पोस्ट्स

_नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव - 2018_ .....

इमेज
_नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव - 2018_ ●  *मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांची परळीत मेजवानी; उद्घाटनाला सिनेअभिनेत्री अमिषा पटेल* ● परळी वैजनाथ । प्रतिनिधी. ......       राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव -2018 मध्ये या वर्षीही विविध मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांची परळीत मेजवानी रसिकांना मिळणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध  सिनेअभिनेत्री अमिषा पटेल च्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.        नाथ प्रतिष्ठान आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव - 2018 मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नाथ प्रतिष्ठान च्या वतीने कार्यक्रम जाहीर करण्यात आले असून परळीकर रसिकांसाठी मनोरंजन व  सांस्कृतिक मेजवानीच मिळणार आहे. मोंढा मैदानावर सर्व कार्यक्रम सादर होणार आहेत.१३ सप्टेंबर रोजी ना. धनंजय मुंडे व मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ७ वा. उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर सिनेतारका संस्कृती बालगुडे, वैशाली जाधव, पुजा पाटील ...

ना. पंकजाताई मुंडे यांनी चौंडीत घेतले अहिल्यादेवींचे दर्शन*

इमेज
*ना. पंकजाताई मुंडे यांनी चौंडीत घेतले अहिल्यादेवींचे दर्शन* *जनतेला दिलेला विकासाचा प्रत्येक शब्द सरकार पूर्ण करेल*  जामखेड दि. ०८ -----  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त चौंडी येथे आज राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी भेट देवून त्यांचे दर्शन घेतले. अहिल्यादेवींच्या आदर्श विचारांवर आमची वाटचाल सुरू असून जनतेला दिलेला विकासाचा प्रत्येक शब्द सरकार पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी पुण्यतिथी निमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केला.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २२४ वी पुण्यतिथी त्यांच्या जन्मगांवी म्हणजे चौंडी येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे यांचे सकाळी चौंडी येथे हेलिकाॅप्टरने आगमन झाले. येथील महादेव मंदिरात जाऊन त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर मंदिर परिसरात असणा-या सभागृहात त्यांनी उपस्थित जनतेला मार्गदर्शन केले.  पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर यांनी अतिशय धाडसाने आलेल्...

वद्य एकादशीच्या पर्वकाळात. .....परळीत दिंड्यांसह भाविकांनी साधली मेरुप्रदक्षिणा......!*

इमेज
*परळीत दिंड्यांसह भाविकांनी साधली मेरुप्रदक्षिणा......!* परळी वैजनाथ /प्रतिनिधी  . ...       बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी  आज श्रावणी वद्य एकादशीच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली. सकाळपासूनच दर्शनार्थी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला. विशेष म्हणजे श्रावणी वद्य एकादशीच्या पर्वकाळात दिंड्यांसह भाविकांनी मेरुप्रदक्षिणा साधली.संत सोपानकाका महाराज दिंडीतील भजनी ठेक्यातील पाउले  लक्षवेधी ठरली.       पवित्र  श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परळीत दररोज  देशातील विविध ठिकाणचे भाविक दाखल होतात.श्रावण पर्वकाळ संपत आला असून या महिन्यातील शेवटची दर्शन पर्वणी वद्य एकादशी असते. तसेच वद्य एकादशी ही परळीच्या वारीची एकादशी म्हणून भाविक नित्यनियमाने वारी करतात. आज  श्रावणी वद्य एकादशीच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत मोठ्या संख्येने भाविक दाखल  झाले होते. दरम्यान मंदिर परिसर भाविकांनीफुलून गे...

