पोस्ट्स

मार्च २९, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली

इमेज
तीर्थक्षेत्र माहूरगडावरच्या दत्त शिखरचे ३० वे महंत मधुसूदन भारती महाराज यांचे देहावसान नांदेड :  तीर्थक्षेत्र माहूरगडावरच्या दत्त मंदिराचे महंत मधुसूदन भारती महाराज यांचे आज निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांचे वय 95 वर्षे असल्याचे सांगण्यात आले. उद्या रविवारी दुपारी तीन वाजता माहूर गडावरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत. महाराजांच्या निधनामुळे माहूर गडावर शोककळा पसरली असून भक्तांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सन 1978 पासून ते आजतागायत देवस्थानचे महंत म्हणून गादीवर विराजमान होते. तब्बल 4 तप (48 वर्षे) त्यांनी या गादीवर राहून तप:साधनेत व्यतित केले. ते वैकुंठवासी झाल्याने असंख्य भक्तगण शोकसागरात बुडाले आहेत. दिवंगत महंत अच्युत भारती महाराज यांच्यानंतर १९७८ मध्ये विधिवत प्रक्रियेनुसार महंत मधुसूदनजी भारती महाराज हे श्री दत्तशिखर संस्थानच्या गादीवर विराजमान झाले होते. तब्बल ४ तप म्हणजे ४८वर्षे त्यांनी गादीवर राहून तप:साधनेत जीवन व्यतीत केले.महंतजींच्या जीवनशैलीत साधेपणा व परंपरेचे काटेकोर पालन दिसून येत असे. त्यांनी कधीही वाहनाचा वापर केला नाही. मेणा सव...

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन....

इमेज
परळीत सोमवारी 'सद्भावना ईद मिलन संमेलन'चे आयोजन; राष्ट्रीय एकात्मतेचा जागर होणार परळी वैजनाथ (प्रतिनिधी):          जातीय सलोखा, प्रेम बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, परळी येथे 'सद्भावना ईद मिलन संमेलनाचे' आयोजन करण्यात आले आहे. 'जमाअत ए इस्लामी हिंद'च्या वतीने रमजान ईदच्या निमित्ताने आयोजित हा सोहळा येत्या सोमवारी, ६ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार आहे.          हे संमेलन छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील 'विशेष अतिथी शासकीय विश्रामगृह' येथे संध्याकाळी ६:३० वाजता पार पडेल. नैतिकतेच्या आधारावर सर्व धर्मीय बांधवांना एकत्र आणून सामाजिक सलोखा वाढवणे हा या मागचा मुख्य हेतू आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वारकरी विचार मंच (महाराष्ट्र) चे संस्थापक अध्यक्ष शामसुंदर सोन्नर महाराज उपस्थित राहणार आहेत. तसेच, सद्भावना मंच महाराष्ट्राचे सचिव डॉ. रफिक पारनेरकर  हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.या स्नेहसंमेलनास शहरातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या मित्रपरिवारासह मोठ्या संख्...

अभिष्टचिंतन लेख>>>>>

इमेज
  सोमेश्वर साथीतुन जनतेसी नाती जोडणारे : संपादक बालासाहेब फड       आज आपली घरं मुकी व्हायला लागली आहेत.घरात पूर्वीसारखा संवाद उरलेला नाही.बाप एका दरवाजावाटे घरात आला तर मुलगा दुसऱ्या दरवाजावाटे बाहेर जातो.घराची धर्मशाळा झाली आहे,घराचे रेस्ट हाऊस झाले आहे,घराची वेटींग रूम झाली आहे.माणसांचे नाते आता फेसबुक व व्हाट्सअप वरूनच जोपासल्या जात आहेत म्हणून एक कवी असे म्हणतो की   विज्ञानाच्या यूगात  केवढी मोठी चूक l   आता रक्तांच्या ही नात्यांना लागते फेसबुक ll   नात्यात कृत्रिमता वाढत चालली असून अशा काळात नाते संबंध सांभाळने,जोपासने हे मोठे जिकीरीचे काम बनले आहे.अस्या ही काळात आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून जनतेसी नाते जोडता येऊ शकते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सोमेश्वर साथी  हे वृतपत्राचे संपादक बालासाहेब फड होत.जे या वृत्तपत्राच्या माध्यमातून नाती जोडण्याचे व जपण्याचे प्रामाणिक काम करत आहेत.अस्या या नात्यांनी श्रीमंत असलेल्या संपादक बालासाहेब फड यांचा  आज 04 एप्रिल हा जन्मदिवस.त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनचरित्राचा घेतलेला हा संक्षिप्त आढ...

५ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात

इमेज
१ लाख ५९ रु. च्या देशी विदेशी दारु आणि कारसह एकजण ताब्यात केज:- केज- कळंब रोडवर माळेगांव येथील चौकात पोलिसांनी अवैध्य चोरट्या दारू वाहतुकी विरुद्ध कारवाई करून अवैध्य चोरटी दारु वाहतूक करणाऱ्या इसमाला त्याच्या ताब्यातील कारसह ताब्यात घेत, ५ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दि. ३ एप्रिल रोजी केज उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकट राम यांना एका गुप्त बातमीदार कडून केज ते कळंब रॉडने एक लाल रंगाची स्विफ्ट डिझायर गाडीतून देशी व विदेशी दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच व्यंकटराम यांनी ही माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस चेतना तिडके यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली चोरटी दारू वाहतूक करीत असलेली कार ताब्यात घेवून कारवाई करण्यासाठी सापळा रचला. ३ एप्रिल रोजी रात्री ७:०० वा. च्या सुमारास पोलिस हेडकॉन्स्टेबल विकास चोपणे, पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी कागदे, पोलिस कॉन्स्टेबल अशपाक इनामदार, पोलिस कॉन्स्टेबल सिद्दिक शहा यांच्या पथकाने कळंब कडून येत असलेली लाल रंगाची स्विफ्ट डिझायर व्हिडीआय (एम एच-१२/ई एक्स-३...

नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

इमेज
  नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम : अंबेवेस येथे नव्या पुलाच्या बांधकामास ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते प्रारंभ परळी वैजनाथ (प्रतिनिधी):        जुन्या गावभातील महत्त्वाचा वाहतूक दुवा असलेला पुल आता पुनर्निर्माण होणार आहे. अंबेवेस परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून, नव्या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ आज या भागातील जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आला. जनतेचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ नेते नारायणदेव गोपनपाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ झाला.जुन्या व अरुंद नळकांडी पुलामुळे नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.          नवीन, प्रशस्त व सुरक्षित पुलासाठी  नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. या मागणीची दखल घेत राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे तसेच राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या...
इमेज
  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईचे नवीन इमारतीत स्थलांतर अंबाजोगाई : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई हे कार्यालय आता स्वतःच्या मालकीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित होत आहे.  लातूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत, स्व. विमलताई मुंदडा आरोग्य संकुल, सेंजारी, मौजे लोखंडी सावरगाव येथे बांधण्यात आलेल्या नवीन कार्यालयीन इमारतीमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईचे सर्व कामकाज दि. 06 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे वाहन नोंदणी, वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), परवाने, कर भरणा तसेच इतर सर्व परिवहन कार्यालयाशी संबंधित कामकाजासाठी नागरिकांनी यापुढे लोखंडी सावरगाव येथील नवीन कार्यालयात उपस्थित राहून आपली कामे करून घ्यावीत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अंबाजोगाई यांनी केले आहे. नवीन कार्यालयीन इमारतीमुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून कामकाज अधिक सुलभ व जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन पुढील सर्व कामकाजासाठी लोखंडी सावरगाव येथील नवीन कार्यालयाचा उपयोग करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली....

इमेज
  दोन कलेक्टर घडविणारी शेतकरी माता कपाळावर ठसठशीत कुंकु, अंगावर ग्रामीण वेशभूषेतलं लुगडं, कष्टाने रापलेलं शरीर अशी तिची वेशभूषा. तिच्याकडे पाहिल्यानंतर ती गावातली साधी बाई वाटते पण ती कोणी साधीसुधी बाई नव्हती तर . आपल्या तिन्ही मुलांपैकी दोन मुलांना शिकून कलेक्टर आयुक्त वगैरे वगैरे प्रशासनातील सर्वोच्च पदावर बसवणारी पावरफुल माता होती.  एका ऊसतोड कामगाराच्या घरात जन्म झालेल्या आणि तशीच पार्श्वभूमी असलेल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोना (ताडसोनना) या छोट्याशा गावातून एक अशी प्रेरणादायी कहाणी आहे, जी प्रत्येक आईच्या सामर्थ्याची जाणीव करून देते. ही कहाणी आहे आसराबाई मुंढे या साध्या शेतकरी मातेची होती. नुकतच त्यांचं वृद्धापकाळाने निधन झाले.  आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे tukaram mundhe आणि अशोक मुंढे ashok mundhe यांच्या त्या मातोश्री होत्या आसराबाई मुंढे यांनी अत्यंत साध्या परिस्थितीत, शेती करत आणि अनेक अडचणींना सामोरे जात आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व शिकवले. घरची परिस्थिती मर्यादित असली तरी त्यांनी कधीही आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत तडजोड केली नाही. त्यांचा एकच व...

