पोस्ट्स

MB NEWS-पुजा चव्हाण मृत्युप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले " सखोल चौकशी करून सत्य समोर येईल"

इमेज
  पुजा चव्हाण मृत्युप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले " सखोल चौकशी करून सत्य समोर येईल" मुंबई....           पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्येप्रकरणी राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षानं हा मुद्दा उचलून धरला आहे. तर, राज्यातील महाविकास आघाडी आणि शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अखेर या सर्व प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवडी येथे ट्रान्सहार्बर कामाची पाहणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 'पूजा चव्हाण प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल,' असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तसंच, 'या बद्दल सखोल चौकशी केली जाईल पण, गेले काही दिवस काही महिने लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे प्रकारही समोर आले आहेत. या प्रकरणात तसं काही होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात सखोल चौकशी करुन सत्य जनतेसमोर आणले जाई...

MB NEWS-न.प.गटनेते वाल्मीक आण्णा कराड यांची तत्परता ; प्रियानगरभागातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटला !* • _प्रियानगरमधिल नागरीकांनी मानले आभार_

इमेज
  *न.प.गटनेते वाल्मीक आण्णा कराड यांची तत्परता ; प्रियानगरभागातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटला !* • _प्रियानगरमधिल नागरीकांनी मानले आभार_• परळी वै: दि 13 अनुप कुसुमकर       शहरातील प्रिया नगर भागात मागील 4 दशकापासून नागरी सुविधेचा अभाव होता .अनेक वेळा मागणी करूनही तांत्रिक अडचणी सांगून नगर परिषद या भागात नागरी सुविधा देत नव्हती. या सर्व पार्श्वभूमीवर या भागातील महिलांनी नगर परिषदेचे गट नेते वाल्मिकअण्णा कराड यांची भेट घेऊन समस्या मांडली. महिलांचे प्रश्न नगर परिषदेचे गट नेते वाल्मिक अण्णा कराड यांनी ऐकून तात्काळ फैसला करीत नगर परिषद कर्मचारी यांना आदेश करीत या भागात 1 तासात किमान पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले .प्रियानगर भागातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटला असल्याने प्रियानगरमधिल नागरीकांनी आभार मानले आहेत.          बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीने पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे तक्रार येताच "फैसला ऑन दि स्पॉट " कार्य पहावयास मिळते तेच कार्य परळीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी नगपरिषदेचे गट नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या कृतीतून दिसून आले....

MB NEWS-नागापूर येथे परळी ग्रामीण प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेचे अजय मुंडेंच्या हस्ते उदघाटन*

इमेज
 * नागापूर येथे परळी ग्रामीण प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेचे अजय मुंडेंच्या हस्ते उदघाटन* परळी (प्रतिनिधी) :- परळी शहर पाठोपाठ आता नागापूर (ता. परळी) येथे परळी ग्रामीण प्रीमियर लीग या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे आज उद्घाटन करण्यात आले.  परळी ग्रामीण भागात प्रथमच PGPL स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व प्रथम आयोजकाचे कौतूकच करावे तेवढे कमीच आहे. ग्रामिण भागात देखील लीग घेतल्या जात आहेत, याद्वारे ग्रामीण भागातील खेळाडूंना निश्चितच एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल, असे यावेळी बोलताना श्री. मुंडे म्हणाले. यावेळी कृ.उ.बा.स. संचालक सूर्यभान (नाना) मुंडे, पं. स. सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण (तात्या) पौळ, संचालक माऊली (तात्या) गडदे, संचालक माणिक (भाऊ) फड, सरपंच मोहन (दादा) सोळंके, भानुदास आप्पा डिघोळे, भागवत मुंडे, माणिक मुंडे, आदी मान्यवर व सर्व खेळाडू उपस्थित होते. यावेळी अजय मुंडे यांनी सर्व खेळाडू व RP XI क्लब ला शुभेच्छा दिल्या.

