इमेज
 " मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी; घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन!" परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... "मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" म्हणत धमकी दिली. त्यानंतर ती एकटीच असताना घरी जाऊन अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा चीड आणणारा प्रकार घडला आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरवट ता. परळी येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. आरमान मुबारक शेख रा. मिरवट ता. परळी वै हा पीडिता मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या घरी जाऊन " तु मुझे रात को खंडोबा मंदीरके पास मिलने को आ, नही आई तो तेरा बुरा हाल करूंगा" असे म्हणुन धमकी दिली. पीडितेचा हात धरुन त्याने तिला जवळ ओढुन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी धमकी व विनयभंग केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पुढील तपास पोउपनि निमोणे हे करीत आहेत. 2

पनवेल-नांदेड शिवाजीनगरलाच तीन तासांपासून अडकली :

 सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!


पनवेल-नांदेड शिवाजीनगरलाच तीन तासांपासून अडकली 

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडून सोलापूरला निघालेल्या २२२२५ वंदे भारत एक्स्प्रेसला पुणे रेल्वे स्थानकात अपघात घडला. रेल्वेच्या चौथ्या डब्याची एक ट्रॉली रुळावरून घसरली. रेल्वेने पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करताच ही ट्रॉली स्थानकाच्या डायमंड क्रॉसिंगवर रुळावरून घसरली. संयंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डायमंड क्रॉसिंग लगेचच बदलण्याचे निर्देश -महत्वाचे म्हणजे, या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे समजते. पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग अंतर्गत क्रॉसिंग अपग्रेड करण्याचे काम नियोजित आहे. त्याच दरम्यान हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनचे केवळ एक चाकच डायमंड क्रॉसिंगवर घसरले आहे. ती डायमंड क्रॉसिंग लगेचच बदलण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. खरेतर, देशभरातील अशा सर्व नॉन स्टॅन्डर्ड डायमंड क्रॉसिंग बदलण्यात येत आहेत.दुसऱ्या रेल्वे संचात (Rake) प्रवाशांची व्यवसथा -या अपघातामुळे प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने तत्परता दाखवत त्यांच्या सोयीसाठी, त्यांची दुसऱ्या रेल्वे संचात (Rake) व्यवसथा करण्यात आली. जेणेकरून त्यांना आपल्या पुढील प्रवासासाठी रवाना होता येईल. या घटनेमुळे पुणे स्थानकावरील इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर किंचित परिणामही होऊ शकतो.
पनवेल नांदेड उशिराने धावणार....
दरम्यान, पनवेलहून नांदेड कडे येणारी पनवेल नांदेड ही रेल्वे गाडी पुण्याच्या अलीकडील शिवाजीनगर रेल्वे स्थानकातच अडकली आहे. पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश  मिळाल्यानंतर, रेल्वे ट्रॅक मोकळा झाल्यानंतर पनवेल गाडी नांदेडच्या दिशेने रवाना होईल. सध्या ही गाडी तब्बल तीन तासापासून अडकलेली असून त्यामुळे ही गाडी उशिराने धावत आहे. परळी वैजनाथ येथे ही गाडी सकाळी साडेपाचच्या दरम्यान येत असते. मात्र झालेल्या अपघाती घटनेमुळे या गाडीला उशीर होणार असून ही गाडी आठ ते साडेआठच्या नंतर परळीत येऊन साडेनऊच्या आसपास नांदेडला पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या