इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:माणूसकीची भिंत-आज होणार शुभारंभ

  राधा-मोहन साथी प्रतिष्ठाण व दै.मराठवाडा साथीच्या वतीने उभारली माणूसकीची भिंत 



 *आज होणार शुभारंभ; नको असेल ते द्या, हवे ते घेऊन जा..* 


परळी (प्रतिनिधी-)

राधा-मोहन साथी प्रतिष्ठाण व दै.मराठवाडा साथीच्या वतीने आज स्व. मोहनलालजी बियाणी अन्नछत्र परिसरात माणूसकीची भिंत या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ होत असल्याची माहिती मुख्य मार्गदर्शक तथा दै.मराठवाडा साथीचे संपादक चंदुलाल बियाणी यांनी दिली. आपल्याला नको असेल ते येथे द्या, ज्याला हवे असेल तो गरजवंत येथून घेऊन जाईल अशी या माणूसकीच्या भिंतीमागील भूमिका आहे. अन्नछत्रच्या वतीने 20 रुपयांत जेवण देण्यासोबतच शहरतील 5 सार्वजनिक स्थळी मोफत अन्नदान मागील वर्षभरापासून करण्यात येत आहे.

आपल्याला आवडीच्या वस्तू आपण खरेदी करतो, अनेकदा अशा वस्तू कालबाह्य झाल्यानंतर त्या इतरत्र फेकून देतो. परंतु आपल्या जिवनावश्यक वस्तूंच्या यादीतील वापरलेले कपडे, चष्मे, बॅटरी, जूनी सायकल, घड्याळ, पुस्तक, वह्या, पेन, पेन्सील व अन्य अशा अनेक वस्तू आपण टाकून देत असतो. आपल्यासाठी वापरात नसलेल्या या वस्तू गरिबांसाठी केवळ जिवनावश्यकच नाही तर त्या उपयुक्तही असतात. या पार्श्वभुमीवर राधा-मोहन साथी प्रतिष्ठाण व मराठवाडा साथीच्या वतीने माणूसकीची भिंत हा आगळा-वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राधा-मोहन साथी प्रतिष्ठाण संचलीत, अन्नछत्र, अशोक जैन प्रतिष्ठाणच्या समोर येथे ही भिंत कार्यरत करण्यात आली आहे. नागरिकांना आवाहन आहे की, त्यांना नको असलेल्या रोजच्या वापरातील विविध वस्तू कृपया येथे आणून सोपवाव्यात, ज्याला आवश्यक आहे तो येथून घेऊन जाईल. हे एक प्रकारचे दान असून या प्रक्रीयेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या