MB NEWS-स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीदिनानिमित्त होणार विविध उपक्रमांचा शुभारंभ

इमेज
  स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीदिनानिमित्त होणार विविध उपक्रमांचा शुभारंभ मराठवाडा साथी क्लिनिक, मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र, माझा आवाज तसेच आरोग्य मित्र हेल्प डेस्क होणार स्थापित परळी । प्रतिनिधी दै.मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व.मोहनलालजी बियाणी यांचा येत्या शनिवारी स्मृतीदिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचा शुभारंभही करण्यात येत असुन, ज्यामध्ये जनतेच्या समस्या मांडण्यासाठी माझा आवाज उपक्रम, हेल्प डेस्कद्वारे मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र, मराठवाडा साथी क्लिनिक तसेच उपजिल्हा रूग्णालय येथे रूग्णांच्या तांत्रीक मदतीसाठी आरोग्य मित्र हेल्प डेस्क स्थापन करण्यात येणार आहे. दै.मराठवाडा साथी सभागृहात स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमातच या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. शनिवार, दि.१३ फेब्रुवारी रोजी दै.मराठवाडा साथीच्या वतीने विविध उपक्रमांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. परळी शहरातील नागरीकांच्या शासकीय कार्यालयांशी न...

MB NEWS-*व्यक्तित्व विकासासाठी संस्कारक्षम आचरण महत्वाचं - पंकजाताई मुंडे यांचं आमदारांना मार्गदर्शन*

इमेज
 *पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत मध्यप्रदेशातील भाजपा आमदारांच्या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन*  *व्यक्तित्व विकासासाठी संस्कारक्षम आचरण महत्वाचं - पंकजाताई मुंडे यांचं आमदारांना मार्गदर्शन*  उज्जैन । दिनांक १२। मध्यप्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, भाजपच्या प्रदेश सह प्रभारी पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. दरम्यान, व्यक्तित्व विकासासाठी संस्कारक्षम आचरण महत्वाचं असल्याचं प्रतिपादन पंकजाताई मुंडे यांनी एका सत्रात मार्गदर्शन करताना केलं. मित्तल रेव्हेन्यू रिसोर्टच्या सम्राट विक्रमादित्य परिसरात भाजपा आमदारांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाला आजपासून सुरवात झाली. या वर्गाला उपस्थित राहण्यासाठी भाजपच्या सह प्रभारी पंकजाताई मुंडे यांचे आज सकाळी इंदौरच्या अहिल्यादेवी होळकर विमानतळावर आगमन झाले. आमदार दिलीप शेखावत, माजी आमदार सुदर्शन गुप्ता, युवा मोर्चा महामंत्री मयुरेश पिंगळे तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.  उज्जैन येथे दुपारी 12 वा. आमदारांच्या प्रशिक्षण वर्गाचे उ...

MB NEWS- ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे राष्ट्रसंत भगवान बाबा अध्यात्म सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

इमेज
 ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे राष्ट्रसंत भगवान बाबा अध्यात्म सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित गेवराई, प्रतिनिधी...       परळी येथील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे राष्ट्रसंत भगवान बाबा अध्यात्म सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.               गेवराई येथे राष्ट्रसंत भगवान बाबा अध्यात्म सेवा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा झाला.या समारंभात सुरेश नवले (माजी मंत्री) यांच्या हस्ते ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे राष्ट्रसंत भगवान बाबा अध्यात्म सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी अमरसिंह पंडित, श्री ह भ प महादेव महाराज राऊत, महंत राधाताई सानप महाराज,पं उद्धवबापू आपेगावकर,पं मोहनजी दरेकर,  संयोजक श्री महादेव चाटे सर आदींची प्रमुख उपस्थिती होती.समारंभाचे सुत्रसंचालन श्री. प्रा. श्रावण गिरी यांनी केले.कार्यक्रमास सर्व क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MB NEWS-परळीची पौर्णिमा जगतकर मेट्रोमध्ये पायलट

इमेज
  परळीची पौर्णिमा जगतकर मेट्रोमध्ये पायलट •सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव•   परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         परळी शहरातील भीम नगर भागातील रहिवासी असलेली पौर्णिमा जगतकर तिची मेट्रो रेल्वेच्या पायलट पदावर निवड झाली आहे.                भिमनगर भागातूनच एकूण चार जण मेट्रोमध्ये पायलेट पदावर निवड झालेले उमेदवार ठरले आहेत. शहरातील भीम नगर भागातील रहिवासी असलेली पूर्णीमा राजेभाऊ जगतकर तिची नुकतीच मेट्रो रेल्वेच्या पायलट पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल पौर्णिमा चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.