पोस्ट्स

फेब्रुवारी २२, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रासंगिक लेख / महात्मा फुले जयंती /11 एप्रिल 2026

इमेज
सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे.महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे.समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे.त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे.त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा पुनर्विचार करणे म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नसून वर्तमानाला दिशा देण्याचे कार्य आहे.  मानवतेचा धर्म : समतेचा मूलाधार महात...

ज्ञानेश्वर राजमाने यांची मागणी

इमेज
  परळी नगरपालिकेनेच दिली घरपट्टी-पाणीपट्टीची बेबाकी; मग थकबाकी कशी? ‘बेबाकी देणाऱ्यां मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी करा’ — ज्ञानेश्वर राजमाने यांची मागणी परळी वैजनाथ (प्रतिनिधी):घरपट्टी व पाणीपट्टीची अधिकृत बेबाकी स्वतः परळी नगरपालिकेने दिल्यानंतरही संबंधित नागरिकांना थकबाकीच्या नोटिसा बजावण्यात आल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. “बेबाकी नगरपालिकेनेच दिली कशी, मग आज अचानक बाकी कशी?” असा थेट प्रश्न ज्ञानेश्वर राजमाने यांनी उपस्थित केला आहे.     नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम नियमानुसार भरल्यानंतर ‘बेबाकी’ दाखले मिळाले होते. मात्र काही दिवसांतच त्याच खात्यांवर थकबाकी दाखवण्यात आली. या विसंगतीमुळे परळी नगरपरिषद प्रशासनातील अनागोंदी कारभारावर आणि कामकाजावर असंख्य प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर परळी नगरपरिषद प्रशासनानेच दिलेल्या बेबाकीची नोंद कशाच्या आधारावर करण्यात आली? संबंधित अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नियमांची पडताळणी केली होती का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी ज्ञानेश्वर राजमाने यांनी केली आहे. ज्ञानेश्वर राजम...

प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी लिहिलेला गौरव लेख..

इमेज
  ज्ञान, प्रज्ञा आणि संस्कारांचे धम्ममेरू: प्रा. विलास रोडे  शिक्षण ही केवळ रोजगाराची संधी नसून ती मानवी मनाच्या मशागतीची प्रक्रिया आहे, हे आपल्या कृतीतून सिद्ध करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. विलास रोडे. ४ फेब्रुवारी १९६८ रोजी जन्मलेला हा प्रवास आज २८ फेब्रुवारी २०२६ रोजी 'मिलिंद कनिष्ठ महाविद्यालय, परळी वैजनाथ' येथून सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर विसावत आहे. मात्र, ही निवृत्ती केवळ एका पदाची आहे, त्यांच्या विचारांची आणि सामाजिक बांधिलकीची नव्हे. एक शिक्षक जेव्हा निवृत्त होतो, तेव्हा तो केवळ वर्गातून बाहेर पडत असतो; पण प्रा. रोडे सरांसारखा प्रगल्भ शिक्षक समाजाच्या विशाल वर्गात कायमचा प्रतिष्ठित होतो.   प्रज्ञावंत आणि बहुआयामी व्यक्तिमत्व: प्रा. विलास रोडे सरांची शैक्षणिक पात्रता पाहिली की त्यांच्यातील निरंतर शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे दर्शन घडते. इंग्रजी साहित्यात 'एम.ए.' करून त्यांनी जागतिक भाषेवर प्रभुत्व मिळवले, ज्यामुळे त्यांना जागतिक साहित्यातील मानवी संवेदनांचे आकलन झाले. तर राज्यशास्त्रातील 'एम.ए.' मुळे त्यांना देशाची लोकशाही आणि संविधानात्मक मूल्यां...
इमेज
  प्रा. विलास रोडे सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा : सामाजिक परिवर्तनाचा ध्यास जपणाऱ्या शिक्षकाला भावपूर्ण निरोप       शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करत सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणारे प्रा. विलास रोडे सर हे नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि समर्पित व्यक्तिमत्त्व औपचारिक सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांचे कार्य आणि विचार समाजाला सतत प्रेरणा देत राहतील. प्रा. रोडे सर हे पुरोगामी विचारसरणीचे अभ्यासक असून फुले , शाहू आंबेडकर यांच्या समतावादी विचारांनी प्रेरित असलेल्या शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी विविध व्याख्याने, जनजागृती कार्यक्रम आणि शैक्षणिक उपक्रम राबविले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार करत सम...
इमेज
श्री. योगेश्वरी देवीच्या मंदिरासाठी तब्बल एक कोटी रुपयांची गुप्त दान अंबाजोगाई: महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरासाठी एका मुंबईस्थित भक्ताने तब्बल एक कोटी रुपयांची भरघोस देणगी दिली आहे. मंदिराच्या शंभर वर्षे जुन्या शिखराच्या जिर्णोद्धारासाठी ही रक्कम देण्यात आली असून, विशेष म्हणजे संबंधित देणगीदाराने आपले नाव गुप्त ठेवण्याची अट घातली आहे. योगेश्वरी देवीच्या मंदिराचे सध्याचे मुख्य शिखर शंभर वर्षांपूर्वीचे आहे. हे शिखर पूर्णपणे चुन्याच्या बांधकामात असल्याने काळाच्या ओघात ते काहीसे कमकुवत झाले होते. या ऐतिहासिक शिखराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय योगेश्वरी देवस्थान समितीने नुकताच घेतला होता. या कामासाठी साधारण ८० ते ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मुंबईतील एका भक्ताला मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने आपला दूत पाठवून एक कोटी रुपयांचा धनादेश समितीच्या विश्वस्तांकडे समितीने नुकताच घेतला होता. या कामासाठी साधारण ८० ते ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मुंबईतील एका भक्ताला मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीन...

