पोस्ट्स

फेब्रुवारी १५, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यावरण व पशुसंवर्धन सचिवांना दिले निर्देश

इमेज
ना. पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात घेतल्या विभागाच्या मॅरेथॉन बैठका ; संपूर्ण दिवस कामकाजात नद्या व उद्योगांचे प्रदूषण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजनेचा घेतला आढावा प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यावरण व पशुसंवर्धन सचिवांना दिले निर्देश मुंबई दि. ०१ --- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेटीगाठी बरोबरच विभागाच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या. पर्यावरणाच्या बैठकीत नद्या व उद्योगांचे प्रदूषण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तर पशुसंवर्धन बैठकीत नव्यानेच सुरू झालेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजनेचा आढावा घेतयोजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यावरण व पशुसंवर्धन सचिवांना निर्देश दिले.    ना. पंकजाताई मुंडे यांचा आजचा संपूर्ण दिवस शासकीय कामकाजात गेला. दुपारी कॅबिनेट बैठक झाल्यानंतर त्यांनी पर्यावरण व पशुसंवर्धन विभागाच्या सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वेगवेगळ्या विषयांवर एका मागोमाग एक अशा मॅरेथॉन बैठका घेतल्या.    वारंवार प्रदुषण करणाऱ्या उद्योगांची बँक गॅरंटी व दंडाची रक्कम व...

ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांच्या ‘धडपड’ या लेख संग्रहाचे प्रकाशन

इमेज
‘धडपड’ हा लेखसंग्रह पत्रकारिता क्षेत्रातील नव्या पिढीसाठी मार्गदर्शक-प्रशांत जोशी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांच्या ‘धडपड’ या लेख संग्रहाचे  प्रकाशन परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः-  ‘धडपड’ हा लेखसंग्रह पत्रकारिता क्षेत्रातील नव्या पिढीसाठी उपयुक्त तर आहेतच शिवाय तो मार्गदर्शकही आहे असे प्रतिपादन माजीमंत्री आमदार धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांनी केले.          परळीतील शिक्षक ,ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक लक्ष्मण वाकडे यांच्या ‘धडपड’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी (ता.२१) येथील नेहरू चौक परिसरातील हनुमान कॉम्प्लेक्स येथे श्री जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार संजय खाकरे, जगदीश शिंदे, न्यू हायस्कूलचे पर्यवेक्षक दाजीबा नखाते, ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब मुंडे, सुर्यकांत कातकडे, अमोल कांबळे, राहुल ताटे, सचिन काळम,  पत्रकार दत्ता शिवगण, मोहन साखरे, माऊली होळंबे, रामदास कराड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रशांत जोशी यावेळी म्हणाले की, गेली चार दशके परळीच्या पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले लक्ष्मण वाकडे ...

सर्व स्तरातून अभिनंदन......

इमेज
  परळीसाठी अभिमानास्पद; रामरक्षा गोशाळेला महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय ‘देशी गोवंश सन्मान’ पुरस्कार प्रदान परळी वैजनाथ : प्रतिनिधी...         पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य देशी गोवंश सन्मान’ योजनेंतर्गत रामरक्षा प्रतिष्ठान संचलित रामरक्षा गोशाळेला राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.     परळी वैजनाथ येथे आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशी गोवंश संवर्धन, गोसेवा आणि संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यास पशुसंवर्धन विभाग सचिव डाॅ. एन. रामास्वामी, आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रवीण कुमार देवरे, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा तसेच सदस्य सुनील सूर्यवंशी, उद्धव नेरकर, सनतकुमार गुप्ता आणि नितीन मार्कडेय उपस्थित होते. रामरक्षा गोशाळेचे संचालक रतन कोठारी यांनी मान्यवरांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. आदर्श गोशाळा म्हणून ओळख ---------------------     परळी वैजना...
इमेज
  गंगाबाई कराळे यांचे निधन परळी/प्रतिनिधी - गणेशपार-सावता महाराज मंदिर परिसरातील ज्येष्ठ महिला, माजी नगरसेवक बालासाहेब कराळे यांच्या मातोश्री गंगाबाई एकनाथराव कराळे (वय ९०) यांचे शुक्रवारी (२० फेब्रुवारी) सकाळी १० च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५ च्या सुमारास परळीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे, दीर, बहीण असा मोठा परिवार आहे.