मोठी कारवाई.....

इमेज
  अंबाजोगाई शहरालगतच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत सहा जुगाऱ्यांसह ४.७३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत अंबाजोगाई :- शहराच्या लगत असलेल्या अंबा सहकारी साखर कारखाना रोडवर  जान्हवी हॉटेल येथे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंबाजोगाई शहर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत जुगार खेळत असलेले सहा जुगारी व रोख रक्कम व  त्यांच्याकडील ४,७३,६७०/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या टीमने हस्तगत केला आहे.         याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवार दि ०२ रोजी  जान्हवी हॉटेल कारखाना रोड अंबाजेगाई परिसरात काही ईसम हे पत्यावर पैसे लावुन तिर्रट नावाचा जुगार खेळ खेळत आहेत व खेळवित आहेत या गोपनिय अशा माहीतीच्या आधारे सदर ठिकाणी पोलीस निरिक्षक शरद जोगदंड  यांच्या आदेशान्वये  त्या ठिकाणी जावुन छापा मारला असता त्या ठिकाणी गोलाकार पध्दतीमध्ये ०६ ईसम नामे मोहम्मद खतीब वय ५० वर्षे, रा. खतिब गल्ली अंबाजोगाई , सद्दाम बागवान वय ३० वर्षे रा. बागवान गल्ली अंबाजेगाई, शेख अजहर जिलानी वय ४८ वर्षे रा. खतिबगल्ली अंबाजोगाई, श्रीराम बारगजे वय ३९ वर्...

चोरीला गेलेले मिनी गंठण पोलिसांनी केले जप्त

इमेज
  बस स्टँडवरून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण चोराणारी महिला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात केज :- मुलीला भेटायला लातूरला जात असलेल्या एका महिलेचा गळ्यातील मिनी गंठण केज येथील बस स्टँडवरून चोरीला गेले होते. त्यातील संशयित महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. दि. १९ मार्च रोजी दुपारी केज शहरातील मंजुश्री जगदाळे या लातूर येथील शिक्षण घेत असलेल्या मुलीला भेटायला जाण्यासाठी केज येथील बस स्टँडवर थांबलेल्या असताना अज्ञात महिला चोरट्यांनी गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मिनी गंठण तोडून घेऊन फरार झाली होती.  या प्रकरणी मंजुश्री जगदाळे यांनी केज पोलिस ठाण्यात तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं . १६९/२०२६ भा. न्या. सं. ३०३(२) नुसार दाखल झालेला आहे.  या प्रकरणी पोलिस या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेजेस तपासून त्या गंठण चोराचा तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक अनोळखी महिला मंजुश्री जगदाळे यांच्या माठीमागे उभी असल्याचे दिसत होती. तसेच ती बसमध्ये न चढता नंतर तेथून निघून घेतल्याचे आढळू...

परळीतील सेवानिवृत्त बॅंक अधिकाऱ्याची झाली होती फसवणूक..

इमेज
  बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई; “डिजिटल अरेस्ट” फसवणूक प्रकरणातील तीन आरोपी अटकेत परळी वैजनाथ,वृत्तसेवा:          सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी बीड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात तब्बल 23 लाख 42 हजार 888 रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले आहे.     सायबर पोलीस ठाणे, बीड येथे दाखल गुन्ह्यानुसार परळी वैजनाथ येथील तक्रारदार सूर्यकांत निवृत्ती मुंडे यांना “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवून ऑनलाइन माध्यमातून मोठी रक्कम उकळण्यात आली होती. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासा दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 3 लाख रुपये रोख जप्त केले असून, आणखी 3.20 लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये गोठवले आहेत. आरोपी फसवणुकीतून मिळालेली रक्कम ऑनलाइन ट्रेडिंगच्या माध्यमातून स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.        सायबर पोल...

प्रासंगिक लेख: डॉ.सिद्धार्थ तायडे

इमेज
 ' बहिष्कृत भारत' – समतेच्या क्रांतीचा बुलंद आवाज २ एप्रिल १९२७ हा दिवस भारताच्या पत्रकारितेच्या आणि सामाजिक चळवळीच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे. याच दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'बहिष्कृत भारत' या पाक्षिकाचे पहिले पाऊल टाकले. 'मूकनायक' नंतर सुरू झालेले हे वृत्तपत्र केवळ कागदाचा तुकडा नव्हते, तर ते शोषितांच्या संघर्षाचे अस्त्र आणि अन्यायाविरुद्ध पेटलेली मशाल होती. 'बहिष्कृत भारत'ची निर्मिती एका विशिष्ट ऐतिहासिक कालखंडात झाली. जेव्हा अस्पृश्य समाजावर अमानवीय बंधने होती आणि मुख्य प्रवाहातील माध्यमे या वर्गाच्या प्रश्नांवर मौन बाळगून होती, तेव्हा बाबासाहेबांनी या 'मूक' समाजाला बोलके करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी हे विचारपीठ निर्माण केले. या वृत्तपत्राच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सनातनी विचारसरणीवर कठोर प्रहार केले. त्यांचे अग्रलेख हे केवळ वैचारिक नव्हते, तर ते पुराव्यांसह केलेले तार्किक विश्लेषण असे. 'बहिष्कृत भारत'च्या शीर्षकाखाली त्यांनी संत ज्ञानेश्वरांचा एक अभंग छापला होता: "आता तरी पुढे हा...
इमेज
कौडगाव साबळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता; वेदमूर्ती श्री व सौ.समाधान कुलकर्णी यांच्या हस्ते झाली आरती परळी वैजनाथ ,प्रतिनिधी.....       कौडगाव साबळा तालुका परळी वैजनाथ येथे गेल्या 26 मार्च पासून सुरू झालेल्या श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवारी सांगता झाली. या निमित्ताने कौडगाव साबळा येथील रहिवासी व पुणे येथील वेदमूर्ती समाधान कुलकर्णी यांनी सपत्नीक ग्रंथ पूजन व आरती केली.       कौडगाव साबळा येथे ह. भ. प. प्रशांत महाराज डोंगरे यांची सुमधुर श्रीमद् भागवत कथा झाली. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा या सप्ताहात झाली. परंपरेनुसार कौडगाव साबळा येथील या वार्षिक सप्ताहात अंकित रामराव कुलकर्णी व समाधान लक्ष्मण कुलकर्णी यांची बुधवारी महापंगत झाली.  त्याचप्रमाणे सौ. समृद्धी समाधान कुलकर्णी व समाधान कुलकर्णी यांच्या शुभहस्ते श्रीमद् भागवत ग्रंथ पूजन व आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त,गावकरी उपस्थित होते

मोबाईल तसेच सोशल मिडियाच्या दुष्परिणामामुळे मुलांमध्ये विकृती वाढत असल्याचे चित्र

इमेज
आठ दिवसात अंबाजोगाई परिसरातील दुसरी घटना: पुन्हा १३ वर्षीय मुलाकडून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार अंबाजोगाई (प्रतिनिधी):- मराठवाड्याचे पुणे म्हणून नावाजलेले अंबाजोगाई शहर आज किशोरवयीन मुलांच्या मोबाईल तथा सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे काहीसे शहराला गालबोट लागत असल्याचे दिसून येऊ पहात आहे. एकाच आठवड्यात अंबाजोगाई तालुक्यातील दोन गावात अडीच तीन वर्षांच्या चिमुकल्या जीवांवर तेरा चौदा वर्षाच्या मुलांकडून अत्याचार घडल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. तालुक्यातील जवळगाव येथे एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मंगळवार, ३१ मार्च रोजी सायंकाळी ही घटना घडली असून, याप्रकरणी बर्दापूर पोलिसांनी एका १३ वर्षीय शाळकरी मुलावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, अवघ्या आठवड्याभरापूर्वीच डोंगर पिंपळा येथे एका १५ वर्षीय मुलाने आपल्याच नात्यातील चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच, ही दुसरी घटना घडल्याने अंबाजोगाई तालुक्यासह संपूर्ण जिल्हा पिळवटून निघाला आहे.             मंगळवार ३१ मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या ...

नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा होणार सत्कार, पुढील आंदोलनाची दिशाही ठरणार

इमेज
  मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीच्या सर्व संघटनांची शुक्रवारी परळीत व्यापक बैठक नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा होणार सत्कार, पुढील आंदोलनाची दिशाही ठरणार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीच्या सर्व संघटनांची शुक्रवारी (दि. 3 एप्रिल) रोजी परळीत व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत दोन्ही जमातीतील ज्येष्ठ पदाधिकारी, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा सत्कार होणार आहे. यावेळी समाजाच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून त्या मार्गी लावण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. बैठकीला समाजबांधवांनी. ओठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.     विभागातील महादेव कोळी, मल्हार जमातीच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी (जात वैधता प्रमाणपत्रे समितीमार्फत  पूर्वीप्रमाणे कोळी नोंदी वरून विना अट देण्यासाठी) विचारविनिमय व  सर्वानुमते चर्चेअंती मराठवाडा स्तरावर आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी परळी वैजनाथ येथे दिनांक 3 एप्रिल 2026 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाज...

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना

इमेज
  प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना –  युवकांसाठी सुवर्णसंधी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा – प्रशासनाचे आवाहन छत्रपती संभाजीनगर, दि. 02 (विमाका) :- केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) ही देशातील युवकांसाठी करिअर घडविण्याची एक महत्त्वपूर्ण संधी ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होत आहे.        या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप दिली जाते. इंटर्नशिप दरम्यान दरमहा रु. ९,००० आर्थिक सहाय्य तसेच सुरुवातीला रु. ६,००० एकरकमी अनुदान दिले जाते. या योजनेमुळे युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, नवीन कौशल्ये विकसित करण्याची संधी, व्यावसायिक नेटवर्क तयार करण्याची संधी तसेच आत्मविश्वास व व्यक्तिमत्व विकास साधण्यास मोठी मदत होणार आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक असून उमेदवार पूर्णवेळ नोकरीत नसणे आवश्यक आहे.सध्या या योजनेचा तिसरा टप्पा (Round 3) सुरू असून इच्...
इमेज
  हनुमान व्यायाम शाळेत हनुमान जन्मोत्सव साजरा परळी वैजनाथ,प्रतिनिधी. आज देशभर हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जात असतानाच, शहरातील नामांकित हनुमान व्यायाम शाळेत हा उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात संपन्न झाला. व्यायामाची आणि शक्तीची देवता मानल्या जाणाऱ्या बजरंगबलीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच व्यायाम शाळेत भाविक आणि व्यायाम शाळेत येणाऱ्या युवकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे मारुतीच्या मूर्तीला हनुमान व्यायाम शाळेचे विश्वस्त नरसिंग देशमुख यांच्या हस्ते अभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली. प्रास्ताविक वैजनाथ ईटके यांनी केले तर रंगनाथ खके गुरुजी व सुभाष नानेकर सर यांनी व्यायामाचे महत्व  यावेळी सांगितले. यावेळी हनुमान व्यायाम शाळेचे जेष्ठ संचालक दत्ताप्पा ईटके गुरुजी, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, त्रिम्बकअप्पा काटकर, चंद्रकांतअप्पा समशेट्टे, महादेवअप्पा फडकरी, ओबीसी परिषदेचे तालुका अध्यक्ष विलास ताटे, अमर देशमुख सर, जेष्ठ पत्रकार अनंत भातांगळे, प्रभुअप्पा साखरे, महात्मा हत्ते गुरुजी, माजी नगरसेवक महादेव ईटके, भाजयुमो शहराध्यक्ष सुशील हरंगुळे, माजी मुख्याध्यापक...

