पोस्ट्स

परळी रेल्वे स्थानकात ट्राफिक ब्लॉक; विविध कामांसाठी काही गाड्या रद्द*

इमेज
*परळी रेल्वे स्थानकात ट्राफिक ब्लॉक;  विविध कामांसाठी काही गाड्या रद्द* छायाचित्र : जयराम गोंडे ,स्माईल फोटो स्टुडीओ  परळीवैजनाथ /प्रतिनिधी. ...         परळी रेल्वे स्थानकात ट्राफिकब्लॉक घेण्यात आला असून  विविध कामांसाठी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कामांची युद्धपातळीवर लगबग सुरू असल्याचे आज रेल्वे स्थानक परिसरात दिसून येत आहे. छायाचित्र :जयराम गोंडे, स्माईल फोटो स्टुडीओ परळीवैजनाथ         परळी रेल्वे स्थानकाजवळ  रेल्वे ने हाती घेतलेल्या नॉन-इंटर लॉक वर्किंग करिता 3 दिवस ट्राफिक ब्लॉक घेण्यात आल्या मुळे  काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी संख्या 51522 पूर्णा ते परळी सवारी गाडी – दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी संख्या 51521 परळी ते पूर्णा सवारी गाडी – दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी रद्द करण्यात आली आहे.गाडी संख्या 57554 आदिलाबाद ते परळी सवारी गाडी दिनांक 8, 9 आणि 10 मे, 2019 रोजी परभणी ते परळी दरम...

गित्ते भावंडांनी मिळवली गायन व वादनात विशेष योग्यता

इमेज
*कु.श्रेया व चि.आरव या  गित्ते भावंडांचे संगीत  परिक्षेत घवघवीत यश*   ● _गायन व वादनात मिळवली विशेष योग्यता_ ● परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ...         संगीत विषयातील गायन परिक्षेत कु. श्रेया मधुकर गित्ते हिने आणि तबला वादन परीक्षेत चि.आरव मधुकर गित्ते या बहिण - भावांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष बाब म्हणजे या परिक्षेत गित्ते भावंडांनी   गायन व वादनात विशेष योग्यता मिळवलीआहे.या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.         अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नोव्हेंबर २०१८ या सत्राचा संगीत परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या मध्ये गायन या विषयात कु. श्रेया मधुकर गित्ते हिने परिक्षा प्रविष्ट केली होती. या परिक्षेत तीने घवघवीत यश संपादन केले. तिने पैकीच्या पैकी गुण संपादित करत विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली आहे. तर चि.आरव मधुकर गित्ते याने तबला या विषयात वादन परीक्षेत पैकीच्या पैकी गुण संपादित करत विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केली आहे. त्यांना परळी येथील ग...
इमेज
बुधवारची एकादशी 'त्रीस्पृशा' एकादशी; धार्मिक दृष्ट्या दुर्मिळ योगायोग ! ● गीताजयंती,एकादशी, द्वादशी, त्रयोदशी युक्त वार● परळी वैजनाथ / रविंद्र जोशी.......           पंचागानुसार वार, तिथी , नक्षत्र आदींसह अन्य बाबींचा धार्मिक दृष्टीने विचार केला जातो. या मध्ये अनेक वेळा अनेक तिथी वृद्धी -क्षय होतो. परंतु यातून निर्माण होणारे तिथीबदल व योग याचे अत्यंत महत्त्व समजले जाते. अशाच प्रकारे अनेक वर्षांनंतर असा धार्मिकदृष्ट्या दुर्मिळ योग आजच्या बुधवार (दि. १९) रोजी आलेल्या एकादशीबाबतही आहे. ही  एकादशी 'त्रीस्पृशा' एकादशी आहे.गीताजयंती, एकादशी, द्वादशी,त्रयोदशीयुक्त असा एकत्रितपणे हा  वार असून अनेक वर्षानंतर असा योगायोग आल्याचे पंचाग अभ्यासक व अध्यात्मिक तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

प्रा. व्ही. बी.देशपांडे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! !!!!!