उत्पन्न मर्यादा वाढवण्याची मागणी

इमेज
  महाराष्ट्रात ७५ लाख लोक रेशन कव्हरमधून वंचित, एमपीजे चे मुख्यमंत्र्यांना निवेदन   उत्पन्न मर्यादा वाढवण्याची मागणी परळी प्रतिनिधी : महाराष्ट्रात लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली (टीपीडीएस) आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (एनएफएसए) अंतर्गत रेशन पात्रतेसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादेत त्वरित वाढ करण्याची मागणी मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर (एमपीजे) ने केली आहे. या संदर्भात संघटनेने मुख्यमंत्र्यांना एक सविस्तर निवेदन सादर केले आहे. एमपीजेने चिंता व्यक्त केली की रेशन पात्रतेसाठी सध्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरांमध्ये ₹५९,००० आणि खेड्यांमध्ये ₹४४,००० आहे. हे मानक १० वर्षांहून अधिक जुने आहे. आजच्या कंबरडे मोडणाऱ्या महागाईमध्ये, दरमहा ₹५,००० पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना "आर्थिकदृष्ट्या संपन्न" मानून रेशनपासून वंचित ठेवणे पूर्णपणे अमानवीय आणि वास्तविकतेशी विसंगत आहे. अलिकडेच झालेल्या सरकारी पडताळणी मोहिमेमुळे राज्यातील सुमारे ७५ लाख लोकांना रेशन कव्हरमधून वगळण्यात आले आहे. माध्यमांशी बोलताना एमपीजेच्या प्रवक्त्याने सांगितले की, इतक्या कमी उत्पन्न मर...

तहसीलदार वर कारवाई ... तहसील परिसरात फटाके फोडून केला जल्लोष

इमेज
  सतत वादग्रस्त ठरलेले परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे लाच प्रकरणी जाळ्यात !  परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...        कायमच वादग्रस्त राहिलेल्या परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर आज लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बीडच्या पथकाने कारवाई केली असून लाच प्रकरणांमध्ये व्यंकटेश मुंडे जाळ्यात अडकले आहेत.       परळी वैजनाथ येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बीड कडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदाराला ऐपत प्रमाणपत्र देण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आलेली होती. प्रत्यक्षात वीस हजार रुपयांमध्ये तडजोडीने हे प्रमाणपत्र देण्याचे ठरले होते. या अनुषंगाने आज एका पथकाने प्रत्यक्ष तहसील कार्यालयात दाखल होत या लाच प्रकरणी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर कारवाई केली आहे. तक्रारदाराच्या हालचालींवरून तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्षात ही लाच स्वीकारली नसली तरी तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवश्यक सर्व पुरावे संकलित केले,सर...
इमेज
  सौर ऊर्जा उपलब्ध करण्या बाबत ग्राहक पंचायतच्या  निवेदनाची मुख्यमंत्री सचिवालयाकडून दखल :- अनिल बोर्डे गेवराई ( प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील शेतकरी ग्राहकांना मागेल त्याला सौर ऊर्जा योजनेचा लाभ मि ळण्यासाठी  बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांनी दिलेल्या निवेदनाची मा. श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या सचिवालयाने तात्काळ  दखल घेऊन सदरील प्रकरण संबंधित विभागाकडे  निवेदन तात्काळ पुढील योग्य त्या कार्यवाही स्तव सादर करण्यात आले आहे . त्यामुळे बीड जिल्ह्यातील बहुसंख्य रक्कम भरणाऱ्या शेतकरी ग्राहकाना सौर ऊर्जा मिळण्या बाबत रकमेचा भरणा करण्यात आला आहे. त्या सर्व शेतकरी ग्राहकांना सौर ऊर्जाचा लाभ  मिळणार आहे.  त्यामुळे बीड जिल्ह्यातील रक्कम भरणाऱ्या शेतकरी ग्राहकांना सौर ऊर्जाचा तात्काळ लाभ मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे तसा ई-मेल(पत्र) बीड जिल्हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्याकडे प्राप्त झाला आहे . यापूर्वी देखील ग्राहक पंचायतच्या वारंवार पत्रव्यवहार केल्यामुळे बीड जिल्हा सौर ऊर्जा प्रथम क्रमांकात आला होता. अ...

संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा अभिनव उपक्रम

इमेज
परळीत संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस, सहाय्यक आयुक्त मा. विशाल लोंढे,ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांची उपस्थिती लाभणार संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा अभिनव उपक्रम परळी (प्रतिनिधी):-संत परंपरेतील समाजप्रबोधनाची अखंड ज्योत असलेल्या संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, परळी यांच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर येथे संपन्न होणार आहे. परळी परिसरातील सर्व अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या प्रेरणादायी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक तथा संस्थेचे सचिव पृथ्वी शिंदे यांनी केले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा ८९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन (२०१६) चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस हे राहणार आहेत. उद्घाटक म्हणून सम...

लाखो विद्यार्थी आणि मुस्लिम समाजातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय मतपेटीच्या राजकारणासाठी

इमेज
जमात-ए-इस्लामी हिंद, प्रदेश अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी मुसलमानांसाठी ५ टक्के आरक्षण रद्द केल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली लाखो विद्यार्थी आणि मुस्लिम समाजातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय मतपेटीच्या राजकारणासाठी परळी प्रतिनिधी : जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी राज्यात मुसलमानांसाठी असलेले ५ टक्के आरक्षण औपचारिकरित्या रद्द केल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मौलाना इलियास खान म्हणाले की सरकार आपल्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी कायदेशीर तरतुदींचा आधार घेत असले, तरी एका संवैधानिक लोकशाहीत सर्व नागरिकांसाठी न्याय या तत्त्वाकडे दुर्लक्ष करता येत नाही. लाखो विद्यार्थी आणि मुस्लिम समाजातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय मतपेटीच्या राजकारणासाठी किंवा सूडबुद्धीच्या राजकारणासाठी वापरले जाऊ नयेत. जमात-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्रचे अध्यक्ष यांनी मुसलमानांच्या शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाबद्दल तसेच त्यांना जाणीवपूर्वक राष्ट्रीय मुख्य प्रवाहापासून दूर ठेवणाऱ्या धोरणांबाबत च...
इमेज
काव्या महिला महाविद्यालय अंबाजोगाई  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी  अंबाजोगाई (प्रतिनिधी )  अंबाजोगाई येथील काव्या महिला महाविद्यालय येथील मुलींनी आपल्या कली मधून शिवनेरी किल्ला हा तयार केला   हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज काव्या महिला महाविद्यालयाला प्रमुख पाहुणे श्रुती अमोल लोमटे नगरसेविका अंबाजोगाई महाविद्यालयाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित होत्या त्यांनी आज पूर्ण विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांबद्दल पूर्ण माहिती दिलीफार कमी जणांना माहीत असेल म्हणून शेअर करतोय पुढच्या पिढीला पण माहीत करून द्या...  *छत्रपती* एक आख्यायिका का झाले...  शिवाजी महाराजांचे 7 घोडे - 1- मोती 2- विश्वास  3- तुरंगी  4- इंद्रायणी 5- गाजर  6- रणभीर 7- कृष्णा- शेवटच्या काळातील पांढरा घोडा. महाराज राज्याभिषेकांनंतर या वर बसले. शिवाजी महाराज घोड्याचा वापर निर्णायक प्रसंगीच करत असत. छत्रपती शिवरायांचा आहार साधा होता.  संपूर्ण जीवन निर्व्यसनी. मोहिमेच्यावेळी तंबूत झोपणे. दैनंदीन पोशा...

नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची विविध शिवजयंती कार्यक्रमांना उपस्थिती....

