इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी प्राचार्या डॉ रेखाताई परळीकर यांची निवड

 अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी प्राचार्या डॉ रेखाताई परळीकर यांची निवड



परळी वैजनाथ दि.१६ (प्रतिनिधी)

               अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेची बीड जिल्हा महिला आघाडी नुतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी प्राचार्या डॉ. रेखाताई परळीकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष दिलीप चव्हाण व जिल्हाध्यक्ष महादेव लोमटे यांनी नुकतीच केली आहे. याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

                अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप चव्हाण व जिल्हाध्यक्ष महादेव लोमटे यांनी नुकतीच एका आँनलाईन बैठकीच्या माध्यमातून महिला आघाडीची नुतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखाताई परळीकर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. रेखाताई परळीकर या सतत सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असतात. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात २००३ पासून प्राचार्या म्हणून कार्यरत आहेत. १७ वर्षे प्राचार्या म्हणून यशस्वी कारकिर्द आहे. शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी याबदल दिल्ली येथील संस्थेने राष्ट्रीय पुरस्कार देवून त्यांचा गौरवकेलेला आहे. तसेच परळी भुषण पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर अनेक वर्षे कार्य केलेले आहे. या पार्श्वभूमीवर अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेने त्यांची महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या