पोस्ट्स

मार्च ८, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
ग्लोबल विकास ट्रस्टच्या सहाय्यातून 30 गुंठ्यांत सव्वातीन लाखांचे उत्पन्न! लिंबू शेतीतून डिगंबर गडदे यांचा यशस्वी प्रयोग परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी तालुक्यातील वाघाळा येथील शेतकरी डिगंबर जिजाराम गडदे यांनी अल्पभूधारक असूनही आधुनिक पद्धतींचा अवलंब करत लिंबू शेतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केवळ 1 एकर शेती असलेल्या गडदे यांनी 2019 साली 30 गुंठे जमिनीत 100 लिंबूची रोपे लावून शेतीत नवा प्रयोग सुरू केला. या लिंबू बागेला लागवडीपासून अवघ्या 27 महिन्यांत फळधारणा सुरू झाली. ग्लोबल विकास ट्रस्टचे सुयोग्य मार्गदर्शन आणि गडदे यांनी केलेल्या नियोजनामुळे चालू वर्षात त्यांनी सुमारे 9 क्विंटल लिंबू उत्पादन घेतले आहे. सध्या बाजारात लिंबाला 125 रुपये प्रति किलोपर्यंत भाव मिळत असला तरी, कधी कधी हा दर 10 रुपयांपर्यंत घसरतो. अशा चढ-उतारांमध्येही गडदे यांना सरासरी 40 रुपये प्रति किलो दर मिळाला. लिंबू लागवडीतूनआतापर्यंत त्यांनी सुमारे 3.25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे, या शेतीसाठी त्यांचा एकूण खर्च केवळ 10 हजार रुपयांच्या आसपास राहिला आहे. ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना लिंब...
इमेज
१६ वर्षीय मुलीवर दोघांकडून पाशवी अत्याचार; आरोपीं विरुद्ध 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        परळी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील धारावती तांडा परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. *बहाण्याने बोलावून केला अत्याचार*         मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित मुलीला एका बहाण्याने घरात बोलावून घेतले. मुलगी घरात येताच नराधमांनी दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर तिचे हात-पाय बांधून आणि तोंडात बोळा कोंबून दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यांनी पीडितेला दिली. *गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू        घटनेनंतर पीडितेने धीर एकवटून आपल्या पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पालकांनी तत्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोन्ही आरोप...
इमेज
  परळी लोकन्यायालयात प्रकरणे 86 प्रकरणे तडजोडीने निकाली परळी वैजनाथ  परळी तालुका विधी सेवा समिती व परळी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी तथा विविध बँका पतसंस्था महावितरण  इत्यादी संस्था यांचे प्रकरणे  सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली.  दिनांक 14 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या लोक अदालतीत दाखल पूर्व 24 व प्रलंबित प्रकरणे 62 मिळून 86 प्रकरणे निकाली निघाली आणि एकूण रक्कम वसुली 68 लाख 85 हजार 284  रुपयांची बँक पतसंस्था यांची वसुली झाली आहे .सदर लोकन्यायालयात पंच म्हणून परळी न्यायालयाचे न्या डि आर बोर्डे न्या डि वाय रायरीकर ॲड व्हि डी धुमाळ ॲड व्हि एम जगतकर यांनी काम पाहिले.सदर लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी न्या परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड डि बी कडबाने ॲड आर.व्हि.गित्ते अँड प्रदिप गिराम ॲड आर व्हि देशमुख ॲड मिर्झा मंजुर अली ॲड.माधवराव मुंडे ॲड वैजनाथ नागरगोजे ॲड दिलीप स्वामी ॲड प्रभाकर सातभाई ॲड वसंतराव फड उपाध्यक्ष ॲड धनाजी कांबळे सचिव ॲड विलास बडे ॲड डि.एल.उजगरे.ॲड नागापूरकर ॲड जीवनराव देशमुख  ॲड गजानन पारेकर ॲड ल...