इमेज
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती परळीत उत्साहात साजरी नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची विविध शिवजयंती कार्यक्रमांना उपस्थिती  छत्रपती शिवरायांच्या आदर्श विचारांच्या वाटचालीतूनच जीवनाचे कल्याण –सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ ,प्रतिनिधी.....         हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परळी शहरात अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली. परळी शहरातील विविध शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमांना नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी उपस्थिती लावत छत्रपती शिवरायांना  वंदन केले. छत्रपती शिवरायांच्या आदर्श विचारांच्या वाटचालीतूनच जीवनाचे कल्याण असल्याची भावना ठिकठिकाणी मनोगत व्यक्त करताना त्यांनी व्यक्त केली.       हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सजावट करण्यात आली होती. या ठिकाणी आयोजित ध्वजारोहण व अभिवादन कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई ब...
इमेज
  बलोपासना करून छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा हीच खरी शिवजयंती  ; दत्ताप्पा ईटके गुरुजी परळी वैजनाथ  बलोपासना करून छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा हीच खरी शिवजयंती असल्याचे  प्रतिपादन हनुमान व्यायाम शाळेचे मुख्य मार्गदर्शक दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनी हनुमान व्यायाम शाळेत आयोजित शिवजयंती कार्यक्रमात केले. छत्रपती शिवाजी महाराजांची 396 वी जयंती श्री हनुमान व्यायाम शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बोलताना हनुमान व्यायाम शाळेचे मुख्य मार्गदर्शक दत्ताप्पा ईटके गुरुजी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कणखर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्यात प्रत्येक जाती धर्माचे मावळे सामील होते. आजचा युवक बलोपासना सोडून भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. मात्र सुदृढ शरीर हीच खरी संपत्ती आहे.  शिवजयंती कार्यक्रमात प्रथम शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन  हनुमान व्यायाम शाळेचे मुख्य मार्गदर्शक दत्ताप्पा ईटके गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हनुमान व्यायाम शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात महाराजांना सलामी दिली.  यावेळी हनुमान व्या...
इमेज
छत्रपती शिवरायांकडे 'चारित्र्य' आणि 'निश्चय' ही प्रभावी शस्त्रे होती : प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे लिंबा येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा गौरव लिंबा (प्रतिनिधी): "शिवजयंती म्हणजे केवळ ढोल-ताशांचा गजर नव्हे, तर महाराजांचे चारित्र्य आणि विचारांचे आपल्या वर्तनात केलेले सिंचन होय. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या शिवरायांकडे 'चारित्र्य' आणि 'निश्चय' ही दोन प्रभावी शस्त्रे होती, तीच शस्त्रे आजच्या तरुणाईने अंगीकारायला हवीत," असे रोखठोक प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते व सिने-नाट्य दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी केले. शिवशंभो मित्र मंडळ, लिंबा तर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात ' छत्रपती शिवराय: आजच्या तरुणाईचा आदर्श' या विषयावर ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.याप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याला सरपंच विष्णू चव्हाण, जि.प. सदस्य मदनराव भोसले, पं.स. सदस्य भगवानराव दुगाने, नारायणराव अरबाड, शिवाजीराव हरकळ, सुभाषराव हरकळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सू...
इमेज
'अंकुर मानवतेचा' बालनाट्यातील बालकलाकारांनी जिंकली प्रेक्षकांची मने छत्रपती संभाजीनगर:प्रतिनिधी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित २२ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत, सुंदरेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (गुंज) संचलित आयुष अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, कुं. पिंपळगाव च्या बालचमूंनी आपल्या दमदार अभिनयाने रंगमंच गाजवला.छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ही स्पर्धा सुरू आहे. लेखक हरिदास घुंगासे यांच्या लेखणीतून उतरलेले हे नाटक मोबाईलच्या आभासी जगात हरवलेली मुले आणि कचरा वेचून जगणाऱ्या अनाथ मुलाची जगण्याची जिद्द यातील संघर्ष प्रभावीपणे मांडते. मानवतेचा खरा अंकुर कसा फुलतो, याचे वास्तववादी दर्शन या नाटकातून घडले. दिग्दर्शक नंदू वाघमारे यांच्या कल्पकतेने विराज दायमा, कार्तिक बहिरे, आयुष घुंगासे, आदिती खडके, ईश्वरी ताठे, दर्शना डोईफोडे आणि तनवी सोळंके या चिमुकल्यांनी एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत प्रेक्षकांना खिळवून ठेवले.  नाटकाच्या यशात तांत्रिक बाजू सांभाळणारे रघुनाथ ताठे, सीमा ताठे तसेच मनीषा घुंगासे, किसन भोईटे, पवन दशरथ, काजल बल्लय्या आण...
इमेज
  जवळा फकीर येथे 28 फेब्रुवारी रोजी दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद  परळी (प्रतिनिधी)  ज्ञानालंकार धम्म संस्कार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जवळा फकीर,ता.धारूर येथे दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक भदन्त पय्यातीस्स महाथेरो यांनी केले आहे.      मृगदायवन महाविहार सारनाथ पार्क जवळा फकीर तालुका धारुर येथे शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता या धम्म परिषदेचे उद्घाटन डॉ.प्रा.खेमधम्मो,मुळावा यांच्या हस्ते होणार आहे.अध्यक्षस्थानी डॉ.भदन्त उपगुप्त महाथेरो,पूर्णा, ध्वजारोहण डॉ.प्रा.भदन्त एम.सत्यपाल महाथेरो छत्रपती संभाजी नगर, प्रमुख अतिथी पु.भदन्त डॉ.इंदवंश महाथेरो,कुशीनगर, उत्तर प्रदेश, भदंत मुदितानंद महाथेरो,परभणी,भदन्त पय्याबोधी थेरो, नांदेड, भदंत पय्यानंद थेरो लातुर यांची उपस्थिती असणार आहे.    याबरोबरच भदन्त धम्मसार थेरो किल्लारी, भदंत सुभूती थेरो नांदेड, भदंत धम्मशील थेरो बीड, भदंत नागसेन बोधी उदगीर,आदी भन्ते व बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोट...
इमेज
शिवरायांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे मावळे होते- रानबा गायकवाड  परळी प्रतिनिधी.           रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात सर्व जाती धर्मांचे मावळे होते ,सैनिक होते असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक भीमयुगकार रानबा गायकवाड यांनी केले. ते परळी तालुक्यातील मौजे इंदपवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवरायांच्या 396 व्या शिवजयंती उत्सवात बोलत होते.       इंदापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. शालुबाई मुंडे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाणे, पत्रकार विकास वाघमारे, माजी सरपंच मोहन मुंडे, ह. भ. प. बापू महाराज तसेच निवृत्त शिक्षक भोसले सर, जे.के चौधरी सर ,सतीश मुंडे, उमेश रोडे, राम मुंडे, सचिन मुंडे, विशाल चाटे, पप्पू रोडे आदी उपस्थित होते.      यावेळी पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी ...
इमेज
कै.सौ.केराबाई अंबादास मुंडे यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम ;विठ्ठल महाराज (उखळीकर), साध्वी सोनालीताई करपे यांचे कीर्तन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....     कै.सौ. केराबाई अंबादास मुंडे यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम शुक्रवार दि. 20/02/ 2026 रोजी आयोजित आला असून यानिमित्त ह भ प  विठ्ठल महाराज (उखळीकर), ह भ प साध्वी सोनालीताई करपे यांचे कीर्तन होणार आहे.      कै.सौ. केराबाई अंबादास मुंडे यांना रविवार, दिनांक 08/02/2026 रोजी रोजी देवाज्ञा  झाली. त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम शुक्रवार दि. 20/02/ 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने हनुमान मंदिर, इंदपवाडी, ता. परळी वै. जि. बीड येथे शनिवार, दि. 21/02/2026 रोजी दुपारी 12 ते 2 वा.ह.भ.प. साध्वी सोनालीताई करपे (चकलवा) यांचे किर्तन होईल. रात्री 8 ते 10 वा.ह.भ.प.विठ्ठल महाराज (उखळीकर) यांचे किर्तन होईल. किर्तनास व भोजनास उपस्थित रहावे असे आवाहन अंबादास नारायण मुंडे, दत्तात्रय अंबादास मुंडे, श्रीधर अंबादास मुंडे यांनी केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परळी वैजनाथ तर्फे मानवंदना

