MB NEWS:अंबाजोगाई स्वाराती मधील 90 पैकी 27 अहवाल पॉझिटिव्ह तर गेल्या चोवीस तासात एका रुग्णाचा मृत्यू

अंबाजोगाई स्वाराती मधील 90 पैकी 27 अहवाल पॉझिटिव्ह तर गेल्या चोवीस तासात एका रुग्णाचा मृत्यू अंबाजोगाई ,प्रतिनिधी.. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई येथे गेल्या चोवीस तासात दाखल झालेल्या रुग्णांचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 29 रोजी मध्यरात्री बारा पर्यंत प्राप्त झालेल्या अहवालाची संख्या 90 इतकी आहे. तर स्वाराती मध्ये घेण्यात आलेल्या 90 पैकी 27 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 63 अहवाल निगेटिव्ह आले आहेत पैकी एका 45 वर्षीय परळी तालुक्यातील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. स्वाराती मधील गेल्या 24 तासात कोरणा रुग्णांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे :एकूण भरती झालेल्या रुग्णांची संख्या 145, गंभीर रुग्णांची संख्या 25, सामान्य ते मध्यम स्थिती रुग्णसंख्या 84 ,निगेटिव्ह रुग्णसंख्या अठरा, संशयित रुग्ण संख्या 18 आहे. आज पर्यंत या रुग्णालयात एकूण 12 7 17 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे .त्यापैकी 33 48 रुग्णांची कोविड चाचणी करण्यात आली पैकी 669 अहवाल पॉझिटिव्ह आले तर 26 79 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.