पोस्ट्स

आजपासून कार, मोटार सायकल महागणार

इमेज
आजपासून कार, मोटार सायकल महागणार नवी दिल्ली - कार किंवा मोटरसायकल विकत घेणं एक सप्टेंबरपासून महागणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (इरडा) या विमा नियंत्रकाच्या निर्देशांनुसार आजपासून दीर्घकालीन थर्ड पार्टी विमा उतरवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनुसार इरडाने हे निर्बंध लागू केले आहेत. एक हजार सीसी खालील गाड्यांना तीन वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यासाठी 5,286 रुपये मोजावे लागणार आहेत, एक हजार ते दीड हजार सीसी मधल्या गाड्यांना तीन वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यासाठी 9,534 रुपये तर दीड हजार सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या गाड्यांना तीन वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यासाठी 24,305 रुपये मोजावे लागणार आहेत. तर मोटारसायकलच्या बाबतीत पाच वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यापोटी 75 सीसी खालील गाड्यांना 1,045 रुपये, 75 ते 150 सीसी मधल्या गाड्यांना 3,285 रुपये, 150 ते 350 सीसी मधल्या गाड्यांना 5,453 रुपये तर 350 सीसी वरील गाड्यांना 13,034 रुपये इतका प्रीमियम भरावा लागणार आहे. 🔸मोटर वेहिकल अ‍ॅक्टनुसार थर्ड पार्टी विमा काढणं बंधनकारक आधी हा विमा एका वर्षाचा म...

महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून केंद्र संचालक आरेफ शेख यांचा सत्कार

इमेज
महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून केंद्र संचालक आरेफ शेख यांचा सत्कार   परळी (प्रतिनिधी):   येथील कामगार कल्याण केंद्राचे केंद्र संचालक आरेफ शेख यांचा महावितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून विशेष सत्कार करण्यात आले. महावितरण मधील कामगारांच्या पाल्यांना कामगार कल्याण केंद्राच्या शिष्यवृत्ती योजना,    पाठ्यपुस्तक सहाय्य योजना,  एम. एस. सी. आयटी अनुदान  योजना आणी   विविध उपक्रम व कार्यक्रमाचा लाभ श्री. शेख यांनी मिळवून दिला.  यानिमित्त महावितरणचे  अभियंता विजयकुमार वरवटकर यांनी शाल,  श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री. शेख यांचा  सत्कार केला. यावेळेस प्रसाद कुलकर्णी, उमा ताटे,  भगवान मंडलीक, प्रकाश परळीकर उपस्थित होते.

परळीत संत भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त लक्षवेधी शोभायात्रा!

इमेज
परळीत  संत भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त लक्षवेधी शोभायात्रा!  ● शिवाजीनगर ते वैद्यनाथ मंदिरपर्यंत बाल भजनी मंडळांची  दिंडी ● परळी वैजनाथ  : प्रतिनिधी. ...        राष्ट्रीय  संत भगवानबाबा यांची जयंती परळीत मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने  काढण्यात आलेली शोभायात्रा लक्षवेधी  ठरली. शिवाजीनगर ते वैद्यनाथ मंदिरपर्यंत बाल भजनी मंडळांची  दिंडी काढण्यात आली होती.            परळी येथे  भगवानबाबांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहराच्या मुख्य मार्गावरून   मिरवणुक काढण्यात आली. यावेळी  प्रतिष्ठीत नागरीक, युवक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते. मिरवणुकीमधे भजनी मंडळ, महीला सहभागी होत्या. संत भगवानबाबांच्या घोषनांनी परीसर भक्तीमय झाला होता.

परळीतील श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयाची आज सांगता!

इमेज
*परळीतील श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयाची आज सांगता! * डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर सोडणार मौनव्रताची सांगता  परळी वैजनाथ/प्रतिनिधी*           डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82 व्या तपोनुष्ठान सोहळयाची आज रविवार दि.2 सप्टेंबर रोजी संागता होत असून याच सोबत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज आपले मौनव्रताची सांगता होणार  आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर, ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.             श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयाच्या सांगता समारंभाच्या पार्श्वभूमीवर राज्यातून तसेच बाहेरच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक व समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराज उपस्थितांना मुख्य सोहळयात आशिर्वचनही देणार आहेत.यानंतर महाप्रसादाने सांगता होईल.  @@@@     मान्यवरांची लाभणार उपस्थिती. ....   ...