प्रभारी मुख्य अभियंता महेश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

इमेज
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सहाय्यक अभियंता सुभाष पसारे यांचा निरोप समारंभ  प्रभारी मुख्य अभियंता महेश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार परळी / प्रतिनिधी:     औष्णिक विद्युत केंद्र, परळी येथील कोळसा हाताळी विभागातील वाहन दुरुस्ती विभाग-१ चे सहाय्यक अभियंता सुभाष आनंदराव पसारे यांना २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता प्रशासकीय कार्यालयातील सभागृहात आयोजित सेवापूर्ती कार्यक्रमात निरोप देण्यात आला. श्री. पसारे यांनी परळी येथे महाजनकोला एकूण २७ वर्षे सेवा दिली. त्यांना दोन मुले असून, त्यांचा मुलगा आदित्य याने बी.टेक. पूर्ण केले आहे. या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा प्रभारी मुख्य अभियंता महेश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना महेश महाजन म्हणाले की, "प्रत्येकाने आपल्या कर्तव्यासोबतच सामाजिक आणि कौटुंबिक बांधिलकी जोपासली पाहिजे." प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार यावेळी बोलताना म्हणाले की, "माणुसकीचा भाव जोपासणारे तसेच खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारे, अशी सुभाष पसारे यांची ओळख होती." या निरोप समारंभास प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्...

भावपूर्ण श्रद्धांजली...

इमेज
  परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ मंदिर चे ज्येष्ठ पुरोहित सुरेश (बाबुदेव) नव्हाडे यांचे निधन परळी वैजनाथ: प्रतिनिधी...    येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरातील ज्येष्ठ क्षेत्रोपाध्याय श्री सुरेश (बाबुदेव) नव्हाडे (वय ७० वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले आहे. अत्यंत मनमिळावू, सुस्वभावी आणि वेदशास्त्र संपन्न पुरोहित म्हणून त्यांची संपूर्ण परिसरात ओळख होती. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी वैद्यनाथ चरणी पूजा पाठ करून पौरोहित्य करत आपली सेवा अर्पण केली.त्यांच्या पार्थिवावर परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने नव्हाडे कुटुंबावर आणि पुरोहित वर्गावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे, भाऊ, पुतणे, सुना असा मोठा परिवार आहे. नव्हाडे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