परळीकरांचा बहुमान वाढवला...... मैथिली चे सर्व स्तरातून अभिनंदन

इमेज
  परळीच्या लेकीचा कलाविष्कार पाहून पुणेकर रसिक भारावले : मैथिली लोंढे यांना पुण्यात 'ललना कलारत्न पुरस्कार' प्रदान परळी वैजनाथ/ प्रतिनिधी..... जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुण्याच्या निवेदिता प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात परळीची युवा कलाकार मैथिली बाळकृष्ण लोंढे हिला मानाचा 'ललना कलारत्न पुरस्कार २०२६' देऊन गौरविण्यात आले. पुण्यातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिर येथे महिला कलाकारांसाठी आयोजित या विशेष कार्यक्रमात मैथिलीच्या कलागुणांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते मैथिलीने स्टेजवर सादर केलेले थेट चित्रकला प्रात्यक्षिक अत्यंत कमी वेळात तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील सौंदर्याची खाण 'मधुबाला' यांचे हुबेहूब चित्र कॅनव्हासवर साकारले. परळीच्या या लेकीचा कलाविष्कार पाहून उपस्थित पुणेकर रसिक आणि मान्यवर भारावून गेले. टाळ्यांच्या कडकडाटात तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना मैथिली म्हणाली की, "निवेदिता प्रतिष्ठानसारख्या संस्थेकडून कलेची पोचपावती मिळणे ही माझ्यासाठी...

ऊसाच्या फडात वृद्धाचा मृतदेह जळालेला अवस्थेत मिळाल्याने ममदापुर परिसरात खळबळ

इमेज
  ऊसाच्या फडात वृद्धाचा मृतदेह  जळालेला अवस्थेत मिळाल्याने ममदापुर परिसरात खळबळ  अंबाजोगाई (एमबी न्यूज वृत्त सेवा) :- अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर शिवारात आज पहाटे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतातील ऊसाला लागलेल्या आगीत ६० वर्षीय वृद्धाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. विश्वनाथ पांचाळ (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांनी आजाराला कंटाळून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ममदापूर येथील शेतकरी दिलीप मोतीराम देशमुख यांच्या गावालगत असलेल्या दोन एकर ऊसाला अचानक आग लागली. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या सालगड्याने ही माहिती दिली. जेव्हा आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा ऊसाच्या सरीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पूर्णतः जळालेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.             मृत विश्वनाथ पांचाळ हे उच्चशिक्ष...

आरोपींना चार दिवसात अटक न झाल्यास माजलगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा

इमेज
  जीव वाचवण्यासाठी कुऱ्हाड वापरा, अन्याय सहन करू नका” – प्रा. लक्ष्मण हाके  आरोपींना चार दिवसात अटक न झाल्यास माजलगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा  माजलगाव (प्रतिनिधी) – राज्यभरात मेंढपाळांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे संताप व्यक्त करत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी धनगर समाज बांधवांना अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. “महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार मेंढपाळांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. माझे समाज बांधवांना आवाहन आहे की, आपल्या हातात ढाळा पाडण्यासाठी असलेली कुऱ्हाड गरज पडल्यास स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वापरा. मी चिथावणी देत नाही, तर जबाबदारीने बोलत आहे,” असे ठाम वक्तव्य त्यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन समोरील धरणे आंदोलनात केले. माजलगाव तालुक्यात घळाटवाडी येथे काल मेंढपाळ बांधवांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी पोलिस...
इमेज
  हवामान बदलावर नियंत्रणासाठी राज्याचा व्यापक आराखडा- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे मुंबई, दि.१२: हवामान बदल हा केवळ पर्यावरणाचा मर्यादित विषय नसून तो जगाच्या भवितव्याशी निगडित अत्यंत गंभीर आणि व्यापक व संवेदनशील प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर  हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा व्यापक आराखडा तयार असल्याची माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.     नियम ९२ अन्वये विधान परिषद  सदस्य सुनील शिंदे यांनी याविषयी अर्धा तास चर्चा उपस्थित केली.पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, २०२१ मध्ये राज्याने हवामान कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी विशेष समिती स्थापन केली असून ३५० हून अधिक तज्ज्ञ आणि अधिकारी या प्रक्रियेत सहभागी आहेत. केंद्र शासनानेही या आराखड्याला मान्यता दिली आहे. २०१५ ते २०२५  या कालावधीत आणि विशेषतः २०२५ हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. गेल्या ५० वर्षांत उष्ण आणि अतिउष्ण दिवसांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे अधोरेखित करत पर्यावरण व वातावरणीय ...

