पोस्ट्स

MB NEWS:अट्टल मोटारसायकल चोर जेरबंद; जिल्हा व जिल्ह्याबाहेर चोरी केलेल्या ९मोटारसायकली हस्तगत

इमेज
  अट्टल मोटारसायकल चोर जेरबंद; जिल्हा व जिल्ह्याबाहेर चोरी केलेल्या ९मोटारसायकली हस्तगत परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    मोटारसायकल चोरी करून त्या विक्री करणार्या एका अट्टल मोटारसायकल चोराला जेरबंद करण्यात परळी पोलीसांच्या डीबी शाखेच्या पोलिस पथकाला यश मिळाले आहे.या चोराकडून जिल्हा व जिल्ह्याबाहेर चोरी केलेल्या ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परळी शहरात तहसील समोरील मैदानावरुन शेख शाहेद वाजेद यांची मोटारसायकल चोरीला गेली होती.याबाबतचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल आहे.या गुन्ह्यात तपास सुरू असताना गुप्त माहिती मिळाल्यानंतर संशयित म्हणून मरळवाडी ता.परळी येथील राहणार आरोपी राजाभाऊ रतन ताटे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने मोटारसायकल चोरी केल्याचे मान्य केले.अधिक तपास केला असता त्याने बीड जिल्ह्यात व अन्य नाशिक, जळगाव, पुणे येथे ही चोर्या केल्याचे त्याने कबुल केले.तसेच चोरी करून आणलेल्या मोटारसायकली विक्री ला ग्राहक मिळाले नाही त्यामुळे मरळवाडी  शिवारात झाडा झुडुपांमध्ये लपवून ठेवल्याचे उघड झाले.पोलीसांनी ...

MB NEWS:धनंजय मुंडे अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची करणार बांधावर जाऊन पाहणी*

इमेज
 *धनंजय मुंडे अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची करणार बांधावर जाऊन पाहणी* *रविवारी गेवराई, माजलगाव आणि वडवणी तालुक्याचा करणार दौरा* बीड (दि. १७) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे रविवारी (दि. १७) बीड जिल्ह्यात दौरा करून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत.  रविवारी ना. मुंडे हे सकाळी 10 वाजेपासून गेवराई तालुक्यातील हिरापुर, इटकुर, मादळमोही, मिरकाळा, नंदपूर आदी गावांमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. यावेळी ना. मुंडे यांच्यासह माजी आ. अमरसिंह पंडित, महसूल, कृषी आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. गेवराई नंतर दुपारी 1 वाजल्यापासून माजलगाव व वडवणी तालुक्यातही ना. धनंजय मुंडे हे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्यासह माजलगाव तालुक्यातील तालखेड, फुलेपिंपळगाव, नित्रुड, वडवणी तालुक्यातील मोरवड, पुसरा आदी गावांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करतील.  बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले असून, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवां...

MB NEWS:कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठाणचा उपक्रम

इमेज
  भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी   कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठाणचा उपक्रम परळी I प्रतिनिधी       भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी व युवकांनी विविध विषयांवरील लेखांचे वाचन केले.       कृष्णनगर(अंबलवाडी) येथे कृष्णतेज सामाजिक प्रतिष्ठाण संचलित वृत्तपत्र वाचनालयाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यांनतर गावातील विद्यार्थी , विद्यार्थिनी व युवकांनी विविध विषयांवरील लेखांचे वाचन केले.        संस्थेचे अध्यक्ष राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास माजी उपसरपंच परमेश्वर काळे, मारूती भास्कर, अक्षय काळे, मंगेश भास्कर,  ऋषिकेश काळे, वर्शिकेत भाकरे, संतोष काळे, स...