पुढील वर्षी पासून नगरपालिका या स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत करणार –नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी

इमेज
  परळीत महाशिवरात्रीनिमित्त ४६ व्या राज्यस्तरीय अश्व  शर्यतीचा थरार ; नांदेडच्या 'हिटलर' अश्वाने मारली बाजी पुढील वर्षी पासून नगरपालिका या स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत करणार –नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी  परळी वैजनाथ (प्रतिनिधी):             प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत महाशिवरात्रीचे औचित्य साधून मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने आयोजित ४६ व्या भव्य अश्व शर्यत स्पर्धेचा थरार नुकताच पार पडला. अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत नांदेड येथील मनीष कावळे यांच्या 'हिटलर' अश्वाने प्रथम क्रमांक पटकावून मैदानावर आपले वर्चस्व सिद्ध केले. पुढील वर्षी पासून परळी वैजनाथ नगरपालिका या स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे अभिवचन  नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी पारितोषिक वितरण प्रसंगी दिले.       महाशिवरात्रीचे औचित्य साधून मयूर हॉर्स रायडिंग क्लबच्या वतीने परळीतील प्रसिद्ध डॉक्टर आणि अश्वप्रेमी डॉ. सुरेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. मागील अन...

धम्म उपासकांनी सहभागी व्हावे - तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण यांचे आवाहन

इमेज
  चांदापुर येथे ७ मार्च शनिवार रोजी १२ व्या धम्म परिषदेचे आयोजन धम्म उपासकांनी सहभागी व्हावे - तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण यांचे आवाहन अंबाजोगाई (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर (तिर्थक्षेत्र दर्जा - क प्राप्त) येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी बाराव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषदेचे उद्घाटन अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष पुज्य भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो (पुर्णा) यांच्या हस्ते होत असलेल्या धम्म परिषदेत तर विशेष अतिथी म्हणून पुज्य भिक्खू करूणानंद महाथेरो (संचालक, द ग्रेट हॅपिनेस चॅनल, छत्रपती संभाजीनगर), पुज्य भिक्खू महाविरो (काळेगाव, अहमदपुर), पुज्य भिक्खू पय्यानंद (लातूर) पुज्य भिक्खू धम्मशील (हिंगोली, बीड) आणि पुज्य भिक्खू धम्मसार (किल्लारी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी, चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.   जास्तीत जास्त  उपासकांनी लाभ  घ्यावा अ...

निवडणूकीनंतरचा पहिलाच अर्थसंकल्प: कोणतीही करवाढ नाही, सर्वसमावेशक विकासाचा परळीकरांना दिला विश्वास

इमेज
  निवडणूकीनंतरचा पहिलाच अर्थसंकल्प: कोणतीही करवाढ नाही, सर्वसमावेशक विकासाचा परळीकरांना दिला विश्वास परळी नगरपरिषदेचे २०२६-२७ अर्थिक वर्षासाठी २९३ कोटींचे 'शिलकी अंदाजपत्रक' सादर परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : परळी नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा २९३ कोटी ३० लाख ३३ हजार ७५३ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी सभागृहात सादर केला. करवाढ किंवा दरवाढ न करता विकासकामांना गती देणारा हा ‘विकासनामा’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरपरिषद निवडणूकीनंतरचा सत्ताधारी महायुतीच्या वतीने सादर करण्यात आलेला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. कोणतीही करवाढ किंवा दरवाढ नाही.परळीच्या सर्वसमावेशक विकासाचा संकल्प या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून सादर करून नगरपरिषदेने परळीकरांना नव्या दिशेच्या विकासात्मक वाटचालीचा विश्वास दिला आहे.        राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे आणि माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर महायुतीने नगर परिषदेच्या माध्यमातून परळी शहराच...
इमेज
  परळीत ७ लाख ७२ हजारांच्या चोरीच्या तारांसह पिकअप जप्त; दोघांवर गुन्हा दाखल परळी (प्रतिनिधी): परळी ते नंदागौळ रस्त्यावर चोरीचे भंगार घेऊन जाणाऱ्या एका पिकअपवर परळी ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ३ लाख ७२ हजार रुपये किमतीची १,२४० किलो ॲल्युमिनियमची (जर्मन) तार आणि ४ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन, असा एकूण ७ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नेमकी घटना काय? दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास परळी ग्रामीण पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, परळी ते नंदागौळ रस्त्याने एका पिकअपमधून (क्रमांक MH 44 U 4139) चोरीचे भंगार नेले जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वसंतनगर तांडा फाट्यावर सापळा लावून सदर वाहन अडवले. वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियमच्या तारा आढळून आल्या. वाहन चालक याच्याकडे चौकशी केली असता, त्याने हे भंगार मोईन अकबर काकर (रा. काकर मोहल्ला, परळी) यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. पावत्या नसल्याने भांडे फुटले भं...
इमेज
  इंदपवाडीच्या विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव घेतला आनंदनगरीतून! परळी दि. 26 (प्रतिनिधी) चटकदार, मटकदार, खमंग पदार्थांचा आस्वाद घेत इंदपवाडी येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत आज आनंदनगरी मध्ये सहभाग घेतला! शाळेचे प्रांगण म्हणजे जणू आज एखादे बाजाराचे ठिकाण वाटत होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी येथे आज आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले. गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री गोविंद मुंडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री केशव मुंडे, माजी सरपंच श्री मोहन मुंडे, माजी सरपंच श्री भागवत मुंडे, शालेय शिक्षण समिती सदस्य श्री वैजनाथ मुंडे यांच्यासह श्री रामकृष्ण मुंडे व शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष केंद्रे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून आनंदनगरीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.  उपस्थित सर्व अतिथींचे व ग्रामस्थांचे स्वागत केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने तयार केलेल्या पौष्टिक, खमंग पदार्थांना विक्रीची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांना हा पदार्थ तयार करत असताना कोण कोणत्या वस्तू किती वजनाच्या प्रमाणात आणि...

उपस्थित राहण्याचे आवाहन...

इमेज
  परळीत उद्या स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन परळी वैजनाथ: प्रतिनिधी  हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त उद्या, गुरुवार दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी परळी शहरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.       स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, औद्योगिक वसाहत कार्यालयासमोर उद्या (२६ फेब्रुवारी) रोजी सायंकाळी ५:३० वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. याप्रसंगी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना सामूहिक अभिवादन करण्यात येणार आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्व सावरकरप्रेमींनी या अभिवादन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
इमेज
डॉ. प्रीतम मुंडे  यांची राज्यसभेवर वर्णी? भाजपच्या कोअर कमिटीत नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता मुंबई:  महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या सात जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, माजी खासदार  डॉ. प्रीतम मुंडे  यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली, ज्यात प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. पंकजा मुंडे यांचे सूचक विधान:  भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री  पंकजा मुंडे  यांनी माध्यमांशी बोलताना प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत असल्याचे मान्य केले आहे. "राज्यसभेसाठी प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत असून, अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व घेईल," असे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय पुनर्वसन:  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर आता ...
इमेज
  अश्वांच्या धावण्याच्या स्पर्धा २६ फेब्रुवारीला; अश्वपालकांना सहभागाचे आवाहन परळी  : मयूर हॉर्स रायडिंग क्लबतर्फे प्रति वर्षाप्रमाणे यंदाही अश्वांच्या धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता वैद्यनाथ महाविद्यालय  समोरील मैदान येथे करण्यात आले आहे. अश्वपालकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश चौधरी यांनी केले आहे. या स्पर्धांची सुरुवात १९८० पासून झाली असून या उपक्रमाला मोठी परंपरा लाभली आहे. बीड जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी संदीप बागची यांनीही या स्पर्धेत घोडेस्वारी करत प्रथम क्रमांक पटकावल्याची नोंद आहे. रैवाल चालीवरील घोड्यांच्या स्पर्धांची सुरुवात परळी वैजनाथ येथेच झाली. यापूर्वी अशा स्पर्धा प्रामुख्याने माळेगाव येथे गॅलपिंग प्रकारात होत असत. मात्र, त्या स्पर्धांमध्ये अपघातांचे प्रमाण अधिक असल्याने डॉ. चौधरी यांनी सुरक्षित रैवाल चालीवरील स्पर्धांची संकल्पना सुरू केली. डॉ. चौधरी यांच्याकडे ‘मयूर’ नावाचा अत्यंत उत्कृष्ट घोडा होता. त्याच्या मदतीने त्यांनी अनेक उल्लेखनीय कामगिरी केल्...
इमेज
  नागापूर येथे श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळा नागापूर येथील ग्राम दैवत श्री नागनाथ प्रभुच्या पावनभूमीमध्ये पुष्प 30 वे श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह श्री नागनाथ मंदिर नागापूर येथे शुक्रवार दि. 27 रोजी प्रारंभ होत असून श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज माजलगावकर शनिवार रोजी श्री ह भ प भानुदास महाराज खरात रविवार रोजी ह भ प किशोर महाराज सूर्यवंशी सोमवार रोजी ह भ प पांडुरंग महाराज कोकाटे मंगळवार श्री ह भ प माधव महाराज ढाकणे बुधवार श्री ह भ प महादेव महाराज चाकरवाडीकर गुरुवार श्री ह भ प बाळासाहेब महाराज कुलकर्णी दस्तापुरकर यांचे सकाळी 10 ते12 वा. तुकाराम महाराज वैकुंठ गमन गुलाल पुष्पवृष्टी चे कीर्तन होईल व रात्री 8 ते10 वा हभप अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे कीर्तन होईल शुक्रवार 6 रोजी हभप जगन्नाथ महाराज देशमुख यांचे सकाळी 11 ते 1 वा काल्याचे किर्तन होईल व नंतर सार्वजनिक महाप्रसाद होईल याचा सर्व सदभक्तांनी लाभ घ्यावा असे समस्त ग्रामस्थ मंडळी नागापूर यांनी केले आहे.
इमेज
अव्वाच्या सव्वा विज बिलामुळे ग्राहक संतप्त; वीज वितरण कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह परळी : वापरापेक्षा अव्वाच्या सव्वा विज बिल येत असल्याने परळीतील वीज ग्राहक संतप्त झाले असून अन्यायकारक बिलांविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. विज बिल दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या गंभीर तक्रारी पुढे आल्या आहेत. सोमवारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, वीज वितरण कार्यालयात बिल प्रत काढणे व दुरुस्ती करून घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र. अतिरिक्त कार्यकारी अभियंता व शहर शाखा अभियंता हे कार्यालयीन बैठकीसाठी बाहेरगावी गेल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, वीज वितरण कार्यालयाच्या अंदाधुंद कारभारामुळे ग्राहक वैतागले आहेत. वेळेवर बिल न मिळणे, चुकीचे व जादा रीडिंग दाखवून ग्राहकांची आर्थिक लूट करणे, तसेच दुरुस्तीसाठी आलेल्या ग्राहकांना सौजन्याऐवजी उद्धट वागणूक देणे, अशा तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक वेळा ग्राहक आणि एका कर्मचाऱ्यांमध्ये वादही झाले आहेत. गेल्या आठवड्यात नातेवा...
इमेज
  स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे घवघवीत यश;40 विद्यार्थ्यांची यशाला गवसणी परळी / प्रतिनिधी .....      महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 8 वर्गाच्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ( एनएमएमएस ) परीक्षेत महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित चार शाळेतील 40 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले.      ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था असलेल्या महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र विद्यालय मोहा ता-परळी येथील 12, आसुबाई विद्यालय मांडेखेल येथील 9, सांडेश्वर विद्यालय चनई ता-अंबाजोगाई येथील 8 तर गोदावरी विद्यालय मंजरथ ता-माजलगाव येथील 11 असे 40 विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. महाराष्ट्र शिक्षण संस्था सातत्याने विद्यार्थी गुणवत्तेबाबत प्रयत्नशील राहिलेली असून स्पर्धा परिक्षबाबत जाणीवपूर्वक काम करत असते. राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेतील यश हे या कामाची फलश्रुती होय. या परीक्षेत पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपये असे ...

दोन हप्त्यांचे पैसे आले की एकाच?

इमेज
लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात; तुम्हाला किती हजार आले? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्याने या दोन्ही महिन्याच्या हप्त्याची पात्र महिला वाट पाहत होत्या. दरम्यान, राज्य सरकारने पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. हे पैसे खात्यात कधी जमा होणार याबाबत सरकारने कोणतीही माहिती न देता थेट खात्यात पैसे जमा केल्याने पात्र महिलांना ही अनपेक्षित भेट वाटत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्याकरता राज्य सरकारने केवायसी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, ऑक्टोबर महिन्यापासून ई केवायसीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे ई केवायसी करण्याची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली. तरीही या तांत्रिक अडचणी संपलेल्या नाहीत. मात्र, अशाही परिस्थिती ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी येण्यास सुरुवात झाली आहे. दोन हप्त्यांचे पैसे आले की एकाच? दरम्य...

आ. धनंजय मुंडेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना

इमेज
अवकाळी पाऊस, गारपिटीने परळी मतदारसंघात पिकांचे नुकसान आ. धनंजय मुंडेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - कालपासून वातावरणात अचानक झालेल्या बदलानंतर परळी मतदारसंघातील अंबाजोगाई तालुक्यासह परळी तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये अवकाळी पाऊस, वादळासह गारपीट झाल्याने उभ्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना परळी मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना दूरध्वनी द्वारे केले आहेत.         रविवारी रात्रीपासून परळी मतदारसंघातील अंबाजोगाई व परळी तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व बऱ्याच गावांमध्ये गारपीट झाली असून, त्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला, फळपिके यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी धनंजय मुंडे यांनी तत्काळ पंचनामे करून नुकसानीचे अहवाल शासनास पाठवण्याचा सूचना जिल्हा प्रशासनाला...

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने पंचनामे करण्याची मागणी....

इमेज
परळी वैजनाथ तालुक्यात सर्वदूर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; गहू ज्वारी हरभरा टरबूज पिकांचे नुकसान परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...    परळी तालुक्यात सर्वदूर जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला.आज दुपारी झालेल्या अवकाळी पावसात तालुक्यात गहू, ज्वारी, हरभरा यासह टरबुजाचे नुकसान झाले. परळी शहरात पावसाने पोलवर करंट उतरून एक शेळी दगावली आहे. तर काही ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही पुढे आल्या आहेत.        परळी तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केल्याचे बघायला मिळाले. जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. परळी वैजनाथ तालुक्यातील पिंपळगाव मंडळात मोठ्या प्रमाणावर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाल्याने शिवारात झाडे, विजेचे खांब अक्षरशः उमळून पडले तर गहू, ज्वारी व हरभरा पिकालाही या पावसाचा फटका बसला आहे. गहू, ज्वारीची पिके या वाऱ्याने व पावसाने आडवी पडल्याचे चित्र बघायला मिळाले. नागापूर, धर्मापुरी, मोहा, बेलंबा, कौठळी, गर्देवाडी शिरसाळा, दौनापूर करेवाडी या सर्व पट्ट्यांमध्ये पाऊस झाला. या पावसाने गहू, हरभरा, ज्वारीच्या पिकासह टरबु...

श्रीसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त परळीत उत्साहात कार्यक्रम

इमेज
श्रीसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त परळीत उत्साहात कार्यक्रम श्रीसंत गाडगेबाबा आपल्यासाठी दीपस्तंभ; 'स्वच्छ परळी, सुंदर परळी'चा संकल्प सिद्धीस नेणार - नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ (प्रतिनिधी): "श्री संत गाडगेबाबा यांनी  आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश दिला.श्री संत गाडगेबाबा आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे चालवत, परळी शहरात 'स्वच्छ परळी, सुंदर परळी' हे सिद्धेश नेण्याचा आपला निर्धार आहे. नागरिकांनीही स्वच्छतेमध्ये सहभागी होऊन तो लोकसहभागातून एक यशस्वी निर्धार करावा, असे प्रतिपादन परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव बाजीराव धर्माधिकारी यांनी केले.          श्रीसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त श्री संत गाडगेबाबा नगर (पूर्वीची चुकार गल्ली) येथे आयोजित  कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.यावेळी बोलताना सौ. धर्माधिकारी म्हणाल्या की, गाडगेबाबांच्या नावाने या भागात उभ्या राहणाऱ्या सभागृहासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. या कार्यासाठी नागरिकांनीही प्रशा...
इमेज
  परभणी जिल्ह्यास तुकाराम मुंढे नवीन पालक सचिव      परभणी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनच्या सामान्य प्रशासन विभागाने विविध जिल्ह्यांच्या पालक सचिवांच्या नियुक्त्यांबाबत आदेश जारी केले आहेत. मंत्रालय, मुंबई येथून २३ फेब्रुवारी रोजी हा शासन आदेश काढण्यात आला.     या आदेशानुसार परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी  तुकाराम मुंढे (सचिव, दिव्यांग कल्याण विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ही जबाबदारी दीपक कपूर (अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग) यांच्याकडे होती.      प्रशासकीय कारणास्तव राज्यातील काही जिल्ह्यांच्या पालक सचिवांमध्ये बदल करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले पालक सचिव लवकरच कार्यभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी केले स्वागत

इमेज
  पुसदच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई नाईक यांचे परळीत स्वागत परळी वैजनाथ (प्रतिनिधी):              पुसद नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई इंद्रनील नाईक यांनी आज बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले.           यावेळी परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सौ. मोहिनीताई नाईक या नवनिर्वाचित नगराध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रभू वैद्यनाथांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी परळी येथे आल्या होत्या. यावेळी परळी नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. दोन्ही नगराध्यक्षांमध्ये यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. या भेटीदरम्यान स्नेह, समन्वय आणि विकासाच्या संकल्पनेतून दोन्ही नगरपरिषदांमधील सहकार्य अधिक दृढ व्हावे, अशी भावना दोन्ही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली.
इमेज
  श्री संत गाडगेबाबा नगरमधुन स्वच्छता मोहिमेची सुरूवात करणार - सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वै.| प्रतिनिधी -  श्री संत गाडगेबाबा नगर मधुन स्वच्छतेची सुरुवात करणार असे प्रतिपादन परळी न.प. च्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.   आज श्री संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती संत गाडगेबाबा या नगरमध्ये (पुर्वीची चुकार गल्ली) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदावरून बोलतांना स्वच्छ परळी सुंदर परळी या ब्रिदवाक्याला अनुसरुन आपण सर्व मिळून परळी स्वच्छ करू असा निर्धार सौ.धर्माधिकारी यांनी केला. संत गाडगेबाबा महाराज यांच्या नावाने आपण सभागृहासाठी पूर्ण ते सहकार्य करू असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी टाळ्यांच्या गजरात सर्वांनी त्यांना प्रतिसाद दिला. याकामी नागरिकांनी सुध्दा सहकार्य करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा नगराध्यक्षांनी व्यक्त केली.   कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन परळी तहसिलचे पुरवठा अधिकारी बालाजी कचरे, या भागातील माजी नगरसेवक अनिल आष्टेकर, सामाजिक कार्यकर्ते विलासराव ताटे, हनुमान व्यायाम शाळेचे अध्यक्ष वैजनाथ ईटके...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!