अप्रमानीत माहिती प्रसारित करणारांवर होणार....
महादेव मुंडे खून प्रकरण : अफवांवर विश्वास ठेवू नका; पोलिसांचे नागरिकांना आवाहन बीड : प्रतिनिधी.... परळी शहरातील बँक कॉलनी परिसरातील रहिवासी महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) सध्या सुरू असून तपासाची प्रक्रिया अत्यंत गोपनीय व पारदर्शक पद्धतीने केली जात आहे. या प्रकरणातील विविध तांत्रिक चाचण्यांचे अहवाल गोपनीय ठेवण्यात आले असून नागरिकांनी सोशल मीडियावरील किंवा इतर माध्यमांमधील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपळा (ता. परळी) येथील रहिवासी महादेव दत्तात्रय मुंडे (वय ३८) यांचा २१ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री वनविभाग कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने गळा चिरून खून केला होता. या घटनेनंतर मयताचे बंधू अशोक दत्तात्रय मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९१/२०२३, भारतीय दंड विधान कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सध्या बीड येथील विशेष तपास पथकाकडून सखोल पद्धतीने केला जात आहे. तपास...