पोस्ट्स

समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर पुरस्कारांची घोषणा

इमेज
समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर पुरस्कारांची घोषणा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, उद्योगपती रमेश फिरोदीया, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.डॉ.दासू वैद्य  पुरस्कारांचे मानकरी सार्वजनिक कार्यक्रमावरील निर्बंध शिथील होताच होणार कार्यक्रम परळी (प्रतिनिधी-) समाजभुषण स्व. सुवालालजी वाकेकर (ललवाणी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मारवाडी युवा मंचच्या वतीने देण्यात येणार्या  राज्यस्तरीय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्यमंत्री  तथा नाथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ना. धनंजय मुंडे (राज्य भुषण), उद्योगपती रमेश फिरोदीया (समाज भुषण) व प्रसिद्ध साहित्यीक प्रा.डॉ.दासू वैद्य (साहित्य भुषण) यांना स्व. सुवालालजी वाकेकर पुस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध असून हे निर्बंध शिथील होताच कार्यक्रमाची तारिख जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून रामाणाचार्य रामराव महाराज ढोक व प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवि  अशोक नायगावकर उपस्थित राहणार असल्याचे मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष ...

कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

इमेज
कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी सोनपेठ (प्रतिनिधी).....      कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.  आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, गणेश हांडे, राजाभाऊ निळे या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांनी सांगितले की, सामाजिक न्यायाची खरोखर भुमिका घेत खर्या अर्थाने घेणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची कास धरून वाटचाल केली पाहिजे.त्यांचे विचारच सामाजिक न्याय व हक्क मिळवून देणारे असल्याचे सांगितले.   प्रास्ताविक मुख्याध्यापक सोनकांबळे यांनी केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.एल.सोनकांबळे, वसतिगृह अधिक्षक डी.एम.माने, शिक्षकवृंद, कर्मचारी उपस्थित होते. ***†********************************...

Video News: अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोपयोगी उपक्रम

इमेज
अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोपयोगी उपक्रम*  • *_वृक्षारोपण, वृक्षभेट, सॅनिटायझर,मास्क व अन्नधान्य किटचे वितरण_* अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वोपयोगी उपक्रम*  • *_वृक्षारोपण, वृक्षभेट, सॅनिटायझर,मास्क व अन्नधान्य किटचे वितरण_* * परळी वैजनाथ: प्रतिनिधी....      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरात सर्वोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.अनाठायी खर्च व सवंग प्रसिद्धी च्या उपक्रमांना फाटा देत वृक्षारोपण, ५०० वृक्षभेट,  सॅनिटायझर, मास्क व अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले.        जग सध्या कोरोना महामारीच्या महाभयंकर संकटाशी सामना करत आहे.या पार्श्वभूमीवर अगदी सुरुवाती पासून कोरोना प्रतिबंधक मोहीमेत अग्रेसर राहिलेल्या व सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात पुढाकार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय,सामाजिक व विविध स्तरातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. मित्र मंडळाच्या वतीने अनंत इंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त...

पंकजाताई मुंडे यांनी केले आवाहन....मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, घरात फोटोसमोर दोन दिवे लावा, पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी नको

