणि देशातील पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी म्हणून आयोजित करण्यात आले आहे. ना.पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या परळी वैद्यनाथ येथील देशपातळीवरील महापशुधन एक्स्पो-2026 या भव्य प्रदर्शनाचा शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या संखेने सहभाग घ्यावा असे आवाहन भाजपच्या शहराध्यक्षा सौ.उमाताई समशेट्टे यांनी केले आहे.            परळी शहरातील तहसिल समोरील मैदानावर  दि.13 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय पशुप्रदर्शन संपन्न होत असून परळी हे पशुप्रदर्शन ३२ एकरांच्या भव्य परिसरात होणार आहे. शेतकऱ्यांना व बेरो...

मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारच्या विस्तारित द्वितीय दालनाचा शुभारंभ

इमेज
अंतर्मनाची साधनाच माणसाला देवत्व प्राप्त करुन देते- माता स्वामीनी मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारच्या विस्तारित द्वितीय दालनाचा शुभारंभ परळी (प्रतिनिधी)  प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात बाह्य आणि अंतर्मन अशा दोन क्रिया असतात.यातील अंतर्मनाची साधना ही देवत्वाकडे घेवुन जाणारी असल्याचे पुज्य  माता स्वामीनी यांनी केले.परळी शहरातील मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारच्या विस्तारित द्वितीय दालनाचा दि.१० फेब्रुवारी रोजी माताजींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी बोलत होत्या.  पुज्य स्वामीनी माताजी यांचे सोमवार दि. 9 रोजी सकाळी  ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परळी वैद्यनाथ नगरीत आगमन झाले आहे.गोपाळ आंधळे यांचे घरणीकर रोड,भाजपा कार्यालयाशेजारी असलेले मुकुंद पुजा विधी साहित्य भांडार हे भाविकांना खात्रीशीर आणि सर्व प्रकारच्या पुजेचे साहित्य मिळणारे दालन म्हणून ओळख निर्माण झाल्यानंतर आता या मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारच्या द्वितीय दालनाचा शुभारंभ वंदनीय पुज्य स्वामीनी माताजी यांच्याहस्ते नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.१० फेब्रुवारी रोजी करण्यात आला...

बीडच्या पोलीस भरतीमध्ये कोसळून दुर्दैवी मृत्यू..

इमेज
पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या परळीतील मांडेखाेलच्या दीपकवर पोलीस भरतीतच काळाने घातला घाला ! बीडच्या पोलीस भरतीमध्ये कोसळून दुर्दैवी मृत्यू परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत घेत बीडच्या पोलीस भरतीमध्ये सहभागी झालेल्या परळी तालुक्यातील मांडेखेलच्या दीपक व्हावळे याच्यावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने मांडेखेल गावावर शोककळा पसरली आहे .ऊसतोड मजूर कुटुंबातील या युवकाचे ऐन पोलीस भरती मैदानावरच भरती प्रक्रियेत असताना निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.       बीड येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान बुधवारी दुपारी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक भास्कर व्हावळे (रा. मांडेखेल.ता. परळी, जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा मांडेखेल येथील रहिवासी आहे. दीपक सकाळी परळीहून बीड येथे पोलीस भरतीसाठी दाखल झाला होता.भरतीदरम्यान कवायत, धावणे आदी शारीरिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डीहायड्रेशनचा त्रास होत असल्याचे तपासण...

भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा...

इमेज
  गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या तीन दिवसीय प्रवचन मालेचे माजलगावात आयोजन  माजलगाव (प्रतिनिधी):-  प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री संत धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान माजलगाव आणि राजस्थानी सेवा समाज माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या रसाळ वाणीतून तीन दिवसीय प्रवचन मालेचे आयोजन माजलगाव येथे करण्यात आले आहे. हे प्रवचन मालेचे 16 वे वर्षे आहे. तर प्रवचनाचा विषय हरिपाठ हा असून या अमृतमय प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत धुंडा महाराज देगलूरकर सेवा प्रतिष्ठान व राजस्थानी सेवा समाज माजलगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.   फाल्गुन शुद्ध 1 ते फाल्गुन शुद्ध 3 शके 1947 अर्थात बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 ते शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 दररोज सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेमध्ये राजस्थानी मंगल कार्यालय माजलगाव येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ या विषयावर प्रवचन मालेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन...

इमेज
संत सोपानकाका मंदिरात महाशिवरात्री महोत्सवा निमित्त ; शिवपुराण कथा व शिवलीला अमृत पारायण सोहळ्याचे आयोजन  परळी / प्रतिनिधी         येथील श्री संत सोपान काका मंदिरात महाशिवरात्री महोत्सवानिमित्त शिवम महापुराण कथा व शिवलीला अमृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून श्री ह भ प मारुती महाराज लातूरकर यांच्या मधुर वाणीतून शिवपुराण कथेचे श्रवण करण्याचा योग परळीकरांना आला आहे तरी परळी पंचक्रोशीतील भाविकांनी या शिवप्राण कथा व शिवलीला अमृत पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा तसेच जास्तीत जास्त भाविकांनी पारायण सोहळ्यास बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहनही उखळीकर फडाच्या वतीने करण्यात आले आहे.        दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त श्री संत सोपान काका मंदिरात दिनांक 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान शिवपुराण कथा व शिवलीला अमृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे लातूर येथील प्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य व शिवपुराण कथाकार ह भ प मारुती महाराज लातूरकर यांची उपस्थिती लाभणार असून दुपारी 2 ते 5 या दरम्यान कथेचे आयोजन करण्यात आले असू...
इमेज
परळी वैजनाथ येथील महा पशुधन एक्स्पो आणि 'माझी वसुंधरा' लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण मुंबई, दि. 10 - पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे येत्या 13 ते 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीयस्तरावरील महापशुधन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या बोधचिन्हाचे तसेच पर्यावरण विभागाच्या 'माझी वसुंधरा' अभियानाच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत झाले.  मंत्रालयात आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या कार्यक्रमास मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन यांच्यासह विविध मंत्री तसेच सचिव उपस्थित होते.  पशुसंवर्धन विभाग व व पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या वतीने बीडमधील परळी वैजनाथ येथील ओपळे मैदानात हे महा पशुधन एक्स्पो होणार आहे. या प्रदर्शनात देशभरातील विविध जातीवंत पशुधन पाहण्यास मिळणार आहेत. त्याशिवाय पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविधल पशुसंवर्धन विषयक...