इमेज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त परळी सघोष मानवंदना ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परळी वैजनाथ तर्फे मानवंदना परळी वै - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परळी वैद्यनाथ तर्फे सघोष मानवंदना देण्यात आली. यावेळी या मानवंदनेने उपस्थित शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते. या मानवंदनेसाठी स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले होते यावेळी तालुका संघचालक व तालुका पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर अक्षरशा दणाणून गेला होता. यावेळी स्वयंसेवकांची तसेच शिवभक्तांची लक्षणीय उपस्थिती होती.     काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे तसेच महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंती निमित्त महर्षी वाल्मिकी चौक या ठिकाणी सुद्धा स्वयम् सेवकांकडून सघोष मानवंदना देण्यात आली होती.
इमेज
  ओबीसी परिषदे तर्फे छ.शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा परळी वै., प्रतिनिधी - ओबीसी परिषदे तर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करण्यात आला.  छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून रयतेचे लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हतबल झालेल्या भूमिपुत्रांच्या मनात धैर्य, शौर्य, आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वराज्याची ज्योत पेटवली. आपण महाबलाढ्य शत्रूविरूध्द लढू शकतो. आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तमप्रकारे राज्यकारभार करू शकतो, ही प्रेरणा जनमानसात विशेषतः सर्वसामान्य मावळ्यांच्या मनात कायमची पेरली. त्यांनी अशक्य कार्य शक्य करून दाखविले. शेतकरी, कष्टकरी, महिला, उपेक्षित समाजघटकांना धैर्य आणि स्थैर्य दिले. त्यांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. त्यांनी स्वराज्यातील आणि परराज्यातील स्त्रियांचा आदर केला त्यांना सुरक्षितता दिली. आपल्या धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरांचा अभिमान बाळगला, पण इतरांच्या धार्मिक-सांस्कृतिक परंपराचा अनादर केला नाही. आपल्या वैभवशाली सांस्कृति...