स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने केरळ साह्यता निधी संकलन

इमेज
स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने केरळ  साह्यता निधी संकलन  परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ..        स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने, केरळ  साह्यता निधी म्हणून रा.से.यो.च्या वतीने रॅलीचे आयोजन टि.पी.एस.काॅलनी थम॔ल येथे करण्यात आले होते.           केरळमध्ये पावसाने थैमान घातले यात अतोनात नुकसान झाले. जीवित आणि आत्मानी संकटाने हाहाकार माजला ज्यांचे जिव वाचले त्यांच्या साठी भुतलावरील अनेक देश मदतीला धावले आहेत.          या रॅली मध्ये विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित उपप्राचार्य बी.आर.कोपरे,कार्यक्रमाधीकारी . प्रा. भगवान कदम, प्रा श्रीहरी गुट्टे, प्रा.डाॅ.एल आर मुंडे प्रा. कोकलगावे, प्रा.राख, प्रा बाळासाहेब देशमुख प्रा. व्यवहारे व प्रा.ईतापे, प्रा राठोड, प्रा.राडकर, प्रा.सौ देशमुख, प्रा.सौ सय्यद, प्रा कुमारी गायकवाड, प्रा.लव्हाळे, प्रा देशमुख, इत्यादी या रॅली मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शोभायात्रेने जिरेवाडी येथे संत भगवानबाबा यांची जयंती साजरी

इमेज
शोभायात्रेने  जिरेवाडी येथे संत भगवानबाबा यांची जयंती साजरी   शोभायात्रेने  जिरेवाडी येथे संत भगवानबाबा यांची जयंती साजरी  जिरेवाडी   : श्रीरंग मुंडे .... ...        जिरेवाडी येथे संत भगवानबाबा यांची जयंती मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली.  शोभायाञा, विविध देखावे हे या मिरवणुक सोहळ्याचे आकर्षण ठरले.             जिरेवाडी येथे दरवर्षी भगवानबाबांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. जयंतीनिमित्त दरवर्षी विविध सामाजिक ऊपक्रम राबवले जातात. शुक्रवारी जयंतीनिमित्त ह.भ.प. विजयानंद महाराज आघाव यांचे किर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाल.  संध्याकाळी चार वाजता मिरवणुक सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी काँग्रेसचे  नेते प्रा. टी.पी. मुंडे (सर) यांनी या मिरवणुक सोहळ्याचे ऊद्घाटन केले. आपल्या भाषणात प्रा. टी. पी. मुंडे यांनी  जयंतीच्या यशस्वी आयोजनाबाद्दल राहुल कांदे व त्यांच्या सहका-यांचे कौतुक केले. यावेळी पाटील अंगदराव मुंडे, भगवानराव कांदे, सरपंच गोवर्धन ...

परळीत दिड लाखांची लाच घेताना मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडले*

इमेज
*परळीत दिड लाखांची लाच घेताना मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडले*  परळी वैजनाथ : प्रतिनिधी           शिक्षणाधिकारी यांच्यासमोर विद्यमान लिपिकाची बाजू मांडण्यासाठी दोन लाखांची लाच मागून त्यापैकी दिड लाखांची रक्कम स्वीकारताना परळी येथील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक नंदकिशोर पापालाल मोदी याला बीड एसीबीने सापळा रचून रंगेहाथ पकडले.               २०१२ साली वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयातील चार शिक्षक आणि एक लिपिक यांची नेमणूक नियमबाह्य असल्याचे कारण देत संस्थेने त्यांना सेवेतून कार्यमुक्त केले होते. यापैकी दोन कर्मचाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली होती. याची चौकशी बीडचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे सुरु आहे. या चौकशीत लिपिक पदाच्या संबंधी बाजू मांडण्यासाठी वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक नंदकिशोर पापालाल मोदी याने विद्यमान लिपिकाकडे दोन लाखांची लाच मागितली होती. रक्कम न दिल्यास तुमची सेवा समाप्त करून पूर्वीच्या लिपिकास सेवेत पुन्हा रुजू करण्यात येईल असेही मोदी याने विद्यमान लिपिकास बजाव...