आजपासून कार, मोटार सायकल महागणार

इमेज
आजपासून कार, मोटार सायकल महागणार नवी दिल्ली - कार किंवा मोटरसायकल विकत घेणं एक सप्टेंबरपासून महागणार आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (इरडा) या विमा नियंत्रकाच्या निर्देशांनुसार आजपासून दीर्घकालीन थर्ड पार्टी विमा उतरवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनुसार इरडाने हे निर्बंध लागू केले आहेत. एक हजार सीसी खालील गाड्यांना तीन वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यासाठी 5,286 रुपये मोजावे लागणार आहेत, एक हजार ते दीड हजार सीसी मधल्या गाड्यांना तीन वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यासाठी 9,534 रुपये तर दीड हजार सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या गाड्यांना तीन वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यासाठी 24,305 रुपये मोजावे लागणार आहेत. तर मोटारसायकलच्या बाबतीत पाच वर्षांच्या थर्ड पार्टी विम्यापोटी 75 सीसी खालील गाड्यांना 1,045 रुपये, 75 ते 150 सीसी मधल्या गाड्यांना 3,285 रुपये, 150 ते 350 सीसी मधल्या गाड्यांना 5,453 रुपये तर 350 सीसी वरील गाड्यांना 13,034 रुपये इतका प्रीमियम भरावा लागणार आहे. 🔸मोटर वेहिकल अ‍ॅक्टनुसार थर्ड पार्टी विमा काढणं बंधनकारक आधी हा विमा एका वर्षाचा म...

महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून केंद्र संचालक आरेफ शेख यांचा सत्कार

इमेज
महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून केंद्र संचालक आरेफ शेख यांचा सत्कार   परळी (प्रतिनिधी):   येथील कामगार कल्याण केंद्राचे केंद्र संचालक आरेफ शेख यांचा महावितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून विशेष सत्कार करण्यात आले. महावितरण मधील कामगारांच्या पाल्यांना कामगार कल्याण केंद्राच्या शिष्यवृत्ती योजना,    पाठ्यपुस्तक सहाय्य योजना,  एम. एस. सी. आयटी अनुदान  योजना आणी   विविध उपक्रम व कार्यक्रमाचा लाभ श्री. शेख यांनी मिळवून दिला.  यानिमित्त महावितरणचे  अभियंता विजयकुमार वरवटकर यांनी शाल,  श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री. शेख यांचा  सत्कार केला. यावेळेस प्रसाद कुलकर्णी, उमा ताटे,  भगवान मंडलीक, प्रकाश परळीकर उपस्थित होते.

परळीत संत भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त लक्षवेधी शोभायात्रा!

इमेज
परळीत  संत भगवानबाबा यांच्या जयंतीनिमित्त लक्षवेधी शोभायात्रा!  ● शिवाजीनगर ते वैद्यनाथ मंदिरपर्यंत बाल भजनी मंडळांची  दिंडी ● परळी वैजनाथ  : प्रतिनिधी. ...        राष्ट्रीय  संत भगवानबाबा यांची जयंती परळीत मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने  काढण्यात आलेली शोभायात्रा लक्षवेधी  ठरली. शिवाजीनगर ते वैद्यनाथ मंदिरपर्यंत बाल भजनी मंडळांची  दिंडी काढण्यात आली होती.            परळी येथे  भगवानबाबांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहराच्या मुख्य मार्गावरून   मिरवणुक काढण्यात आली. यावेळी  प्रतिष्ठीत नागरीक, युवक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते. मिरवणुकीमधे भजनी मंडळ, महीला सहभागी होत्या. संत भगवानबाबांच्या घोषनांनी परीसर भक्तीमय झाला होता.

परळीतील श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयाची आज सांगता!

इमेज
*परळीतील श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयाची आज सांगता! * डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर सोडणार मौनव्रताची सांगता  परळी वैजनाथ/प्रतिनिधी*           डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या 82 व्या तपोनुष्ठान सोहळयाची आज रविवार दि.2 सप्टेंबर रोजी संागता होत असून याच सोबत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज आपले मौनव्रताची सांगता होणार  आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर, ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.             श्रावणमास तपोनुष्ठान सोहळयाच्या सांगता समारंभाच्या पार्श्वभूमीवर राज्यातून तसेच बाहेरच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक व समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराज उपस्थितांना मुख्य सोहळयात आशिर्वचनही देणार आहेत.यानंतर महाप्रसादाने सांगता होईल.  @@@@     मान्यवरांची लाभणार उपस्थिती. ....   ...