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सकारात्मक

इमेज
परळी वैजनाथ नगर परिषदेतील रिक्त ३२ पदे तातडीने भरण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सकारात्मक परळी वैजनाथ : प्रतिनिधी.....   राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना पंकजाताई मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी व नगरपरिषदेच्या वतीने परळीचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी व बांधकाम सभापती प्रा. पवन मुंडे यांनी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन परळी नगर परिषदेतील वर्ग-३, वर्ग-४ तसेच अनुकंपा तत्वावरील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली. यासंदर्भात जिल्हा निवड समितीमार्फत भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हा विषय प्राधान्याने हाताळून सकारात्मक कार्यवाही करू, असे अभिवचन दिल्याची माहिती धर्माधिकारी यांनी दिली. परळी नगर परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून लिपिक-टंकलेखक, लघुटंकलेखक, उद्यान पर्यवेक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, पंप ऑपरेटर, तारतंत्री ऑपरेटर, वाहन चालक-कम-ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्...
इमेज
समायोजन वेळापत्रकाची  मराठवाडा शिक्षक संघाने केली होळी ! छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : मराठवाडा शिक्षक संघाने शासनाच्या संचमान्यता निकष व समायोजन वेळापत्रकाविरुद्ध आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा मुख्य उद्देश एस एस सी व एच एस सी बोर्ड परीक्षेच्या काळात नियोजित समायोजन प्रक्रिया तारखा बदलण्यात याव्यात आणि १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयातील ९वी व १०वी च्या किमान संख्येच्या अटींमुळे राज्यातील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात फुगलेली आहे, त्यात संशोधन करून सुधारित निकष तयार करण्यात आले पाहिजे हा आहे. तसेच एच एस एस सी बोर्ड परीक्षेत मराठवाड्यातील काही जिल्ह्यात शिक्षकांवर सरसकट गुन्हे दाखल होत आहेत त्याची संपूर्ण चौकशी शिवाय सरसकट गुन्हे दाखल करू नयेत ही बाब अन्यायकारक व कायदेशीर नाही याची दखल घेत निर्दोष शिक्षकांवर होत असलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावे या प्रमुख मागणीसाठी मराठवाडा शिक्षक संघ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी विभागीय उपसंचालक कार्यालय, भडकल गेट, छत्रपती संभाजीनगर येथे हे आंद...
इमेज
शेतकरी विरोधी कृषी कराराची परळीत प्रतिकात्मक होळी परळी /प्रतिनिधीः       अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार कराराबाबत राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याने बीड किसान सभेकडून या कराराची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. परळी तालुक्यातील कावळेवाडी, बोधेगाव या ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येत या कराराचा तीव्र निषेध केला.       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी येथे आयोजित महा एक्स्पो २०२६ पशुप्रदर्शनात भारत-अमेरिका व्यापार कराराचे स्वागत करत अमेरिकेची मोठी बाजारपेठ भारतासाठी खुली झाल्याचे सांगितले होते. या निषेधार्थ किसान सभेच्या आवाहनाला प्रतिसाद देत परळी तालुक्यातील कावळेवाडी, बोधेगाव या ठिकाणी परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी मंगळवार दि 17 रोजी एकत्र येत या कराराची प्रतिकात्मक होळी केली. सोयाबीन, इथेनॉल, जीएम सोयाबीनपासून तयार खाद्यतेल, पशुखाद्य, सुकामेवा, फळे-भाज्या व पोल्ट्री उत्पादनांवरील सवलतीमुळे भारतीय बाजारपेठेवर विपरीत परिणाम होणार असल्याचा दावा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला. सोयाबीनचा हमीभाव ५३३० रुपये असताना शेतकऱ्यांना सुमारे साडेतीन हजार रुपया...
इमेज
फोटोग्राफर क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये छत्रपती संभाजीनगर अजिंक्य  छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या फोटोग्राफर मैत्रीपूर्ण सामन्यातून दहा संघानी सहभाग नोंदवला होता बीड ,लातूर, अहमदपूर ,अंबाजोगाई, छ. संभाजीनगर व पुणे जिल्ह्यातून शिरूर, चाकण- आळंदी व खेड तसेच परळी येथील असोशियनचा संघ याप्रमाणे  दहा संघानी यात सहभागी होऊन या सामन्याचा आनंद घेतला.  या सामन्यासाठी जेष्ठ फोटोग्राफर यशवंत चव्हाण ,हरिप्रसाद मोदाणी ,विठ्ठलराव झिलमेवाड, सुनील फुलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळाडू परिचय व नोणेफेक करून प्रत्येक सामन्याची सुरुवात करून देण्यात आली.बाद पद्धतीने व लकि  ड्रा व्दारे ही स्पर्धा घेण्यात आली.यात विजेते ठरले ते छ.संभाजीनगर,उपविजेते परळी फोटोग्राफर असो .क्रिकेट टिम ,तृतीय क्रमांक चाकण -आळंदी तर चतुर्थ स्थान शिरूरला मिळाले.उत्कृष्ट फलंदाज कुणाल जोशी, उत्कृष्ट गोलंदाजी राम, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण  तुषार पोतले यांना देण्यात आले.परळीतील आकाश गित्ते यांनी अर्धशतक व गोलंदाजी साठी त्यांना मिळालेले  उत्कृष्ठ फलंदाज इतरांना देऊ केले.या साठी त्याचे खेळाडूवृत्ती ...
इमेज
  परळीत लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू  ; २३ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंदचा इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-        जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना परळी वैजनाथ यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसापासून काळ्या फिती लावून आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केले आहे. २३ फेब्रुवारी पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी यांनी दिला आहे. तालुक्यातील विविध कार्यालयातील एकूण ३० लिपिक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.            महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील लिपिक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून निषेध आंदोलनास सुरुवात केली आहे. लिपिक संवर्ग हा प्रशासनाचा कणा मानला जातो. चौथ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करून सुधारीत वेतनश्रेणी लागू करावी, पदोन्नती स्तर कमी करून पदनामात बदल करावा, जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी, तसेच १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा नियुक्ती...
इमेज
राज्य बालनाट्य स्पर्धेत बेला नाटकाला द्वितीय पारितोषिक  सहा वैयक्तीक बक्षीसे, उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून शेख आसीफ यांचा सन्मान  परळीच्या भेल सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग  परळी (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या २२ व्या राज्य बालनाटय स्पर्धेत  बेला  नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळाले असून या  नाटकाने  अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. या सह बेला नाटकातील कलावंतांना  सहा वैयक्तीक  बक्षीसे मिळाली आहे. पहिल्यांदाच परळी येथील नाटकाला सात बक्षीस मिळाले आहे.छत्रपती सेवाभावी संस्थेच्या वतीने बेला नाटकाने संभाजीनगर विभागांतर्गत हे यश मिळविले आहे. या नाटकाचे उत्कृष्ट दिग्दर्शन आसीफ शेख यानी केले असुन बाल कलाकारांनी जबरदस्त मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवून दिले आहे. या नाटकाच्या दिग्दर्शनासाठी आसीफ शेख यांना द्वितीय बक्षीस मिळाले तर संगीतसाठी अतुल साळवे यांना द्वितीय बक्षीस, वेशभूषेसाठी अनिल गोटमोकले यांना द्वितीय बक्षीस, प्रकाश योजनेसाठी  मानिकचंद थोरात यांनातृतीय बक्षीस, रंगभूषासाठी विश्रांत लशकारे यांना तृतीय बक्षीस मिळाले आहे. सारा गित्ते यांना अ...
इमेज
कृषी प्रदर्शन व पशुसंवर्धन मेळावे घेऊन शेतकऱ्याचे भले होणार नाही नुकसान भरपाई संदर्भात तात्काळ नवीन कायदा करून अंमलबजावणी करा ?– वसंत मुंडे  परळी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील त्रिमूर्ती सरकारने शेतकऱ्यासाठी  शेतीमाला संदर्भात किमान आधारभूत किंमत, पिक विमा व बोगस खते बी बियाणे कीटकनाशके औषधे संदर्भात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची कायद्यात तरतूद करून तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली आहे.         शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना असल्या तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारे लोकप्रतिनिधी संबंधित खात्याचे कर्मचारी व अधिकारी, मंत्री कार्यालयात टक्केवारी घेतल्या शिवाय कामांना मंजुरी मिळत नाही  असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे नी केला . पशुसंवर्धन व कृषी प्रदर्शन मेळावे राज्यात विविध ठिकाणी चालू आहेत परंतु जनतेच्या टॅक्स मधून जो पैसा शासनाला मिळतो त्याचा दुरुपयोग प्रदर्शने, मेळावे व बोगस योजना दाखवून संबंधित प्रशासकीय अधिकारी ...

सेवानिवृत्तीनंतरही कार्यतत्परता.....

इमेज
  डॉ. हरिभाऊ बंडेराव पांडे यांचा सेवाभावी प्रवास; ‘महापशुधन एक्सपो 2026’मध्ये मोलाच्या योगदानाबद्दल गौरव परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील सहायक आयुक्त पशुसंवर्धन पदावर कार्यरत असलेले डॉ. हरिभाऊ बंडेराव पांडे यांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी आपला प्रदीर्घ सेवाकाल विनाडाग पूर्ण करत सेवानिवृत्ती स्वीकारली. जवळपास तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी पशुसंवर्धन विभागात विविध जिल्ह्यांमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने सेवा बजावली. डॉ. पांडे यांनी जालना, कोल्हापूर, परभणी तसेच बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी पशुवैद्यकीय सेवा दिली. ग्रामीण भागातील शेतकरी, पशुपालक आणि दुर्गम क्षेत्रातील जनतेपर्यंत आधुनिक पशुवैद्यकीय सुविधा पोहोचविण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले. लसीकरण मोहिमा, पशुरोग प्रतिबंधक शिबिरे, जनजागृती उपक्रम आणि पशुधन विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी आपली कार्यतत्परता कायम ठेवत महापशुधन एक्सपो 2026 या अखिल भारतीय पशुप्रदर्शनाच्या आयोजनात सुरुवातीपासून सक्रिय सहभाग नोंदविला. मा. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य ...

ग्रामीण भागातील तरुणांमध्ये वाढत चाललेल्या समाज माध्यमांचे हिंसक व्यसन व आक्रमकतेबाबत चिंता ....

इमेज
समाज माध्यमातील 'स्टेटस्' आणि ‘स्टोरी’वरून वाद: तरुणाचा खून, दोघे गंभीर बीड, प्रतिनिधी  : समाज माध्यमांवर एकमेकांविरोधात टाकलेल्या ‘स्टोरी’च्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद सोमवारी रात्री भीषण हाणामारीत परिवर्तित झाला. कड्याजवळील  रुईनालकोल (ता. आष्टी) येथे झालेल्या या घटनेत २० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.        पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  रुईनालकोल (ता. आष्टी)  गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर सोमवारी रात्री दोन गट आमनेसामने आले. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर एकमेकांविरोधात टाकलेल्या ‘स्टेटस’ आणि ‘स्टोरी’वरून गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांत वाद सुरू होता. हा वाद प्रत्यक्षात भिडल्याने परिस्थिती चिघळली.वाद वाढताच एका गटातील तरुणांनी धारदार शस्त्राने दुसऱ्या गटातील तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात दीपक शिवाजी नालकोल (वय २०) हा गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.याच हल्ल्यातील अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अह...

भक्ती गीत कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आवाहन

इमेज
  महाशिवरात्री महोत्सव: आज प्रभु वैद्यनाथाचा पालखी सोहळा;सुप्रसिद्ध गायिका विदुषी मंजुषा पाटील (पुणे) यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या महाशिवरात्री महापर्वा निमित्त देवल कमिटीच्या वतीने तीन दिवस महोत्सव साजरा केला जातो. या तीन दिवशीय महोत्सवाची सांगता आज दिनांक प्रभु वैद्यनाथाच्या पालखी सोहळ्याने होणार आहे. या निमित्ताने सुप्रसिद्ध गायिका विदुषी मंजुषा पाटील पुणे यांचा भक्ती गीताचा कार्यक्रम पालखी समोर सादर होणार आहे. श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट, परळी वैजनाथ महाशिवरात्री यात्रा महोत्सव निमित्त सुप्रसिद्ध गायिका विदुषी मंजुषा पाटील (पुणे) यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम मंगळवार, दि.१७ फेब्रुवारी २०२६ वेळ :सायं. ६:०० वाजता परळी वैजनाथ देशमुखपार समोर, होणार आहे. भाविक भक्तांनी, रसिकांनी या गीत गायन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यंकटेश मुंडे(अध्यक्ष तथा तहसिलदार, परळी वैजनाथ),बाबासाहेब देशमुख (सेक्रेटरी) व सर्व विश्वस्त श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट परळी वैजनाथ. यांनी केल...