इमेज
* आज "बेटा" शब्द - नि:शब्द .........!*                                  -  ♦ प्रा. रविंद्र जोशी ♦       एक वेगळा बाज, दिमाखदार व शाही वर्तन जे काही असेल ते धडक - बेधडक मांडण्याची नैसर्गिक वृत्ती आणि परळीत कोणीही असो त्याला चार चांगले शब्द सांगण्याचा -सुनावण्याची अधिकारवाणी असलेले प्रा. व्ही.बी.देशपांडे यांनी अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या विविध क्षेत्रातील सहभागाने ते सर्वपरिचित होतेच त्याहीपेक्षा वडीलकीच्या नात्याला परिपूर्ण जपणारे व्यक्तीमत्व होते. प्रत्येकाला आपलेपणाची जाणीव करून देणारा " बेटा" हा शब्द आज त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आठवल्याशिवाय राहणार नाही. एक प्रकारे त्यांच्या जीवनशैलीत अविभाज्य बनलेला हा शब्द होता. आदरणीय सरांच्या जाण्याने जणू  "बेटा" शब्द - नि:शब्द झाला आहे असे वाटते. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! !!!!!

हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रणेते डॉ.मौलाना अबुल कलाम आजाद - प्रा.टी. पी.मुंडे

इमेज
हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रणेते डॉ.मौलाना अबुल कलाम आजाद - प्रा.टी. पी.मुंडे परळी (प्रतिनिधी)          भारताचे माजी पहिले शिक्षण मंत्री डॉ. मौलाना अबुल कलाम आजाद हे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रणेते होते असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा प्रदेश सरचिटणीस प्रा. टी.पी .मुंडे (सर )यांनी केले       परळीतील संपर्क कार्यालयांमध्ये डॉ.मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली डॉ. मौलाना अबुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला हार घालण्यात आला यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत मुंडे ज्येष्ठ नेते फारुख भाई ,महेमुद भाई ,बाबा शेख , इलियास भाई काँग्रेसचे अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष जम्मू सेठ, शहराध्यक्ष बबलू सय्यद साजिद, गफार भाई बागवान ,शेख फैय्याज ,मतीन मणियार, शेख सिकंदर, शेख जावेद, मुईज नवाब आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते        पुढे बोलताना प्रा .टी.पी .मुंडे (सर )म्हणाले की डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद यांची जीवन तरुणांना प्रेरणा देणारे असून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्य...

धनंयज मुंडेंनी मांडल्या मुख्यमंत्र्यांसमोर बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या व्यथा

इमेज
शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या धनंयज मुंडेंनी मांडल्या  मुख्यमंत्र्यांसमोर बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांच्या व्यथा बीड दि.12.......... मुख्यमंत्री महोदय यावर्षी 1972 वर्षापेक्षाही भिषण दुष्काळ आहे, तुम्ही कागदावर दुष्काळ जाहिर केला असला तरी, उपाययोजनांची अंमलबजावणी मात्र होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना खरोखरच आधार द्यायचा असेल तर हेक्टरी 50 हजार रूपये तातडीने मदत द्या अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यंानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.  बीड जिल्ह्यातील दुष्काळी आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री आज जिल्ह्यात आले होते, मागील 8 दिवसांपासून दिवाळीचा सण साजरा न करता शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणुन घेणार्‍या धनंजय मुंडे यांनी शेतकर्‍यांच्या या व्यथा आणि वस्तुस्थिती या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिली. या बैठकीत प्रस्तावित करताना जिल्हाधिकार्‍यांनी बोंडअळीची नुकसान भरपाई, पिक विमा याचे शंभर वाटप व कर्जमाफीची 100 टक्के अंमलबजावणी झाल्याचे आकडे सादर केले. त्याचा धागा पकडत बोलताना ...

परळीतील पाणी प्रश्‍नाकडे धनंजय मुंडेंनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष

इमेज
परळीतील पाणी प्रश्‍नाकडे धनंजय मुंडेंनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष पुस व पट्टीवडगाव पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी बीड दि.12.......... परळी वैजनाथ शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वाण धरणात केवळ 17 टक्के पाणी साठा राहिल्याने परळी शहराला आगामी काळात मोठ्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे, त्यासाठी संपुर्ण पाणी साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करून परळीच्या पाणी प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर पुस व 20 खेडी व पट्टीवडगाव व 9 खेडी पाणी पुरवठा योजनेचे वीज बील माफ करून या योजना पुन्हा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.      बीड जिल्ह्याच्या दुष्काळी आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडमध्ये आले असता ना.मुंडे यांनी परळी विधानसभा मतदार संघातील पाणी प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष वेधले. वाण धरणावर परळी शहरासह नागापूर, आस्वलांबा, दौनापूर, टोकवाडी डाबी या पाच गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. तसेच वैद्यनाथ कारखान्याला येथुनच पाणी पुरवठा होतो...