इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-नागापूर येथे परळी ग्रामीण प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेचे अजय मुंडेंच्या हस्ते उदघाटन*

 *नागापूर येथे परळी ग्रामीण प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेचे अजय मुंडेंच्या हस्ते उदघाटन*



परळी (प्रतिनिधी) :- परळी शहर पाठोपाठ आता नागापूर (ता. परळी) येथे परळी ग्रामीण प्रीमियर लीग या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे आज उद्घाटन करण्यात आले. 


परळी ग्रामीण भागात प्रथमच PGPL स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व प्रथम आयोजकाचे कौतूकच करावे तेवढे कमीच आहे. ग्रामिण भागात देखील लीग घेतल्या जात आहेत, याद्वारे ग्रामीण भागातील खेळाडूंना निश्चितच एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल, असे यावेळी बोलताना श्री. मुंडे म्हणाले.



यावेळी कृ.उ.बा.स. संचालक सूर्यभान (नाना) मुंडे, पं. स. सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण (तात्या) पौळ, संचालक माऊली (तात्या) गडदे, संचालक माणिक (भाऊ) फड, सरपंच मोहन (दादा) सोळंके, भानुदास आप्पा डिघोळे, भागवत मुंडे, माणिक मुंडे, आदी मान्यवर व सर्व खेळाडू उपस्थित होते. यावेळी अजय मुंडे यांनी सर्व खेळाडू व RP XI क्लब ला शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या