मार्च 2026 अखेर जिल्ह्यात 5845 ऊसतोड कामगारांची नोंदणी पूर्ण

इमेज
  जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते ऊसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण मार्च 2026 अखेर जिल्ह्यात 5845 ऊसतोड कामगारांची नोंदणी पूर्ण बीड, दि,02, (जिमाका):- ऊसतोड कामगारांच्या समस्यांबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश राज्य शासनास दिले. त्या अनुषंगाने राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित केली आहे.              सदर समितीची बैठक दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये किमान 3 वर्षापासुन ऊसतोड कामगार म्हणून काम करीत असलेल्या ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून नोंदणी करणे व त्यांना ओळखपत्र देणे या विषयावर सविस्तर चर्चा झाली. ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी करणे व त्यांना ओळखपत्र देण्यासाठी शासनाने स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या संस्थेची नियुक्ती केली आहे. बीड जिल्ह्यात ऊसतोडणी कामगाराच...

परिसरातील गावात होणाऱ्या विजेच्या तुटवड्यावर होणार मात

इमेज
परळी तालुक्यातील मोहा गावात धनंजय मुंडेंच्या निर्देशानुसार बसवला १० एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर परिसरातील गावात होणाऱ्या विजेच्या तुटवड्यावर होणार मात परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून महावितरण मार्फत परळी वैद्यनाथ तालुक्यातील मोहा येथे १० एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. परिसरातील विजेच्या तुटवड्यावर यामुळे मात होणार आहे.  धनंजय मुंडे यांना जनता संवाद उपक्रमांतर्गत मोहा सह परिसरातील गावातील पदाधिकारी व नागरिकांनी याबाबत विनंती केली होती. त्यानुसार महावितरणच्या शाखा अभियंता व कार्यकारी अभियंता यांना सूचना देत धनंजय मुंडे यांनी हा ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला आहे.  यामुळे मोहा सह परिसरातील कान्नापूर, मुंगी, देवठाणा, जैतापूर, त्याचबरोबर बोधेगाव, म्हातारगाव, कावळ्याची वाडी, इत्यादी गावांना लाभ होणार असून, कान्नापूर व बोधेगाव येथील ११ केव्ही वरील अतिरिक्त भार कमी होण्यास मदत मिळून अधिकचा फायदा शेतकरी व नागरिकांना होणार आहे.

स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकीची स्थापना

इमेज
वडगाव -निळा रेल्वे स्थानकावरील विलंबाचा प्रश्न निकाली; गाड्यांचा थांबा आता फक्त ५–१० मिनिटांवर परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी-वडगाव रेल्वे स्थानकावर गाड्या विनाकारण दोन-दोन तास थांबत असल्याच्या समस्येला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या गंभीर मुद्द्यावर स्थानिक वृत्तपत्रांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेत कारवाई केली असून, आता गाड्यांचा थांबा केवळ ५ ते १० मिनिटांवर आला आहे. काही दिवसांपूर्वी या स्थानकावर रेल्वे गाड्या अनावश्यकपणे दीर्घकाळ थांबविल्या जात असल्याचे प्रकार समोर आले होते. प्रवाशांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी ठळकपणे बातम्या प्रसिद्ध करत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. या बातम्यांची गंभीर दखल घेत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तांत्रिक बाबींची तपासणी करून विलंबामागील कारणांचा शोध घेतल्यानंतर तातडीने आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. परिणामी, गाड्यांचा अनावश्यक थांबा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याशिवाय, स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकीची स्थापना करण...

प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यावरण व पशुसंवर्धन सचिवांना दिले निर्देश

इमेज
ना. पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात घेतल्या विभागाच्या मॅरेथॉन बैठका ; संपूर्ण दिवस कामकाजात नद्या व उद्योगांचे प्रदूषण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजनेचा घेतला आढावा प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यावरण व पशुसंवर्धन सचिवांना दिले निर्देश मुंबई दि. ०१ --- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेटीगाठी बरोबरच विभागाच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या. पर्यावरणाच्या बैठकीत नद्या व उद्योगांचे प्रदूषण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तर पशुसंवर्धन बैठकीत नव्यानेच सुरू झालेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजनेचा आढावा घेतयोजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यावरण व पशुसंवर्धन सचिवांना निर्देश दिले.    ना. पंकजाताई मुंडे यांचा आजचा संपूर्ण दिवस शासकीय कामकाजात गेला. दुपारी कॅबिनेट बैठक झाल्यानंतर त्यांनी पर्यावरण व पशुसंवर्धन विभागाच्या सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वेगवेगळ्या विषयांवर एका मागोमाग एक अशा मॅरेथॉन बैठका घेतल्या.    वारंवार प्रदुषण करणाऱ्या उद्योगांची बँक गॅरंटी व दंडाची रक्कम व...