सत्ताधाऱ्यांच्या जाचातून गावाला मुक्त करणार -माधव मुंडे

इमेज
  गावच्या विकासाला खीळ : मनमानी कारभाराला कंटाळून हाळमच्या उपसरपंचाचा राजीनामा सत्ताधाऱ्यांच्या जाचातून गावाला मुक्त करणार  -माधव मुंडे  परळी वैजनाथ (प्रतिनिधी):              लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येताना गावकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याने आणि ग्रामपंचायतीच्या कारभारात होत असलेल्या अनियमिततेवर संताप व्यक्त करत, परळी तालुक्यातील हाळमच्या उपसरपंचाने थेट आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देवनाथ सुखदेव दहिफळे असे या उपसरपंचाचे नाव असून, त्यांनी आपला राजीनामा गट विकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.           परळी तालुक्यातील हाळमचे उपसरपंच देवनाथ सुखदेव दहिफळे यांनी आपल्या राजीनामा पत्रात ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गावात ग्रामसभाच झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालय नसणे, मासिक बैठकांचा अभाव, पथदिव्यांची दुरवस्था आणि स्वच्छतेचा प्रश्न यांमुळे ग्रामस्थ त्रस्त असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ मूलभूत सुविधाच नव्हे, तर महसुली कामांतही...

मोठ्या संख्येने वारकरी आंदोलनात सहभागी...

