धक्कादायक प्रकार......
परळी बसस्थानक परिसरात सापडलेल्या दीड वर्षांच्या मुलीबाबत पोलीसांची शोध मोहीम सुरू परळी वैजनाथ, प्रतिनिधी. परळी बसस्थानक परिसरात एका दीड वर्षांच्या मुलीला तिच्या आई-वडिलांनी किंवा पालकांनी उघड्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, *दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी* सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास परळी बसस्थानक परिसरात संबंधित मुलगी आढळून आली. याबाबत सालोमन मायकल कसबेकर (वय 52, व्यवसाय – नोकरी, अधीक्षक आशा शिशुगृह, परभणी, रा. चिद्रावर नगर, जुना पेंढगाव रोड, परभणी) यांनी *दिनांक 26 मार्च 2026 रोजी संभाजीनगर परळी वैजनाथ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.* या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 93 अन्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए. टी. शिंदे हे करीत आहेत.दरम्यान, तपासादरम्यान संबंधित मुलीचे आई-वडील किंवा पालकांचा शोध घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जर कोणाला या मुलीबाबत किंवा तिच्या पालकांबाबत कोणतीही माहिती असल्...