MB NEWS:पीकाच्या नुकसानीचे भरपाई द्या अन्यथा तीव्र करू-साईराजे देशमुख

इमेज
  पीकाच्या नुकसानीचे भरपाई द्या अन्यथा तीव्र करू-साईराजे देशमुख   परळी(प्रतिनिधी):-ऑक्टोबरध्ये झालेला अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकविता शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५०,०००रूपय मदत करावी अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष मा.नानासाहेब जावळे पाटील , याचा नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा अ.भा.छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष साईराजे देशमुख यांनी दिला.       तालुकाध्यक्ष साईराजे देशमुख यांनी दिलेल्या पत्राद्वारे म्हटले होते की चालू खरीप हंगामाध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर कापूस,तुर,सोयाबीन, बाजरी,आदी पीके चांगली आली होती. परंतु ऑक्टोबर चा परतीच्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला गेला.कापसाच्या वाती झाल्या.सोयाबीन कोम फुटले, काढून ठेवलेल्या बाजरीचे भिजल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.अशा परिस्थिती मध्ये सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे.मंत्र्यांनी मंत्रालयात बसून चौकशी करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा बादावर जाऊन त्यांचे हाल विचारावेत आणि तात्काळ ...

MB NEWS:माणूसकीची भिंत-आज होणार शुभारंभ

इमेज
   राधा-मोहन साथी प्रतिष्ठाण व दै.मराठवाडा साथीच्या वतीने उभारली माणूसकीची भिंत   * आज होणार शुभारंभ; नको असेल ते द्या, हवे ते घेऊन जा ..*  परळी (प्रतिनिधी-) राधा-मोहन साथी प्रतिष्ठाण व दै.मराठवाडा साथीच्या वतीने आज स्व. मोहनलालजी बियाणी अन्नछत्र परिसरात माणूसकीची भिंत या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ होत असल्याची माहिती मुख्य मार्गदर्शक तथा दै.मराठवाडा साथीचे संपादक चंदुलाल बियाणी यांनी दिली. आपल्याला नको असेल ते येथे द्या, ज्याला हवे असेल तो गरजवंत येथून घेऊन जाईल अशी या माणूसकीच्या भिंतीमागील भूमिका आहे. अन्नछत्रच्या वतीने 20 रुपयांत जेवण देण्यासोबतच शहरतील 5 सार्वजनिक स्थळी मोफत अन्नदान मागील वर्षभरापासून करण्यात येत आहे. आपल्याला आवडीच्या वस्तू आपण खरेदी करतो, अनेकदा अशा वस्तू कालबाह्य झाल्यानंतर त्या इतरत्र फेकून देतो. परंतु आपल्या जिवनावश्यक वस्तूंच्या यादीतील वापरलेले कपडे, चष्मे, बॅटरी, जूनी सायकल, घड्याळ, पुस्तक, वह्या, पेन, पेन्सील व अन्य अशा अनेक वस्तू आपण टाकून देत असतो. आपल्यासाठी वापरात नसलेल्या या वस्तू गरिबांसाठी केवळ जिवनावश्यकच नाही तर त्या...

MB NEWS:अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी प्राचार्या डॉ रेखाताई परळीकर यांची निवड

इमेज
  अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी प्राचार्या डॉ रेखाताई परळीकर यांची निवड परळी वैजनाथ दि.१६ (प्रतिनिधी)                अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेची बीड जिल्हा महिला आघाडी नुतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी प्राचार्या डॉ. रेखाताई परळीकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष दिलीप चव्हाण व जिल्हाध्यक्ष महादेव लोमटे यांनी नुकतीच केली आहे. याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.                 अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप चव्हाण व जिल्हाध्यक्ष महादेव लोमटे यांनी नुकतीच एका आँनलाईन बैठकीच्या माध्यमातून महिला आघाडीची नुतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखाताई परळीकर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. रेखाताई परळीकर या सतत सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असतात. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात २००३ पासून प्राचार्या म्हणून...

MB NEWS:पीकाच्या नुकसानीची भरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू-जिल्हाध्यक्ष निळंकठ चाटे

इमेज
  पीकाच्या नुकसानीची भरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू-जिल्हाध्यक्ष निळंकठ चाटे बीड (प्रतिनिधी) :- ऑक्टोंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकविता शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अन्यथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खा.प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी दिला आहे.        जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चालु खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर कापूस, तुर, सोयाबीन, बाजरी आदी पीके चांगली आली होती. परंतु ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला गेला. कापसाच्या वाती झाल्या. सोयाबीन कोम फुटले, काढून ठेवलेल्या बाजरीचे भिजल्यामुळे नुकसान झाले. अशा परिस्थितीमध्ये सरकारने आता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणे गरजेचे आहे. मंत्र्यांनी मंत्रालयात बसून चौकशी करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांचे हाल पहावे...