पोस्ट्स

MB NEWS:वाण धरणाचे पाणी शेतीला मिळावे यासाठी किसान सभेचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन*

इमेज
  वाण धरणाचे पाणी शेतीला मिळावे यासाठी किसान सभेचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन *परळी वै. प्रतिनिधी*      नागापुर येथील वाण धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र किसान सभेच्या वतीने पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले.  शनिवार दि. 10 रोजी नागापुर येथील वाण धरणावर पालकमंत्री ना. धनंजय मुंडे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार आले होते. त्यावेळी महाराष्ट्रराज्य किसान सभेच्या वतीने वाण धरण लाभ क्षेत्रातील शेतीला पाणी मिळावे यासह माजलगाव धरणाचे पाणी वाण धरणात सोडण्यात यावे. वाण धरणाचे पाणी रब्बी पिकासाठी तात्काळ मिळाले पाहिजे. वाण धरणावरील उतरून नेलेले ट्रांसफार्मर तात्काळ बसवले पाहिजे. 2015 पासून बंद असलेल्या मोटारीचे बिल माफ झाले पाहिजे. तीन महिन्यापासून नादुरुस्त असलेला ३३ के.व्ही.मधील ट्रांसफार्मर तात्काळ भरला पाहिजे. या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री मुंडे व जिल्हाधिकारी रेखावार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी किसान सभेचे जिल्हा सचिव काॅ. मुरलीधर नागरगोजे, काॅ. अशोक नागरगोजे, काॅ. मनोज स...

MB NEWS-शेती सोबत शेती पुरक व्यवसायस प्राधान्य द्यावे-अभयकुमार ठक्कर*

इमेज
 * शेती सोबत शेती पुरक व्यवसायस प्राधान्य द्यावे-अभयकुमार ठक्कर* परळी वै.(प्रतिनिधी) आजच्या काळात शेतकऱ्यांनी शेती सोबत शेती पुरक व्यवसायाला देखील प्राधान्य द्यावे असे मनोगत शिवसेना बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी व्यक्त. भारतीय विद्यार्थी सेनेचे परळी वैजनाथ तालुका समन्वयक अमित कचरे यांनी अधिनिक शेती कामासाठी व शेती व्यवसायात नांगरणी,पेरणी,त्याच बरोबर खळे करण्यासाठी मळणी यंत्राच्या साह्याने शेती पुरक सुरू केला असुन.या शेती पुरक व्यवसायाच्या यंत्राचे पुजन शिवसेना बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर,भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे,जेष्ठ क्रिडा शिक्षक सुभाष नानेकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की आजच्या काळात अधिनिक शेती करण्यात शेतकऱ्यांनी शेती सोबत शेती पुरक व्यवसायाला देखील प्राधान्य देऊन शेती मालात वाढ करून आपले जीवनमान उंचावण्याचे कार्य करावे. या वेळी प्रकाश देवकर,उमेश जवकर,रविंद्र शेटे,किशोर शेलार,ओम घटमल,अंबादास पोपळघट,योगेश घेवारे,अनिल आपेट,लक्ष्मण मुंडे, ईश्वर इंगळे,माऊली मुंडे, राहुल तिडके,सिद्धर्थ गायकवाड,...

MB NEWS:परळीची जलसंजीवनी असलेला वाण प्रकल्प भरल्याने समाधानी* *धनंजय मुंडे यांनी वाण धरणावर केले जलपूजन*

इमेज
 * परळीची जलसंजीवनी असलेला वाण प्रकल्प भरल्याने समाधानी*  *धनंजय मुंडे यांनी वाण धरणावर केले जलपूजन* *जायकवाडीचे पाणी आणणे हे आपले ध्येय - धनंजय मुंडे* परळी (दि. १०) ---- : परळी शहरासह तालुक्याची जलसंजीवणी असलेले वाण धरण जवळपास चार वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरले असून यामुळे तालुक्याची तहान भागणार असून सिंचनासाठीही मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने समाधान वाटत असल्याचे परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.  वाण धरणाच्या तीरावर ना. मुंडेंच्या हस्ते विधिवत जलपूजन संपन्न झाले व आरती करण्यात आली; यावेळी आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, जि. प. गटनेते अजय मुंडे, युवक नेते अभय मुंडे, दिपक नाना देशमुख, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शरदभाऊ मुंडे, भाऊड्या कराड, मोहन सोळंके, सूर्यभान मुंडे, उपसभापती पिंटू मुंडे, अंबाजोगाईचे सभापती प्रशांत जगताप , रवी मुळे, विनोद जगतकर, वैजूअण्णा बागवाले, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन मामा कुलकर्णी, तहसीलदार विपीन पाटील, न.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे, जलसंपदा विभागाचे ...

MB NEWS:_उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त आयोजित_ *सेवासप्ताहातील विविध आॅनलाईन स्पर्धांचे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवारी पारितोषिक वितरण*

इमेज
  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे वाढदिवसानिमित्त आयोजित  सेवासप्ताहातील विविध आॅनलाईन स्पर्धांचे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवारी पारितोषिक वितरण परळी वैजनाथ/ प्रतिनिधी...       राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध आॅनलाईन स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवार दि.११ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.       सेवा सप्ताह काळात विविध अभिनव आॅनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. परळीत प्रथमच आयोजित व्यापक ऑनलाईन स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळाला.यामध्ये परळी पंचक्रोशीतील विविध ठिकाणांचे फोटो फेसबूक माध्यमातून प्रकाशित करण्यात आले. एक्सप्लोरिंग परळी स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.अतिशय रोचक व ...

MB NEWS:रविवारी ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बिझनेस आॅन व्हील संबंधित उपक्रमांच्या नोंदणी शिबिराचा शुभारंभ

इमेज
  रविवारी ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बिझनेस आॅन व्हील संबंधित उपक्रमांच्या नोंदणी शिबिराचा शुभारंभ  परळी वैजनाथ, प्रतिनिधी..               मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बिझनेस आॅन व्हील संबंधित उपक्रम नोंदणी शिबिराचा शुभारंभ रविवारी परळीत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.           रविवार दि.११ रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे नोंदणी शिबिराचा शुभारंभ होणार आहे. ना धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेरोजगारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने 'माझा व्यवसाय माझा हक्क' शिबिर घेण्यात येत आहे.कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या दृष्टिकोनातून स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने परळी मतदारसंघासाठी या योजनेचा अधिक...

MB NEWS:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची घोषणा MPSC ची परीक्षा रद्द -मुख्यमंत्र्यांची माहिती

इमेज
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची  घोषणा MPSC ची परीक्षा रद्द -मुख्यमंत्र्यांची माहिती मुंबई । MPSC च्या परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. ११ ऑक्टोबरला होणारी MPSC ची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. “काही विद्यार्थी सध्या कोरोनाग्रस्त आहेत. त्यामुळे रविवारी होणारी MPSC ची परीक्षा रद्द करण्यात येत आहे. मात्र, नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल”, असे मुख्यमंत्री म्हणाले. “परिक्षेपासून कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही”, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ही घोषणा केली आहे. यावेळी, “११ ऑक्टोबरची होणारी MPSC परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे”, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

MB NEWS:*परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे;आता आणखी एक बीडला जोडणारा रेल्वेमार्ग सुरू होणार* *सोलापूर-तुळजापूर-बीड-जळगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण अखेर पूर्ण

इमेज
  *परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे;आता आणखी एक बीडला जोडणारा रेल्वेमार्ग सुरू होणार*  * सोलापूर-तुळजापूर-बीड-जळगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण अखेर पूर्ण*                                -----------------------------------     *  सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मराठवाड्याला जोडणाºया महत्त्वपूर्ण अशा सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-बीड-जळगाव रेल्वेमार्ग लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे़ त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत़ सध्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, भूसंपादन (जमीन संपादित) करण्याचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली़ याबाबत सोलापूरचे खा़ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.   मध्य रेल्वे विभागात असलेल्या सोलापूर विभागातील खासदारांची रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्यासोबत आॅनलाइन बैठक झाली़ या बैठकीस मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, खा़ जयसिद्धेश्वर महास्वामी, खा़ रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खा़ ओमप्रकाश निंबाळकर, विभा...