सोशल मीडियातून नोटिसचा धुमाकूळ....जाणून घ्या सविस्तर काय आहे नोटीस

इमेज
अखेर "ती" वेळ आलीच… ‘वॉर लॉकडाउन’ ची नोटीस   जारी ! परळी वैजनाथ (इएफडीएन).....         देशभरात सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक नोटीस मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘वॉर लॉकडाउन’ अशा ठळक शीर्षकाखाली फिरणाऱ्या या पीडीएफ इमेजमुळे नागरिकांमध्ये बघता क्षणीच काही काळ संभ्रम आणि भीती निर्माण होते आणि उत्सुकतेने ही इमेज उघडल्यावर कळते आपल्याला तर एप्रिल फूल बनवण्यात आले आहे.             जागतिक पातळीवर इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध  परिस्थितीमुळे तणाव आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाउन लागू झाला असून भारतातही लवकरच लॉकडाउन होणार अशा चर्चा मोठ्या प्रमाणावर आहेत. याच  आशेचा धागा पकडत परफेक्ट एप्रिल फूल म्हणून ही नोटीस पसरवण्यात आली. त्यामुळे काही क्षण अनेक नागरिकांनी या संदेशावर विश्वास ठेवत चिंता व्यक्त करतच सविस्तर जाणून घेण्यासाठी ही इमेज फाईल ओपन करुन पाहिली अन् मग कळले की हे तर एप्रिल फूल आहे. विशेष म्हणजे, आज दिनांक १ एप्रिल – म्हणजेच एप्रिल फूल डे असल्यामुळे ही संप...

सुसाईड नोटमध्ये अन्यायाचा पाढा....

इमेज
प्रेम प्रकरणातून चोर ठरविले; बदनामीमुळे तरुणाने जीवन संपविले प्रेम प्रकरणाच्या रागातून एका २३ वर्षीय तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण करणे आणि त्यानंतर त्याला मचोरफ म्हणून बदनाम करणे, या मानसिक छळाला कंटाळून तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ज्ञानेश्वर कोकाटे (२३, रा. मांजरसुंबा) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वरचे शेजारच्या गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. याची कुणकुण लागताच तरुणीच्या नातेवाइकांनी ज्ञानेश् बरला गाठले. त्याला संबंधित गावात बोलावून त्याची दुचाकी आणि मोबाईल काढून घेतला. त्यानंतर चार जणांनी त्याला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्याला मचोरफ ठरवून सर्वत्र त्याची बदनामी केली. या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे खचलेल्या ज्ञानेश्वरने धुळे-सोलापूर महामार्गावरील एका टायर पंक्चरच्या दुकानात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. पोलिस प्रशासन काय म्हणते ? मृताच्या सुसाईड नोट आणि नातेवाइकांच्या तक्रारीवरून नेकनूर पोलिस ठाण्यात चार आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृ...

अभिमानास्पद :मुंबई येथील 'आर्य समाज' चा प्रतिष्ठित पुरस्कार

इमेज
  डॉ.नयनकुमार आचार्य यांना राष्ट्रीय वैदिक विद्वत् पुरस्कार    परळी वैजनाथ दि.३०-       वेद व संस्कृत साहित्याचे अभ्यासक  प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य यांना मुंबई येथील 'आर्य समाज' या सामाजिक कार्यातील अग्रणी संस्थेच्या वतीने नुकताच प्रतिष्ठेचा मानला जाणारा "राष्ट्रीय वैदिक विद्वत् पुरस्कार" प्रदान करण्यात आला.              मुंबई आर्य समाजाचे अध्यक्ष श्री हरीश आर्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास मुंबई प्रदेश भाजपच्या प्रवक्त्या सुमिता सुमन सिंह, प्रसिद्ध उद्योगपती विपिनभाई पटेल, अरुण अब्रोल, विजय गौतम, देशबंधू शर्मा इत्यादी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. श्री नयनकुमार आचार्य यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, गौरव राशी, शाल, श्रीफळ व मौक्तिकमाला प्रदान करून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.      विशेष म्हणजे थोर समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती यांनी १८७५ साली सर्वात प्रथम याच आर्य समाजाची स्थापना केली होती. गेल्याच वर्षी या संस्थेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव मोठ्या स्वरूपात ...

