खिलाडी स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित स्वरक्षा संकल्प शिबीराचा समारोप उत्साहात परळी वैजनाथ दि.०१ (प्रतिनिधी) खिलाडी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वरक्षा संकल्प शिबीराचा गुरुवार दि. ३० एप्रिल रोजी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. १९ ते ३० एप्रिल दरम्यान या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे तसेच स्वरक्षणाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तायक्वांदो, कुंफू, कराटे, लाठीकाठी, तलवार यांसारख्या क्रीडा प्रकारांतील कौशल्यपूर्ण सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वैजनाथ ईटके यांनी सांगितले की “आजच्या आधुनिक युगात मोबाईल आणि तंत्रज्ञानामुळे मैदानावरील खेळ कमी होत चालले आहेत. अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आत्मसंरक्षणाची जाणीव निर्माण होते,” तर डॉ शिका जैन यांनी सांगितले की “स्वरक्षणाचे प्रशिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि...