प्रासंगिक लेख: ॲड. भानुदास शौचे,नाशिक
श्री भगवान परशुराम : ब्राह्म तेज व क्षात्र तेज यांचा अपूर्व संगम श्री भगवान परशुरामांनी ब्राह्म तेजाचे, क्षात्र तेजाचे, ज्ञानाचे, वेदांचे संवर्धन संगोपन केले, तसेच ज्ञानाचे, वेदांचे संवर्धन - संगोपन करणार्या ऋषीमुनींचे ही संरक्षण केले. ब्राह्मण कुळात जन्मलेले श्री भगवान परशुराम की ज्यांचे मुखात चार वेद आहेत, पाठीवर बाणा बाणासह धनुष्य आहे, हातात परशू आहे म्हणजेच ज्यांचेत अद्वितीय असे ब्राह्म तेज आणि महापराक्रमी क्षात्र तेज आहे असे राम शाप देऊन किंवा बाण/परशू ने दुर्जनांचा नाश करतील. श्री भगवान परशुराम हे सप्त चिरंजीव यांचे पैकी एक मानले जातात. भगवान विष्णू च्या नऊ अवतरांपैकी श्री भगवान परशुराम हा सहावा अवतार होय. एकोणिसाव्या त्रेतायुगात, महाभारतानुसार त्रेता आणि द्वापार युगाच्या संधिकालात वैशाख महिन्याच्या तृतीयेला म्हणजे अक्षय्य तृतीयेला सूर्यास्ताच्या संधिकाली महर्षी भृगू ऋषींच्या वंशात आदिती नक्षत्रावर जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेच्या पोटी परशुरामाचा जन्म झाला. श्री भगवान परशुराम यांचे जन्म निमित्त वै. शु. तृतीयेला श्री भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा केल...