इमेज
*लोकनेत्याच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी केले आवाहन* *मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा, घरात फोटोसमोर दोन दिवे लावा, पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर गर्दी नको * परळी वैजनाथदि. २९---- लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीला मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन दिवे लावून त्यांना अभिवादन करायचं, असं आवाहन  पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. ३ जून रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावरच होईल, मात्र कार्यक्रम लाईव्ह असेल, कोणीही गडावर गर्दी करु नये, अशी सूचना पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.  ३ जून हा दिवस उजाडलाच नाही पाहिजे, असं वाटत असल्याची फेसबुक पोस्ट पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.   ३ जून रोजी लोकनेते गोपीनाथराव  मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. परंतु सध्या कोरोनामुळे राज्यासह बीड जिल्ह्यातही लॉकडाऊन आहे. शिवाय गर्दीच्या सर्वच कार्यक्रमावर बंदी आहे. गोपीनाथ गडावर सध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये गोपीनाथराव मुंडे य...
इमेज
५८ दिवसांनंतर निघण्यासाठी सज्ज 'लालपरी' वाट पाहून पाहून थांबली ! *परळी आगारात दिवसभरात आले केवळ दोन प्रवासी* परळी वैजनाथ, प्रतिनिधी:-        कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून परिवहन महामंडळाची लालपरी शुक्रवार दि.22 मे पासून धावणार यासाठी परळी आगारात  8 गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सकाळपासून कोणीही प्रवासी बसस्थानकावर फिरकलेच नाही.दिवसभरात केवळ दोन प्रवासी आले. त्यामुळे परळी आगारातून बसच्या नियोजित फेर्या झाल्या नाहीत.          दोन महिन्यांपासून बसून असलेल्या महामंडळाच्या बसेस शुक्रवारपासून सुरू करण्यात आल्या. शासनाच्या बसेस या जिल्हा अंतर्गत धावणार आहेत. परळी आगारात बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. परळी-बीड अणि परळी-अंबाजोगाई अशा प्रत्येकी बारा फेर्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.यासाठी एकूण आठ बसेस सज्ज करण्यात आल्या. होत्या अशी माहिती आगारप्रमुख  आर.बी.राजपुत  यांनी दिली. मात्र 'वाट पाहिन पण एसटीनेच जाईन 'असे नेहमी म्हटले जाते परंतु आज वाट पाहिन पण...

कोरोना महामारीत परळीत युवकांचा घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदान यज्ञ !

इमेज
कोरोना महामारीत परळीत युवकांचा  घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदान यज्ञ  ! • _शिवनगरमधिल युवकांचा २५ दिवसांपासून उपक्रम_ • परळी वैजनाथ/ प्रतिनिधी....       कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीने अनेकांना अनेक अडचणी येत आहेत.त्याचप्रमाणे अडल्या नडलेल्यांना अडचणी येऊ नयेत यासाठीही अनेक प्रयत्नशिल हात पुढे येत गरजुंना सर्वोतोपरी मदत करत आहेत.अशाच प्रकारे गेल्या २५ दिवसांपासून मांगिर बाबा मित्र मंडळाचे श्रीनाथ विभूते, कृष्णा भास्कर व अन्य युवक गल्लीत प्रत्येक घरातून घरोघर 'माधुकरी' गोळा करून गरजूंना अन्नदानयज्ञ करण्याचा उपक्रम राबवताना दिसत आहेत. सर्वसामान्य घरांतील युवकांनी एकत्रित येत राबवलेला हा उपक्रम माणुसकीचे मुर्तीमंत उदाहरण ठरला आहे.        कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीच्या परिस्थितीत गरजुंपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीसाठी नागरीक,  संस्था पुढे येत आहेत.  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागु करण्यात आलेल्या टाळाबंदीने  देश व राज्यातील हातावर पोट...

परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ

इमेज
परळीतील नव्या पिढीलाही वैद्यनाथाची ओढ : चित्रकार मैथिलीने  रेखाटले वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र ●वैद्यनाथ मंदिर : नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती!● परळी वैजनाथ /रविंद्र जोशी. ....        देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. या मध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळेच गावाला वैद्यनाथाची परळी किंवा परळी वैजनाथ हे नाव प्राप्त झाले आहे. परळीचे वैद्यनाथ मंदिर एक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक समृद्ध वारसा आहे. त्याचबरोबर वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मध्ये आणखी एक भर पडली असुन वैद्यनाथ मंदिर हे नवोदित शिल्पकार,  चित्रकारांसाठी उत्कृष्ट कलाकृती आहे. परळीतील नव्या पिढीची  चित्रकार मैथिलीने  वैद्यनाथ मंदिरचे हुबेहुब पोस्टर चित्र रेखाटले आहे. यावरुन कलाकृतींमध्ये रस असणारांनाही मोठे आकर्षण असल्याचे प्रत्ययाला आले.       ब...