५ एप्रिलपर्यंत स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्याचे नागरिकांना आवाहन

इमेज
  चला, आपणच आपले शहर सुटसुटीत आणि शिस्तबद्ध  करुया.. हे सर्वांसाठीच आवश्यक आहे! प्रशासनाचे धाडसी पाऊल:परळी वैजनाथ नगरपरिषद राबवणार अतिक्रमण हटाव विशेष मोहीम ५ एप्रिलपर्यंत स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्याचे नागरिकांना आवाहन परळी वैजनाथ : प्रतिनिधी...       गेल्या अनेक वर्षांपासून  परळी शहरातील  जवळपास सर्वच रस्त्यांवर अतिक्रमणं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत. अतिशय सुटसुटीत व  वाहतूकीला  विना अडथळा  असे  समर्पक रुंद रस्ते  असतांनाही वाहतूक कोंडी, अस्ताव्यस्त रचना आणि बेशिस्त पार्किंग यामुळे सर्वांनाच प्रचंड त्रासातून जावे लागत आहे. त्यामुळे  आपणच आपले शहर सुटसुटीत आणि शिस्तबद्ध  करुया ,हे सर्वांसाठीच आवश्यक आहे हा तमाम परळीकर नागरिकांचा मनापासून निर्धार आहे.आता यासाठी नगर परिषद प्रशासनानेही धाडसी पाऊल टाकत परळी वैजनाथ नगरपरिषद अतिक्रमण हटाव विशेष मोहीम राबवणार असल्याची  सूचना काढली आहे.          परळी शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि नागरिकांना भेडसा...
इमेज
  महिला व बालकांच्या पोषणात लक्षणीय सुधारणेचे उदिष्ट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 31 : राज्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात करुन महिला व बालकांच्या आरोग्य आणि पोषणात लक्षणीय सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. महिला व बाल विकास विभाग आणि चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन (CIFF) यांच्यात महिला व बालकांच्या पोषणा संदर्भात पाच वर्षांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या भागीदारीमुळे माता व बाल पोषण निर्देशांकात मोठी उंची गाठली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्या उपस्थितीत हा करार झाला. यावेळी चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक मंजुला सिंग, डायरेक्टर स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह्ज अँड पार्टनरशिप्स अखिल पाळीअथ आणि अन्य वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते. या कराराअंतर्गत कुपोषणावर प्रभावी नियंत्रणासाठी विशेष भर देण्यात येणार आहे. योग्य पोषण आणि आरोग्य सवयी रुजवण्यासाठी मोहीम प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMV) सारख्या थे...

ट्रीपल ड्रग पॉलिसी (आयडीए) ...

इमेज
हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. ३१ :महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत आहे. केंद्र शासनाने २०२७ पर्यंत भारतातून हत्तीरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मोहिमेत राज्य शासनाने सक्रिय सहभाग घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विशेषतः दुर्लक्षित असलेल्या हत्तीरोगासारख्या आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवात केली. देशात २०१७ मध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यात विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांना या  औषधोपचारासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची केंद्र सरकारकडे विनंती केली होती. यामुळे महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांचे दुःख मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे. तसेच, दे...
इमेज
सन २०२५ करीता विविध कृषी पुरस्कार अर्ज ऑनलाईन सादर करणेस  १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ   महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. सदर पुरस्कार माननीय राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते प्रदान करून संबंधितांना सन्मानित करण्यात येते.                             यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीन...

महाराष्ट्रासाठी गौरव......

इमेज
  मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान नवी दिल्ली,  दि. ३१ : साहित्य अकादमीतर्फे २०२५ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या साहित्य पुरस्कारांचे आज येथे वितरण  करण्यात आले. मराठी भाषेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार व लेखक राजू बाविस्कर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले होते.  त्यात मराठी भाषेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार व लेखक  राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना हा सन्मान जाहीर झाला होता. नवी दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्ये झालेल्या या विशेष समारंभात  साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते श्री. बाविस्कर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष विश्वनाथप्रसाद तिवारी,  अकादमीच्या उपाध्यक्षा श्रीमती कुमुद शर्मा, संस्कृती मंत्रालयाचे संचालक अ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या