शारदाविद्यामंदिर, बँक कॉलनी येथे परीक्षा केंद्र.....

इमेज
  परळीतील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-              महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आजपासून बारावीची परीक्षा सुरू झाल्या आहेत. परळी वैजनाथ शहरातील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयच्या परीक्षा शारदाविद्यामंदिर, बँक कॉलनी येथे इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू असल्याची प्रतिक्रिया केंद्रप्रमुख एस.आर.कापसे यांनी दिली.          नाथ शिक्षण संस्था संचलित, परळी वैजनाथ संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे इयत्ता बारावीच्या परीक्षा शिक्षण विभागाच्या निर्दशाचे पालन करत परीक्षा सुरळीत सुरू आहेत.         परिक्षा केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त होता. तसेच यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयच्या बारावीच्या परीक्षा शारदाविद्यामंदिर येथे सुरळीत सुरू आहे. परीक्षा केंद्रावर कडक शिस्तीत बारावीच्या कॉपीमुक्त परीक्षा पार पडत आहेत. परीक्षा केंद्रांवर भरारी पथक व बैठे पथक, सीसीटीव्ही निरीक्षण व सतत तपासणी व प्रशा...

संच क्रमांक सहा व आठ तात्काळ बंद ठेवण्याचे आदेश !

इमेज
परळीचे औष्णिक वीज केंद्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रडारवर : संच क्रमांक सहा व आठ तात्काळ बंद ठेवण्याचे आदेश ! औष्णिक विद्युत केंद्राची प्रदूषण हलगर्जी, कायद्याचे उल्लंघन, नियमांची पायमल्ली आणि अनियमितता तपासणीत उघड परळी वैजनाथ | प्रतिनिधी......      प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने कायमच वादग्रस्त ठरलेल्या परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्रात सध्या सुरू असलेल्या संच क्रमांक सहा, सात व आठ या संचापैकी संच क्रमांक सहा व आठ तात्काळ बंद करा अशा पद्धतीची आदेशाची नोटीस केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढली आहे. या नोटिसीतून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रदूषण विषयक हलगर्जी, पर्यावरणीय कायद्याचे उल्लंघन, नियमांची सातत्याने पायमल्ली आणि अनियमितता अशा अनेक बाबी उघड झाल्या आहेत. या अनुषंगाने महानिर्मितीच्या अखत्यारीतील औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रडारवर परळीचे औष्णिक विद्युत केंद्र आल्याचे दिसून य...

कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

इमेज
12 फेब्रुवारी रोजी सिटू कामगार संघटनेचा परळी तहसील_ कार्यालयावर भव्य मोर्चा- प्रा खाडे बी.जी. परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      कामगारांनी शंभर वर्षाच्या लढ्यातून कामगारांच्या हिताचे निर्माण केलेले कामगार कायदे मोदी सरकारने रद्द केले आहेत. कामगार विरोधी मालकधार्जिन्या चार श्रमसंहिता लागू केल्या आहेत. चार श्रमसंहिता रद्द करा या मागणीसाठी देशातील सर्व कामगार संघटना 12 फेब्रुवारी रोजी संप करत आहेत. बीड जिल्ह्यात सिटू कामगार संघटना ही चार श्रमसंहिता रद्द करा या मागणीसाठी 12 फेब्रुवारी रोजी परळी वैजनाथ तहसीलवर मोर्चा काढून आंदोलन करणार आहे.          या श्रमसंहितांमुळे कामगार अस्थिर होणार व तो कायमचा नोकरीला मुकणार आहे. कारखान्यातील सर्व नोकऱ्या तात्पुरत्या होणार आहेत. सर्व तरुण कामगारांचा विचार करता केंद्र सरकारचे धोरण चुकीचे आहे. त्यामुळे सिटूचा श्रमसंहितेस विरोध आहे. सिटू अंतर्गत परळी तालुक्यातील बांधकाम कामगार संघटना, लालबावटा कामगार युनियन, आशा वर्कर्स युनियन, शालेय पोषण आहार संघटना, असंघटित कामगार संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत. हा मोर्चा रोडे ...
इमेज
भरत गित्ते ब्रँड ॲम्बेसिडर ;तौरल इंडिया सुपा प्रकल्प: महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'तौरल इंडिया-सुपा प्लांट'चे भव्य उदघाटन  अहिल्यानगर, प्रतिनिधी...         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पारनेर, अहिल्यानगर येथे 'तौरल इंडिया-सुपा प्लांटचे' उदघाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजक भरत गित्ते अभिनंदन व कौतुक करत भरत गित्ते हे महाराष्ट्राच्या नवउद्योग विश्वाचेब्रँड ॲम्बेसिडर ठरल्याचे सांगितले.तसेच तौरल इंडिया सुपा प्रकल्प सुरु होत आहे हा महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव  असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी सांगितले.           तौरल इंडियाचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गित्ते यांनी सुरु केलेल्या पारनेर, अहिल्यानगर येथील 'तौरल इंडिया-सुपा प्लांटचे' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!