इमेज
भामचंद्र डोंगर मुक्ती लढ्यासाठी आमदार भाई जगताप सरसावले; आझाद मैदानावरील आंदोलनास पाठिंबा मुंबई: जगद्गुरु तुकाराम महाराज यांची साधनाभूमी असलेल्या भामचंद्र डोंगर मुक्तीसाठी तुकया भक्त मधुसूदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास आमदार भाई जगताप यांनी सदिच्छा भेट देऊन आपला खंबीर पाठिंबा दर्शवला. "मी प्रथम मराठा महासंघाचा कार्यकर्ता आहे आणि जगद्गुरूंच्या साधनाभूमीवर होणारे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही," अशा शब्दांत त्यांनी सरकारला इशारा दिला. भामचंद्र डोंगर हा केवळ दगड-धोंड्यांची रांग नसून आपला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ठेवा आहे, असे सांगत भाई जगताप यांनी या प्रश्नावर विधिमंडळात लक्षवेधी मांडण्याचे आश्वासन दिले. तसेच विविध मार्गांनी सरकारचे लक्ष वेधून हा लढा अधिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी मराठवाड्यात घेतलेल्या संत संमेलनांचा संदर्भ देत, त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड आणि प्रकाश महाराज बोधले यांच्यासोबतच्या कामाची आठवण करून दिली. याप्रसंगी व्यासपीठावर संत संरक्षण समितीचे मधुसूदन पाटील, अ...
इमेज
  मौजे बेलंबा गावच्या  पोलीस पाटीलपदी ज्ञानेश्वरी गिते (आंधळे) यांची निवड परळी – शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. दत्तात्रय आंधळे यांच्या सुकन्या तथा बेलंबा येथील केदारिनाथ गीते यांच्या सुविज्ञ पत्नी ज्ञानेश्वरी केदारीनाथ गीते (आंधळे)  यांची परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे बेलंबा गावच्या पोलीस पाटीलपदी निवड करण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार पार पडलेल्या निवड प्रक्रियेनंतर दि. १० मार्च २०२६ रोजी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. ज्ञानेश्वरीताई केदारनाथ गीते या गावातील सामाजिक कार्यात सदैव सक्रिय असतात. विविध सामाजिक, शैक्षणिक व ग्रामविकासाशी संबंधित उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांच्या निवडीमुळे गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे, प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधणे तसेच ग्रामविकासाच्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा सर्व क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.    दरम्यान, या निवडीबद्दल ज्ञानेश्वरी ताई गीते (आंधळे ) यांचे ॲड. दत्तात्रय आंधळे यांच्या निवासस्थानि परळी वैजनाथ येथील ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख, वेदपाठक साहेब तसेच प्रतिष्ठित नागरिका...
इमेज
सिरसाळा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ए यांच्या  वक्तव्याचा परळीत वकिलांकडून निषेध परळी | प्रतिनिधी...        सिरसाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे हे नागरिकांशी बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे वकील वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या  आहेत.संबंधित अधिकारी दहिफळे हे आरोपांना विशिष्ट वकिलच लावा अन्यथा तुमची जामीन होऊ देणार नाही म्हणून आरोपीवर दबाव टाकतात. तसेच मीच आरोपीची जामीन करतो.वाळुचे ट्रक सोडविण्यासाठी सुद्धा अमुक वकील लावा अन्यथा तुम्हाला माझ्या हद्दीत धंदा करू देणार नाही. वगैरे वकिलांच्या तक्रारीवरून परळी वकील संघाने दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी बैठक घेऊन दहिफळे याची जिल्ह्याबाहेर बदली करा म्हणून पोलीस महासंचालक मुंबई व जिल्हा पोलिस अधीक्षक बीड यांच्याकडे मागणी केली होती.त्याचा राग मनात धरून संपूर्ण वकिलांबाबत  व वकिलांच्या व्यवसायाबद्दल अपमानास्पद भाषेचा वापर करू लागला आहे.एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी वकिलांबाबत केलेल्या विधानांवरून वकील बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली ...
इमेज
  प्रसिद्ध कीर्तनकार अमृताश्रम स्वामी यांना ‘वारकरी भूषण’ पुरस्कार प्रदान पैठण:  श्रीक्षेत्र पैठण येथे नाथ षष्ठी उत्सवाच्या निमित्ताने संत एकनाथ मिशन आणि नाथ वंशज योगीराज महाराज गोसावी यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा   ‘वारकरी भूषण’   पुरस्कार यंदा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ कीर्तनकार आणि धर्मगुरू   ह.भ.प. अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी)   यांना प्रदान करण्यात आला. नाथ शिष्य दंडवत स्वामी यांची परंपरा समर्थपणे चालवल्याबद्दल आणि वारकरी संप्रदायातील त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.   दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा       फाल्गुन वद्य सप्तमीच्या मुहूर्तावर पार पडलेल्या या सोहळ्यात श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आणि प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. नाथसंस्थानाधिपती भैय्यासाहेब महाराज यांच्या नावे हा सन्मान प्रदान करण्यात येतो. इतर मान्यवरांचाही गौरव यावेळी विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल अन्य मान्यवरांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...

जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, विद्यार्थिनींच्या सादरीकरणाने रंगला कार्यक्रम...

इमेज
आवसगाव येथे महिला दिनानिमित्त उखाणे स्पर्धा उत्साहात जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, विद्यार्थिनींच्या सादरीकरणाने रंगला कार्यक्रम आवसगाव (ता. केज) : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा आवसगाव यांच्या वतीने महिलांसाठी उखाणे स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थिनींच्या विविध कलागुणांचे सादरीकरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षिका तसेच पालक प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी महिलांनी “आई मायेचा सागर” या पेटीवरील गीताचे सुंदर सादरीकरण केले तसेच काही महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. शालेय विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. तसेच विद्यार्थिनींनी “जन्म बाईचा” आणि “बाईपण भारी देवा” या गीतांवर आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यानंतर उखाणे स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत जवळपास ४० महिलांनी उ...
इमेज
  परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई : लाखो रुपयांचा गुटखा-पानमसाला जप्त परळी / प्रतिनिधी : परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने चांदापूर-घाटनादूर रोडवरील लेंडेवाडी शिवारात धाडसी कारवाई करत बेकायदेशीररित्या वाहतूक होत असलेला गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे १ लाख ६५ हजार १३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धम्मानंद नाथा गायसमुद्रे (वय ३५, पोलीस शिपाई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरन क्र. १२०/२०२६ नोंद करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३, ३(५) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राजू वाल्मीक सिरसाट (वय ३६, रा. तेलघना ता. अंबाजोगाई जि. बीड) आणि गंगाधर दिंगबरराव मेनकुदळे (वय ३६, रा. शेटे गल्ली, गंगाखेड ता. गंगाखेड जि. परभणी) यांना आरोपी करण्यात आले आहे. दि. ९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास चांदापूर-घाटनादूर रोडवरील लेंडेवाडी शिवारात आरोपी विनापरवाना आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा व पानमसाला खरेदी-विक्री व वाहतूक...

व्यापार पेठेच्या मुख्य रस्त्यावरच घटना घडल्याने काही काळ तणाव....

इमेज
आमच्या मशिदीत नमाज पढण्यासाठी आलास तर खल्लास करून टाकू: धमकी देत एकाला बेदम मारहाण परळी वैजनाथ (प्रतिनिधी) "आमच्याविरुद्ध काम करतोस का ?तुला बघून घेऊ" असे म्हणत एका जणाला पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना परळी शहरातील अरुणोदय मार्केट येथील रस्त्यावर घडली. यापुढे आमच्या मशिदीत नमाज पढण्यासाठी आलास तर खल्लास करून टाकू अशी धमकी देत रस्त्यावरच हा राडा झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळी शहरातील अरुणोदय मार्केट समोरील रस्त्यावर रविवार दि.८ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता खाजगी वायरमन सय्यद खद्दुस सय्यद मंजूर वय ३७ वर्षे रा.पेठ मोहल्ला हे एका इलेक्ट्रिकल दुकानातून सामान खरेदी करून जात होते. त्यावेळी संगणमत करून त्याला रस्त्यात अडवून पाच जणांनी धमक्या देत मारहाण केली. "तु लई माजला आहेस", "तुला लई मस्ती आली आहे" तु आमचे विरोधात काम का केलेस असे म्हणुन शिवीगाळ सुरू केली. तसेच लोखंडी रॉड दगड आदींचा वापर करत पाच जणांनी या फिर्यादीला त्याच्या ...

जागतिक महिला दिनानिमित्त उत्साहात उपक्रम..

इमेज
  तिहेरी आनंदाचा महिला दिन स्कॉलर केजी स्कूलमध्ये साजरा स्वतःचा उत्कर्ष कसा करावा याचा संवाद साधणारा कार्यक्रम, पाककलेच्या कौशल्येला वाव देणारा आनंद नगरीचा कार्यक्रम आणि महिलांच्या आरोग्याला थोडासा हातभार लावणारा फ्री डेंटल चेकअप कॅम्प असा तिहेरी आनंदाचा महिला दिन स्कॉलर केजी स्कूलमध्ये उत्साहात साजरा झाला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सुरेखा बांगर तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ रुपाली फड आणि प्रा वंदना जगतकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ पद्धतीने व्यासपीठावर बसण्याची संधी सौ पूनम भुतडा यांना मिळाली. विद्येची देवता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या शिक्षिका आणि फुटके परिवाराच्या वतीने करण्यात आले.  शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांनी आपल्या प्रास्ताविकात यावर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या आनंद नगरी, फ्री डेंटल चेकअप कॅम्पचे आयोजन महिला दिनानिमित्ताने करताना आनंद होत असल्याचे सांगितले. डॉ सौ रूपाली फड यांनी महिलांनी कुटुंब सांभाळत असताना स्वतःच्या आरोग्याची क...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....