पर्यावरण संवर्धन ही मिशन मोडमधील कृती व्हावी

इमेज
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजा मुंडे यांची भेट पर्यावरण संवर्धन ही मिशन मोडमधील कृती व्हावी Environment : मुंबई, दि. १६ : राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांची आज संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रमाच्या वातावरणीय बदल विभागाचे संचालक तथा जागतिक प्रमुख मार्टिन क्रुसे यांनी भेट घेऊन विविध विषयांवर व धोरणात्मक बाबींवर चर्चा केली. राज्यातील वाढते शहरीकरण आणि बदलत्या हवामानाचा विचार करता, पर्यावरण संवर्धन ही आता केवळ चर्चा न राहता ती एक 'मिशन मोड' मधील कृती असायला हवी असे श्रीमती मुंडे यांनी यावेळी बोलतांना नमूद केले.  मुंबईतील शासकीय निवासस्थान रामटेक येथे संचालक मार्टिन क्रुसे यांच्यासोबत 'बीट द हिट' मोहिमेच्या तांत्रिक आणि धोरणात्मक अंमलबजावणीवर श्रीमती मुंडे यांनी सखोल चर्चा केली.  यावेळी संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रमाच्या कार्यक्रम व्यवस्थापन अधिकारी बेंजामिन हिकमन, कार्यक्रम व्यवस्थापन अधिकारी मनोजकुमार एम, राज्य वातावरणीय बदल कृती कक्षाचे संचालक अभिजीत घोरपडे,  वरिष्ठ सल्लागार प्राची मर्...
इमेज
दारू आणि ‘कला केंद्रा’च्या नादात औषध विक्रेत्याचा मृत्यू; पाच मित्रांविरुद्ध गुन्हा बीड, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील ३७ वर्षीय औषध विक्रेता सतीश भागवतराव मुंडे यांचा मित्रांकडून झालेल्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          मिळालेल्या माहितीनुसार, सतीश मुंडे हे १२ फेब्रुवारी रोजी मित्रांसोबत धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील ‘महाकाली कला केंद्रा’त कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. ते शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी यांच्या स्विफ्ट डिझायर कारमधून रवाना झाले. प्रवासादरम्यान साळेगाव येथील बार तसेच कळंब व येरमाळा परिसरातील धाब्यावर दारूचे सेवन करण्यात आल्याचे समोर आले आहे.रात्री सुमारे १२.१५ वाजेपर्यंत ते कला केंद्रात होते. त्यानंतर १३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री गावाकडे परतत असताना दुसऱ्या वाहनातील ओळखीच्या तरुणांनी गाडी अडवून जुन्या वादातून सतीश मुंडे यांना छाती व पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केल...

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन......

इमेज
आष्टीत डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे १९ फेब्रुवारीला उद्घाटन बीड :  प्रतिनिधी..        ‘डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन’ (वर्ष – ३ रे) चे  उद्घाटन १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आष्टी येथे होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.         माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून आयोजित हे प्रदर्शन मराठवाड्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून ओळखले जाते. शेतकरी, कृषी तज्ज्ञ, विद्यार्थी आणि नागरिकांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष प्रात्यक्षिके यावेळी उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून  कृषी मंत्री  दत्तात्रय भरणे ,  पशुसंवर्धन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री  पंकजाताई मुंडे, आ.धनंजय  मुंडे, आ. प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, बाळासाहेब आजबे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच कृषी क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, स...

17 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात कराराची ठिकठिकाणी होळी करणार!

इमेज
मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसह जनतेची परत दिशाभूल: कथनीवर भर आणि करणी शून्य- किसान सभा परळी / प्रतिनिधी       अमेरिकेसोबत झालेल्या करारांतर्गत भारतीय कृषी बाजारपेठ ही अमेरिकेकरिता खुली करण्यात आलेली नसल्याचे सांगत शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्याचे प्रमुख पालकत्व असलेले मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी करत पुढचं पाठ आणि मागचं सपाट या पद्धतीने मागच्या केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणी बद्दल काहीही ठोस कृती नसताना जेव्हा येईल तेव्हा मराठवाड्याच्या विकासाबद्दल घोषणा करून जायचं असा घणाघात किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ.ऑड.अजय बुरांडे यांनी केला.      परळी येथे सोमवार दि 16 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत कॉ.ऑड.अजय बुरांडे यांनी सांगितले की, परळी वैजनाथ येथे आयोजित महा एक्सपो 2026 पशुप्रदर्शनात मा मुख्यमंत्री यांनी भारत अमेरिका या मध्ये नव्याने झालेला व्यापार करार याचे स्वागत करत मुख्यमंत्र्यांनी देशाचे प्रधानमंत्री यांचे आभार मानले आणि भारतासाठी अमेरिकेची मोठी बाजारपेठ खुली झाल्याचे सांगितले. तसेच कृषी क्षेत्रात कोणत्याही अमेरिकन मालाला भारत...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!